Jitendra Awhad : "शरद पवारांची (Sharad Pawar) राजकीय हत्या करण्यासाठी हा कट रचला जात आहे, असा हल्लाबोल जितेंद्र आव्हाड यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयावर केला आहे. राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळाचं चिन्ह हे निवडणूक आयोगाने (Election Commission) अजित पवार (Ajit Pawar) गटाला देण्याचा निर्णय घेतला आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयावर जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.    


निवडणूक आयोगवर ताशेरे ओढताना आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले की, आम्ही निवडणूक आयोगाकडे पर्याय मागितले होते पण त्यांनी आम्हाला पर्याय दिलेच नाहीत. आमच्याकडे तसं पत्र आहे. याचाच अर्थ निवडणूक आयोग एकतर खोटं तरी बोलतंय किंवा निवडणूक आयोग विसरभोळं आहे. निवडणूक आयोगाच्या सांगण्यावरून आम्ही त्यांना तीन पर्याय दिले होते पण त्याकडे लक्षच दिलं गेलं नाही असं आव्हाड म्हणाले. 


शरद पवारांना संपवण्यासाठी राजकीय कट


तसेच, जितेंद्र आव्हाड पुढे म्हणाले की, शरद पवारांना संपवण्यासाठी त्यांची राजकीय हत्या करण्यासाठी, तसेच त्यांचं राजकीय वजन कमी करण्यासाठी किती मोठा कट रचला जातोय. पण, यामुळे महाराष्ट्राच्या जनतेच्या भावना किती दुखावल्या जातायत याची कल्पना निवडणूक आयोगाला नाहीये. निवडणूक आयोगासारखी महत्त्वाची संस्था जर कायदेशीररित्या चालणार नसेल आणि बेकायदेशीररित्या निर्णय घेणार असेल तर हे सगळं हास्यास्पद आहे असंही त्यांनी पुढे स्पष्ट केलं आहे. 84 वर्षांच्या माणसाला संपवण्यासाठी इतकी मोठी राजकीय ताकद खर्च करणं, त्यांना मरणासन्न यातना देणं हे अजित पवार (Ajit Awhad) आणि कंपनीला शोभत नाही अशा शब्दांत आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ताशेरे ओढले आहेत.


निवडणूक आयोग खोटं बोलतंय 


आम्ही निवडणूक आयोगाला पर्याय दिले होते. पण, निवडणूक आयोग म्हणतंय की दोन्ही पक्षांनी पर्यायच दिले नव्हते. याचाच अर्थ निवडणूक आयोग खोटं बोलतंय. निवडणूक आयोगासारखी महत्त्वाची संस्था जर कायदेशीररित्या चालणार नसेल आणि बेकायदेशीररित्या निर्णय घेणार असेल तर हे सगळं हास्यास्पद आहे अशा शब्दांत जितेंद्र आव्हाड यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयावर हल्लाबोल केला आहे. तसेच, निवडणूक आयोगाचा हा निर्णय आपल्याला मान्य नाही असंही यावेळी बोलताना ते म्हणाले. 


पाहा व्हिडीओ :



महत्त्वाच्या बातम्या : 


Rohit Pawar : पक्ष, चिन्ह कोणालाही मिळू दे पण ज्या बापाने ती पार्टी सुरु केली असा बापमाणूस आमच्याबरोबर : रोहित पवार