Maharashtra Political Crisis : एकनाथ शिंदेच्या बंडखोरीनंतर राज्यातील राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे. या दरम्यान एक मोठी माहिती समोर आली आहे. उद्धव ठाकरे यांनी दोन वेळा राजीनामा देण्याची तयारी केली होती अशी माहिती भाजपच्या सूत्रांकडून मिळाली आहे. मात्र राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांनी (Sharad उद्धव ठाकरेंना राजीनामा देण्यापासून रोखल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उद्धव ठाकरे दोनदा राजीनामा देण्याच्या तयारीत होते परंतु महाविकासआघाडीच्या नेत्यांनी त्यांना रोखले. 21 आणि 22 जूनला उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार होते. शिवसेना नेते एकनाथ शिंदे सरकारशी बंडखोरी करत थेट सूरतला पोहचले. त्यानंतर शिवसेनेचे अनेक नेते शिंदेबरोबर सूरत आणि नंतर गुवाहटीला गेले, त्यानंतर राजकीयनाट्याला सुरूवात झाली.
गुवाहटीला गेल्यानंतर एकनाथ शिंदेंनी आपला गट ही खरी शिवसेना असल्याचा दावा केला होता. त्यानंतर ठाकरे सरकार पडणार अशी चर्चा सुरू झाली. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्रातील जनतेला संबोधित केले. या संबोधनात मी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्यास तयार आहे. माझ्याच लोकांना जर मुख्यमंत्री म्हणून नको असेल तर मी काय बोलणार. जर बंडखोरी केलेल्या आमदारांची इच्छा असेल तर मी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास तयार आहे. मी आजच माझा मुक्काम वर्षावरुन मातोश्रीवर हलवत आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या संबोधनानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार , खासदार सुप्रिया सुळे आणि जितेंद्र आव्हाड मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी वर्षावर गेले होते. त्यानंतर त्यांच्यात एक तास बैठक झाली. या सर्व घटना झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राजीनामा देण्याच्या तयारीत होते, असा दावा सूत्रांनी केला आहे. मात्र शरद पवारांनी त्यांना राजीनामा देण्यापासून रोखले.
संबंधित बातम्या :