मुंबई: राज्यासह देशाचं लक्ष ज्या सत्तासंघर्षाच्या (Maharashtra Political Crisis) निकालाकडे लागलं होतं तो निकाल अखेर आलाय. शिंदे-फडणविसांचं सरकार या निकालामुळे वाचलं आणि त्यानंतर सोशल मीडियावर मात्र अनेकांच्या कल्पकतेला अक्षरशः धुमारे फुटलेयत.  कोर्टाच्या निकालावरील मीम्सचा सोशल मीडियावर अक्षरशः पाऊस पडत आहे.


गुरूवारची सकाळ ती सर्वच राजकिय पक्षांच टेन्शन वाढवणारी होती. त्यातही खास करून शिवसेनेच्या ठाकरे गट आणि शिंदे गटांच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांच टेन्शन वाढवणारी होती. जसे  सुप्रीम कोर्टात निकालाच वाचन सुरू झाले तसे या सगळ्यांच टेंन्शन वाढत चालल होतं. पण अखेर दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारास निकालाच वाचन पूर्ण झाले आणि सगळ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला.  त्यानंतर मग सुरू झाली सोशल मीडियावर मिमगीरी सुरू झाले. हे मिम्स इतके भारी आहेत की ते वाचणारा प्रत्येक जण पोट धरून हसत होता. 


काय आहेत मीम्स?



  • इमारत पूर्णतः बेकायदा आहे, मालक बेकायदा आहे, आर्किटेक्ट बेकायदा, बांधणाऱ्यांनी ते बेकायदा बांधलंय..... पण पाडायची की नाही ते बांधणारे ठरवतील! सर्वोच्च निवाडा

  • मुलगी बघण्याचा कार्यक्रम बेकायदेशीर. एकमेकांची पसंती बेकायदेशीर. साखरपुडा बेकायदेशीर. लग्न बेकायदेशीर. हनिमून बेकायदेशीर. पण झालेलं बाळ मात्र कायदेशीर.

  • बाकी सब गलत है, पर लडका अच्छा है.......

  • बॉल नो होता पण बॅट्समनने बॅट सोडली...


हे आणि असे अनेक मिम्स मागच्या काही तासांपासून सोशल मीडियावर धुमाकुळ घालत आहेत 


सरकार राहाणार की जाणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच असणार की बदलणार, सरकार कायदेशीर आहे की बेकायदेशीर, संजय राऊतांच्या रोज सकाळी टीव्हीवर होणाऱ्या दर्शनाचं काय होणार यासह अनेक प्रश्न मागच्या काही महिन्यांपासून गावातील पारापासून ते मंत्रालयातील बाकड्यांपर्यंत विचारले जात होते. अखेर त्या सगळ्यांची उत्तर सुप्रिम कोर्टाच्या निकालानं मिळाली... निकाल कितीही किचकट असला तरी दिवसभराच टेन्शन काहीसे हलके करण्याच काम मात्र या मिम्समुळं जोरदार झालं एवढ मात्र खरं आहे. 


 महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षात मोठा निकाल


राज्यासह संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा अंतिम निकाल समोर आला आहे. तत्कालीन उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी अपात्र ठरवलेल्या 16 आमदारांबाबत सुप्रीम कोर्टाने मोठा निर्णय दिला आहे. सुप्रीम कोर्टाने हे प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडे सोपवलं आहे. आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे या आमदारांचा निर्णय घेणार असल्यामुळे, ते आमदार पात्रच आहेत यावर शिक्कामोर्तब झालं आहे. त्यामुळे ठाकरे गटाला मोठा झटका बसला आहे. या निर्णयामुळे एकनाथ शिंदे यांना मोठा दिलासा मिळाला आहे.