Eknath Shinde : नाराज शिवसेना आमदारांना घेऊन गुजरातमध्ये दाखल झालेल्या नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना पहिला झटका बसला आहे. शिवसेनेकडून त्यांच्याशी संपर्क साधण्यासाठी प्रयत्न सुरु असतानाच त्यांच्यावर मोठी कारवाई झाली आहे. एकनाथ शिंदे यांची शिवसेनेच्या गटनेतेपदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे.
दरम्यान, एकनाथ शिंदे यांची गटनेतेपदावरून हकालपट्टी केल्यानंतर त्यांच्या जागी अजय चौधरी यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे शिवसेनेकडून एकनाथ शिंदे यांना कोणतीही सहानुभूती दाखवली जाणार नाही, असा स्पष्टच संदेश दिल्याचे बोलले जात आहे. दुसरीकडे त्यांची भूमिका समजावून घेण्यासाठी तसेच मुख्यमंत्र्यांच्या निरोप घेऊन मिलिंद नार्वेकर सुरतच्या दिशेने रवाना झाले आहेत. त्यांच्यासोबत विकास फाटकही आहेत.
दरम्यान, शिवसेनेच्या कारवाईनंतर एकनाथ शिंदे यांनीही ट्विट करून प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे टायमिंगची चर्चा पुन्हा रंगली आहे. ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत. बाळासाहेबांनी आम्हाला हिंदुत्वाची शिकवण दिली आहे. बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण यांच्याबाबत आम्ही सत्तेसाठी कधीही प्रतारणा केली नाही आणि करणार नाही. यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा उल्लेख नसल्याने एकनाथ शिंदे नेमकी काय भूमिका घेणार ? याकडे आता लक्ष आहे
एकनाथ शिंदेंसोबत सूरतमध्ये कोणते आमदार ?
मुंबई
1. मागााठाणे आमदार प्रकाश सुर्वे
मराठवाडा
1. सिल्लोडचे आमदार आणि राज्यमंत्री अब्दुल सत्तार.
2. पैठणचे आमदार आणि राज्यमंत्री संदिपान भुमरे
3. औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट
4. कन्नडचे आमदार उदयसिंग राजपूत
5. वैजापूरचे आमदार प्रा. रमेश बोरनारे
6. नांदेडचे बालाजी कल्याणकर
कोकण
1. अलिबागचे आमदार महेंद्र दळवी
2. कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे
3. महाडचे आमदार भरतशेठ गोगावले
पश्चिम महाराष्ट्र
1. आटपाडीचे आमदार अनिल बाबर
2. भुदरगडचे आमदार प्रकाश अबिटकर
3. पाटणचे आमदार आणि गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई
4. सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील
5. साताऱ्यातील कोरेगावचे आमदार महेश शिंदे
ठाणे
1. अंबरनाथचे आमदार बालाजी किणीकर
2. पालघरचे आमदार श्रीनिवास वनगा
3. भिवंडी ग्रामिणचे आमदार शांताराम मोरे
4. कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर
उत्तर महाराष्ट्र
1. पाचोराचे आमदार किशोर आप्पा पाटील
विदर्भ
1. मेहकरचे आमदार संजय रायमुलकर
2. बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड