Dr. Amol Kolhe : 'ही लढाई नात्यांची नाही, ही लढाई नाते संबंधांची नाही, ही लढाई रक्ताची नाही, ही लढाई मानसिक भूमिकेची नाही, ही लढाई नीती आणि अनीतिची आणि धर्माची आणि अधर्माची आहे. हा तोच शकुनी मामा आहे, ज्याच्यामुळे महाभारत घडलं, समोरून काही आक्रमण आलं तर दोन्ही भाऊ एकत्र लढत होते, पण यात मिठाचा खडा कुणी टाकला? तो शकुनी मामाने टाकला? हा शकुनी मामा कोण? असा सवाल अमोल कोल्हे (amol Kolhe) यांनी उपस्थित करत भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. 


आज शरद पवार (sharad Pawar) यांच्या उपस्थितीत नाशिकच्या (Nashik) येवल्यात पहिली जाहीर सभा होत आहे. या सभेत खासदार डॉ. अमोल कोल्हे बोलत होते. त्यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला. यावेळी ते म्हणाले की, आजच्या सभेसाठी चौफेर जमलेला हा जनसमुदाय भाषण ऐकण्यासाठी किंवा सभा ऐकण्यासाठी आला नसून हा विद्रोह आहे, रोष आहे. कारण 2019 मध्ये याच येवल्यात येऊन घसा शरद पवार यांनी फोडून भाषण केले होते, त्यावेळी याच येवलेकरांनी दाखवून दिलं की त्यावेळी आम्ही जे मतदान केलं होतं, ते पवार यांच्या विचारासाठी केलं होतं आणि जर निर्णय बदलला तर काय होतं? याचं चित्र त्या महाराष्ट्राला दिसू द्या, असे आवाहन कोल्हे यांनी केले . 


तो शकुनी मामा कोण? 


कोल्हे पुढे म्हणाले की, महाराष्ट्राच्या स्वाभिमानी मतदाराला हे मान्य नाही, त्यावेळी जे मतदानाचे पवित्र कार्य केलं. मतदानाचा पवित्र कार्य करताना बोटावर शाई लावून घेतली. ती शाई लावताना एका विचारधारेसाठी शाई लावली, आमच्या बोटावर लागलेल्या शाईला चुना समजायला लागला तर काय होतं, हे संपूर्ण महाराष्ट्र दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा यावेळी कोल्हे यांनी दिला. आज अनेक जण सांगतात कि राजकारण कुरुक्षेत्रासारखे झाले आहे. मात्र ही लढाई नात्यांची नाही, ही लढाई नाते संबंधांची नाही, ही लढाई रक्ताची नाही, ही लढाई मानसिक भूमिकेची नाही, ही लढाई नीती आणि अनितीची आणि धर्माची आणि अधर्माची आहे. हा तोच शकुनी मामा आहे, ज्याच्यामुळे महाभारत घडलं, समोरून काही आक्रमण आलं तर दोन्ही भाऊ एकत्र लढत होते, पण यात मिठाचा खडा कुणी टाकला? तो शकुनी मामाने टाकला? हा शकुनी मामा कोण? असा सवाल अमोल कोल्हे यांनी भाजपवर निशाणा साधला.  


भाजपकडून फोडाफोडीचं राजकारण 


आज राज्यात, देशात घडत आहे, पक्षाच्या फोडाफोडीच राजकारण सुरू आहे. वारंवार पक्ष फोडले जात आहेत, भाजपाला केंद्रात सत्तेत येऊन नऊ वर्ष झाली, सगळे कार्यक्रम झाले, मात्र महागाई कमी झाली का? रोजगार मिळाले का? शेतकऱ्याच्या पिकाला भाव मिळाला का? मात्र यातलं काही घडलेलं नाही. एकीकडे उत्तरप्रदेशच्या खालोखाल महाराष्ट्र राज्यात लोकसभेच्या जागा आहेत, त्यामुळे भाजपचे फोडाफोडीचं राजकारण सुरू असल्याचा घणाघात डॉ. अमोल कोल्हे यांनी केला. 


इतर महत्वाच्या बातम्या :