Eknath Shinde First Reaction :  शिवसेनेतून बंड केल्यानंतर शिवसेना नेते  एकनाथ शिंदे यांनी जवळपास 20 तासानंतर पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली (Eknath Shinde First Reaction) आहे. सत्तेसाठी बाळासाहेबांच्या शिकवणीशी प्रतारणा करणार नाही असे शिंदे यांनी म्हटले. सोमवार रात्रीपासून एकनाथ शिंदे आपल्या समर्थक आमदारांसह सूरतमध्ये दाखल झाले आहेत. 


 






शिवसेनेत पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणावर बंड झाले आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर आता राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या स्थिरतेबाबत प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. एकनाथ शिंदे यांनी म्हटले की, आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत. बाळासाहेबांनी आम्हाला हिंदुत्वाची शिकवण दिली आहे. बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण यांच्याबाबत आम्ही सत्तेसाठी कधीही प्रतारणा केली नाही आणि करणार नाही.


एकनाथ शिंदे यांच्या ट्वीटनंतर आता अनेक अर्थ काढले जाऊ लागले आहेत. एकनाथ शिंदे आता आनंद दिघे यांच्या नावाने स्वत:ची संघटना स्थापन करू शकतात. त्यातून भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारला पाठिंबा देऊ शकतात. एकनाथ शिंदे यांनी ट्वीटनुसार त्यांनी हिंदुत्वाची भूमिका मांडली असून काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सरकार चालवण्यास अनुत्सुक असल्याचे संकेत दिले आहेत. 


दरम्यान, शिवसेनेत झालेल्या बंडाळीवर महाविकास आघाडीमधील राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचेही लक्ष आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी चर्चा केली. त्याशिवाय, अजित पवार यांच्या दालनात राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी अजित पवार यांच्यासोबत चर्चा केली. 


इतर महत्त्वाच्या बातम्या: