मुंबई :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकीचा मेल मुंबईतील NIA कार्यालयामध्ये आल्याने मोठी खळबळ उडाली होती.  मुंबईच्या NIA विभागाला काही दिवसांपूर्वी एक  धमकीचा मेल आला होता. यात पंतप्रधान मोदी यांना जिवे मारण्याचा उल्लेख केला होता. यानंतर NIA कडून सर्व तपास यंत्रणांना या मेलची गंभीर दखल घेण्यात आली. मुंबई पोलिसांनी केलेल्या तपासात धमकी देणारी व्यक्ती ही मनोरुग्ण असून ती महाराष्ट्राच्या बाहेर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकीचा मेल  करणारी  ही व्यक्ती मनोरुग्ण असल्याने या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला नाही.  तपसात हे देखील समोर आले आहे की, ही व्यक्ती इंजिनिअर असून तो 'अटेन्शन सिकर' या आजाराने तो त्रस्त असल्याचे सांगितले जाते. हा मेल कुठून आला हे समजू शकत नसल्यामुळे सर्वच तपास यंत्रणांना अलर्ट राहण्यास सांगण्यात आले होते.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याच्या धमकीचा मेल आला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मारण्यासाठी 20 स्लीपर सेल तयार आहेत. त्यांच्याकडे 20 किलो आरडीएक्स असल्याचेही मेलमध्ये म्हटले आहे.  धक्कादायक म्हणजे, धमकी देणाऱ्याने दहशतवाद्यांशी संबंध असल्याचा दावाही केलाय. याशिवाय या मेलमध्ये दोन कोटी लोकांनादेखील जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. इतकेच नाही तर, या कटाचा पर्दाफाश होऊ नये म्हणून आपण आत्महत्या करत आहे, असेही ईमेल करणाऱ्याने म्हटले आहे.  deccanherald ने याबाबतचे वृत्त दिले आहे. 


संबंधित बातम्या : 


PM Modi : 20 स्लीपर सेल, 20 किलो RDX, पंतप्रधान नरेंद्र मोदींना जीवे मारण्याची धमकी