Maharashtra Political Crisis: ''आज वरळी, नायगाव बीडीडीबद्दल महत्वाचा निर्णय घेतला. पोलीस कुटुंबियांसाठी मुख्यमंत्र्यांनी चांगला निर्णय घेतला. आज कर्जतच्या दिशेने निघताना मी मुख्यमंत्र्यांना फोन केला आणि त्यांना सांगितलं की मी कर्जतला जात आहे. कारण आज मला सर्वात आधी महाराष्ट्रातून कर्जतमधून ऐकायचं आहे, बाळासाहेब ठाकरे आणि माँसाहेब यांचं कर्जच कोणाच्या बाजूने राहणार. शिवसेनेच्या बाजूने राहणार की, फुटीरतावाद्यांच्या बाजूने रहाणार'', असं शिवसेना नेते आदित्य ठाकरे म्हणाले आहेत. कर्जत येथे आयोजित कार्यक्रमात शिवसैनिकांना संबोधित करताना ते असं म्हणाले आहेत.
आदित्य ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्रात जिथे-जिथे मी जात आहे, तिथे प्रत्येक शिवसैनिक ही परिस्थिती संकट म्हणून नाही तर संधी म्हणून बघत आहे की, घाण निघून गेली. आता चांगलं काय तरी आपण घडू शकू. पावसाळ्यापूर्वी मुंबई महानगरपालिकेची सवयी आहे की, आम्ही रस्त्यावरचा कचरा बाजूला काढून टाकतो. नालेसफाई करत असतो, नद्यांमधला जो गाळ असतो तो बाजूला करतो आणि मग जे काही दिसत ते चांगलं दिसतं. तसं हे आपलं पावसाळ्यापूर्वी नालेसफाई आणि कचरा बाजूला करण्याचं काम झालं आहे, असं ते बंडखोर आमदारांना उद्देशून म्हणाले आहेत.
आदित्य ठाकरे पुढे म्हणाले की, 20 जूनला जेव्हा त्यांनी बंड केलं तेव्हा काही फुटीरवादी आमदार पळवले आणि काही जण फसले. अजून 15-20 लोक आमच्या संपर्कात आहेत. मलाही फोन करतात. आपल्या शिवसैनिकांना फोन करत आहेत की, कसं ही करून येथून आम्हाला घेऊन जा. पण गुवाहाटीला गेल्यानंतर त्यांची कैदी असल्यागत परिस्थिती झाली आहे. यावर बोलताना ठाण्यापासून सुरुवात करायची झाली, तर बंड करायचा होता... हिम्मत इतकी होती, जे स्वतःला आम्ही मोठे नेते आहोत असं समजत होते. त्यांना असं वाटतं ते दादागिरी करू शकतात, ते काही करू शकतात. दादागिरी तुम्ही सामान्य माणसावर कराल, पण दादागिरीने तुम्ही मन नाही जिंकू शकत. लोकांना नाही जिंकू शकत.