सुरेश धस आज (गुरुवार) उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यावेळी निलंगेकर उपस्थित राहणार नसल्याचं समजतं आहे.
संभाजी पाटील निलंगेकरांचे भाऊ अरविंद निलंगेकरांना उमेदवारी मिळावी म्हणून प्रयत्नशील होते. पण त्यांना उमेदवारी मिळाली नाही. त्यामुळे ते नाराज असल्याचं कळतं आहे.
VIDEO :
21 मे रोजी मतदान, 24 मे रोजी निकाल
स्थानिक स्वराज्य संस्थांतून विधानपरिषदेवर निवडून द्यावयाच्या सहा जागांसाठी 21 मे रोजी निवडणूक होत आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची 3 मे अंतिम तारीख आहे.
21 मे रोजी मतदान होईल, तर 24 मे रोजी मतमोजणी होणार आहे.
रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग, नाशिक, उस्मानाबाद-लातूर-बीड, परभणी-हिंगोली, अमरावती आणि चंद्रपूर या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात ही निवडणूक होणार आहे..