Maharashtra Political Crisis : शिवसेनेचे 18 पैकी 10 खासदारही आमदारांप्रमाणे बंड करण्याच्या तयारीत असल्याचा दावा नांदेडचे भाजप खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी केला आहे. चिखलीकर यांनी यावेळी शिंदेंच्या बंडखोर गटात सामील झालेले शिवसेना आमदार बालाजी कल्याणकर यांच्या पाठीशी असल्याची ग्वाही त्यांनी दिली आहे. तर वर्तमानपत्रात फोटो झळकण्यासाठी जे जिल्हा प्रमुख एकनिष्ठतेची आव आणत आहेत. बालाजी कल्याणकर यांच्या घरावर हल्ला करण्याची भाषा करत आहेत.  त्यामुळे कल्याणकर यांना घाबरण्याची गरज नाही, कारण ते शिवसेना- भाजप युतीचे आमदार आहेत.तर त्यांच्या विजयासाठी भाजप कार्यकर्त्यांनी जीवाचे रान केले आहे. हिंदुत्वाच्या मुद्यावर त्यांनी निवडणूक लढविली आणि आमदार झाले आहेत. त्यामुळे आमदार कल्याणकर यांच्या पाठीशी आम्ही उभे असून त्यांच्या केसालाही धक्का लागणार नाही,असे त्यांनी म्हटलं आहे.


प्रताप पाटील चिखलीकर यांनी पुढं म्हटलं की, ज्या प्रमाणे शिवसेना आमदारांनी बंडखोरी केली आणि ते शिंदे गटात सामील झाले. त्याच पद्धतीने आता शिवसेनेचे 18 पैकी 10 खासदारही त्याच तयारीत असल्याचा गौप्यस्फोट खासदार चिखलीकर यांनी केला आहे.


एकनाथ शिंदे गटाकडून सत्ता स्थापनेच्या चर्चेसाठी एक शिष्टमंडळ


एकनाथ शिंदे गटाकडून सत्ता स्थापनेच्या चर्चेसाठी एक शिष्टमंडळ तयार करण्यात येणार असल्याची माहिती आहे. या शिष्टमंडळात  शंभूराज देसाई, दादा भुसे, भरत गोगावले, बच्चू कडू यांचा समावेश असण्याची शक्यता आहे. या गटाची भूमिका स्पष्ट करण्यासाठी शिष्टमंडळात प्रवक्तेपदही असणार आहे. 


एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या बंडात सामिल असलेले आमदारा आसाममधील गुवाहाटीमध्ये आहेत. मागील पाच दिवसांपासून राज्यात मोठे राजकीय संकट निर्माण झाले आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत असणाऱ्या आमदारांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. सुरुवातीला 12 आमदार शिंदे यांच्यासोबत होते. त्यानंतर आता ही संख्या 40 हून अधिक झाली आहे. शिवसेनेत झालेल्या बंडाळीमुळे राज्यात राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे. शिवसेनेकडूनही डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न सुरू आहे. 


एकनाथ शिंदे यांनी आपल्यासोबत दोन तृतीयांशपेक्षा अधिक आमदार असल्याचा दावा केला आहे. हा गट भाजपसोबत सत्ता स्थापन करण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे यांनी बंडखोर आमदारांसोबत चर्चा करताना एक महाशक्तिचे पाठबळ असल्याचे सूचक वक्तव्य केले होते. त्यानंतर आता, राज्यात सत्ता स्थापन करण्याची हालचाल एकनाथ शिंदे यांनी सुरू केली आहे. सत्ता स्थापन करण्यासाठी शिष्टमंडळ स्थापन करण्यात येणार आहे. आज दुपारी या बंडखोर आमदारांची बैठक होणार आहे. एकनाश शिंदे गटाच्या शिष्टमंडळात शंभूराज देसाई,दादा भुसे,भरत गोगावले, बच्चू कडू यांचा समावेश असण्याची शक्यता आहे. तर, माध्यमांमध्ये व्यवस्थित भूमिका मांडण्यासाठी  प्रवक्तादेखील असणार आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Maharashtra Political Crisis Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांचा आरोप; राजकीय आकसाने मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांनी सुरक्षा काढली


Memes : 'काय झाडी, काय डोंगार, काय हाटील!' शहाजीबापूंच्या व्हायरल कॉलनंतर मिम्सचा सोशल मीडियावर महापूर


Sanjay Raut : शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत
 
Maharashtra Political Crisis Eknath Shinde: शिवसेनेच्या बंडाची लढाई आता कोर्टात; शिंदे गट घेणार सुप्रीम कोर्टात धाव