Bhagat Singh Koshyari On Uddhav Thackeray :  उद्धव ठाकरे संत प्रवृत्तीची व्यक्ती आहे, पण ते ट्रॅपमध्ये अडकले असं वक्तव्य महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले आहे. एबीपी माझाला दिलेल्या exclusive मुलाखतीत भगत सिंह कोश्यारी यांनी अनेक खळबळजनक वक्तव्यं आणि दावे केले आहेत. उद्धव ठाकरे यांच्याबद्दल त्यांनी आपलं मत मांडले. त्याशिवाय पहाटेचा शपथविधी, 12 आमदारांची नियुक्ती आणि बऱ्याच मुद्द्यांवर राज्यपालांनी भाष्य केलं. 


उद्धव ठाकरे संत प्रवृत्तीची व्यक्ती आहे, पण ते ट्रॅपमध्ये अडकले. उद्धव ठाकरेंना राजकारण किती कळतं, हे मी नाही सांगू शकत नाही. कुणाचा ट्रॅप होता?, हे मला माहिती नाही. डोक्यानं विचार केला असता तर असं झालं नसतं, असे कोश्यारी म्हणाले. 


आदित्य ठाकरे मुलासारखा -
माझे कुणाशीही संबंध खराब झाले नाहीत.  भुजबळ, अजित पवार सर्वांशी संबंध चांगले आहेत. आदित्य ठाकरे तर मला माझ्या मुलासारखे आहेत. मी चांगल्या-वाईटासाठी काम करत नाही. मी कामासाठी काम करतो, असे कोश्यारी म्हणाले. जिथे त्यांची चूक झाली तिथे मी बोललो. महाराजांबाबत दुसऱ्या दिवशीच स्पष्टीकरण दिलं. मी लगेच निर्णय घेतला तर अडचण, मी निर्णय लगेच नाही घेतला तरी अडचण, असे कोश्यारी म्हणाले. 


12 आमदारांवर काय म्हणाले?
जातानाही मी 12 आमदारांचं पत्र मंजूर केलं नसतं, राज्यपाल पदाची काही प्रतिष्ठा नाही का? मविआची किती बिलं मंजूर केली. 12 आमदारांच्या पत्राबाबत मविआकडून धमकी देण्यात आली. नावं 15 दिवसात मंजूर करण्याची धमकी दिली होती. मला धमकी दिली तर कसं मी मंजूर करणार असे राज्यपाल म्हणाले.  मला कोणत्याही नावावर आक्षेप नव्हता. माझा आक्षेप पत्रातील भाषेवर होता. काहींना नंतर विधानपरिषद, राज्यसभेवर पाठवलं. पत्रातील नावं सातत्यानं बदलली गेली. राज्यपालपदाच्या प्रतिष्ठेला मविआनं ठेच पोहोचवली, असा आरोप कोश्यारींनी केला. 


महाविकस आघाडी दावा करत होती की, राज्यपालांनी इतकी घाई का केली? आम्हाला का नाही संधी दिली, असा प्रश्न भगतसिंह कोश्यारी यांना केला असता ते म्हणाले आहेत की, ''माझ्याकडे जेव्हा त्यांच्याच पक्षाचा एक प्रमुख नेता (अजित पवार) येऊन याबद्दल बोलतो. तर मला असं वाटतं यानंतर त्यांना (महाविकास आघाडीला) बोलण्याचा कोणताच अधिकार राहत नाही. तुम्ही मला सांगत आहात (मविआ), ती व्यक्ती जर इतकी महत्वाची नसती, मग त्यांनी का त्या व्यक्तीला इतकं महत्व दिलं? त्याला उपमुख्यमंत्री बनवलं?,'' 


आणखी वाचा :


Bhagat Singh Koshyari On Fadnavis-Pawar Swearing: पहाटेच्या शपथविधीवर माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पहिल्यांदाच सोडलं मौन, म्हणाले..