मुंबई: राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्या कमी होत असली तरी ओमायक्रॉन व्हेरियंटच्या रुग्णसंख्येत मात्र काहीशी चढ-उतार होत असल्याचं पहायला मिळतंय. राज्यात आज ओमायक्रॉनच्या 91 रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात आतापर्यंत ओमायक्रॉनच्या 3221 रुग्णांची नोंद झाली आहे तर 1682 रुग्ण बरे झाले आहेत. 


राज्यात आतापर्यंत 6716 लोकांची ओमायक्रॉन चाचणी करण्यात आली असून त्यापैकी 6626 अहवाल प्राप्त झाले आहेत. 90 नमुन्यांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत. 


राज्यात आज नागपूरमध्ये 18 रुग्ण तर औरंगाबाद, रायगड आणि नवी मुंबईमध्ये प्रत्येकी 11 रुग्णांची नोंद झाली आहे. सिंधुदुर्ग आणि साताऱ्यात प्रत्येकी 5 रुग्णांची नोंद झाली आहे. पुणे शहरात आतापर्यंत 1238 रुग्णांची नोंद झाली आहे तर आजच्या दिवशी केवळ 4 रुग्ण सापडले आहेत. मुंबई महापालिका क्षेत्रात आतापर्यंत 1062 रुग्णांची नोंद झाली आहे तर आज 8 रुग्ण सापडले आहेत. 


राज्यातील स्थिती
गेल्या 24 तासात राज्यात कोरोनाच्या 15 हजार 140  नव्या रुग्णांची भर पडली असून 39 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात गेल्या 24 तासात 35 हजार 423  रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. राज्यात आज 39 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 1.85 टक्के झाला आहे. राज्यात आतापर्यंत 73 लाख 67 हजार 259 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.42 टक्के आहे.  सध्या राज्यात 11 लाख 74 हजार 825 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 2798 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आजपर्यंत 7 कोटी 46 लाख 29 हजार 449 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.


मुंबईतील कोरोना रुग्णांची स्थिती
मुंबईत सोमवारी कोरोनाचे 960 नवे रुग्ण आढळले असून 11 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. ज्यामुळे कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या 16 हजार 623  झाली आहे. तर गेल्या 24 तासांत 1 हजार 837 जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के इतका आहे.


 


महत्त्वाच्या बातम्या: