Maharashtra Political Crisis : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर (Maharashtra Political Crisis) आज (गुरुवारी) पुन्हा सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सुनावणी होणार आहे. काल (बुधवारी) महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल, अभिषेक मनु सिंघवी तर शिंदे गटाकडून हरीश साळवे, नीरज किशन कौल आणि महेश जेठमलानी यांनी युक्तिवाद केला. बंडखोर आमदारांच्या अपात्रतेवरुन सुरु झालेली कायदेशीर लढाई आता शिवसेना कोणाची यावर येऊन पोहोचली. आजच्या सुनावणीत मूळ पक्ष कोणता, आमदारांची अपात्रता यावर युक्तिवाद झाला. सरन्यायाधीश रमण्णा (N. V. Ramana) यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय पीठ या प्रकरणाची सुनावणी झाली.
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील कालचा युक्तिवाद पूर्ण झाला असून आज पुन्हा सुनावणी होणार आहे. आज सकाळी हे पहिल्या क्रमांकाचं प्रकरण असेल, असं सरन्यायाधीश रमण्णा (N. V. Ramana) यांनी स्पष्ट केलं होतं. ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल, अभिषेक मनु सिंघवी तर शिंदे गटाकडून हरीश साळवे, नीरज किशन कौल आणि महेश जेठमलानी यांनी युक्तिवाद केला. बंडखोर आमदारांच्या अपात्रतेवरुन सुरु झालेली कायदेशीर लढाई आता शिवसेना कोणाची यावर येऊन पोहोचली. आजच्या सुनावणीत मूळ पक्ष कोणता, आमदारांची अपात्रता यावर युक्तिवाद झाला. सरन्यायाधीश रमण्णा (N. V. Ramana) यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय पीठ या प्रकरणाची सुनावणी झाली.
राज्यातील सत्तासंघर्षावर बुधवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली असताल त्यामध्ये उद्धव ठाकरे आणि शिंदे गटाकडून युक्तिवाद झाला. ठाकरे गटाच्या वकिलांकडून वारंवार बंडखोरांकडे दुसऱ्या पक्षात विलीन होण्याशिवाय पर्याय नसल्याचा मुद्दा पुढे केला. तर शिंदे गटानं वारंवार आपण अद्यापही शिवसेना पक्षातच असून सदस्यत्व सोडलं नसल्याचा दावा केला.
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयानं यावेळी शिंदे गटाचे वकील हरिश साळवे यांना लेखी युक्तिवाद नव्यानं तयार करण्यास सांगत आज म्हणजेच, गुरुवारी सुनावणी घेणार असल्याचं स्पष्ट केलं. शिंदे सरकार आणि विधानसभा अध्यक्षांच्या वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिका आणि शिंदे गटातील आमदारांना अपात्र ठरविण्याबाबत विधानसभा उपाध्यक्षांनी दिलेल्या नोटिशीला आव्हान देणाऱ्या याचिकांवर आज एकत्रित सुनावणी होणार होणार आहे. राज्यात सत्तासंघर्ष सुरु असताना सुप्रीम कोर्ट काय निकाल देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Maharashtra Politics: महाराष्ट्रातील सत्ता संघर्ष सुप्रीम कोर्टात; बुधवारी नेमका युक्तिवाद काय झाला? वाचा एका क्लिकवर...