Maharashtra Political Crisis : महाराष्ट्रामध्ये जो काही राजकीय परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामध्ये महाविकास आघाडी सरकारमधील प्रमुख उद्धव ठाकरेंना राष्ट्रवादीचा पूर्णपणे पाठींबा असेल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. दरम्यान, बंडखोरी करणाऱ्यांना किंमत मोजावी लागेल. हे सरकार टीकावे यासाठी सगळे प्रसत्न आपण करू, असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले.
अजित पवार काय म्हणाले?
बैठकीला सर्व आमदार, खासदार, मंत्री उपस्थित होते. काही व्हीसीवरुन तर काही प्रत्यक्ष हजर होते. महाविकास आघाडीचे प्रमुख उद्धव ठाकरेंना आमचा खंबीर पाठिंबा आहे. शेवटपर्यंत संघर्ष करत राहू, सरकार टिकण्यासाठी प्रयत्न करणार, मी दुपारीही मुख्यमंत्र्यांशी बोललो. आताही बोललो. यापेक्षा दुसरी कोणतीही भूमिका राष्ट्रवादीची नाही. ही आमची अधिकृत भूमिका असेल. प्रसारमाध्यमांनी इतर कोणत्याही वृत्तवर विश्वास ठेवू नये. शिवसेनेबाबत जे काही निर्माण झालं आहे ते त्यांचे प्रवक्ते सांगतील.. सेनेचे काही आमदार परत आले आहेत.. त्यांनी आपली आपबिती सांगितली आहे, असेही अजित पवार म्हणाले.
आमच्या पक्षाची भूमिका आघाडी सरकार टिकवण्याची आहे. आमचे सर्व आमदार सोबत आहेत. काही आमचे मित्रपक्ष म्हणतात अजित पवारांनी निधी दिला नाही वगैरे.. सरकार गेल्या अडीच वर्षात काम करतंय..तिन्ही पक्षाचे पालकमंत्री आहेत, कोणाबाबतही दुजाभाव केला जात नाही.. सर्वांना समान न्याय देण्याची भूमिका आहे. 170 आमदारांच्या पाठिंब्यावर हे सरकार आलं होतं. पवार साहेबांनी पुढाकार घेतला, उद्धव ठाकरे आणि काँग्रेस असे सर्व एकत्र येऊन हे सरकार अस्तित्वात आलं.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी खासदार, आमदारांची बैठक घेतली. राजकीय परिस्थिती निर्माण झालीय त्यावर चर्चा झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पाठिंबा देण्याचा निर्णय झालाय. तसेच काम सुरुच ठेवण्याचे आदेश त्यांनी दिलाय. परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. याशिवाय दुसरी कोणतीच भूमिका आमची नाही, मुख्यमंत्र्यांच्या पाठिशी उभे राहणार आहोत. शिवसेनेचा वेगळी भूमिका असू शकते. काही आमदार परतत आहेत, तेथील आमदारांना मुख्यमंत्री यांनी आवाहन केलंय.
संजय राऊत यांच्या ' ..तर महाविकास आघाडीतून बाहेर' पडण्याच्या विधानावर अजित पवार यांनी उत्तर दिले. ते म्हणाले की, कदाचित आमदारांना परत बोलावण्यासाठी सुद्धा तसं विधान केलेलं असावं. संजय राऊत जे बोलले तेच ठाकरे यांच्या मनात आहे का हे विचारू.