अमरावती : अमरावतीमधील चिखलदरा या पर्यटनस्थळी आता काचेचा स्कायवॉक उभारण्याचा मार्ग मोकळा झालाय. केंद्र सरकारच्या वन विभागानं परवानगी अभावी हे काम सहा महिन्यांपूर्वी थांबवलं होतं. मात्र आता परवानग्यांचं काम पूर्ण झाल्यानं या स्कायवॉकचं काम पुन्हा सुरू होणार आहे. अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा क्षेत्रातील टायगर ब्लॉक प्रोजेक्ट अंतर्गत सिडकोकडून हा स्कायवॉक उभारण्यात येतोय. लवकरच याचं काम पूर्ण होईल अशी ग्वाही पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी दिलेय.


विदर्भाचे काश्मीर म्हणून ओळख असलेल्या अमरावतीच्या चिखलदरा येथे स्काय वॉक सुविधा पर्यटकांसाठी उपलब्ध होणार आहे. हा स्काय वॉक भारतातील पहिला असून जगातील तिसरा आहे. हा स्काय वॉक पूर्णपणे काचेचा असेल. त्यामुळे आता अमरावतीच्या चिखलदरामध्ये राज्यातूनच नव्हे देश-विदेशातून पर्यटकांची गर्दी वाढेल.


मेळघाटच्या चिखलदरातील गोराघाट पॉईंट पासून ते हरीकेन पॉईंटपर्यंत स्काय वॉक 407 मीटरचा हा प्रकल्प 2018 मध्ये प्रस्तावीत करण्यात आला आहे. यासाठी 34.34 कोटी रुपये खर्च होणार आहे. याचे जलद गतीने काम देखील सुरू आहे. भारतातील पहिला आणि जगातील तिसरा हा गगन भरारी पूल आहे. दोन मोठ्या टेकड्यांना स्काय वॉकने जोडण्यात येईल. हा स्काय वॉक पूर्णपणे काचेचा असेल. यामुळे पर्यटकांकरिता एक नवे आकर्षण निर्माण होईल. स्काय वॉकच्या माध्यमातून या भागात पर्यटकांची संख्याही वाढेल. मेळघाटातील चिखलदरा हा भाग सिडकोद्वारा विकसीत करण्यात येत आहे. त्यामुळे आता अमरावतीच्या चिखलदरामध्ये देशातूनच नव्हे तर परदेशातून पर्यटकांची गर्दी वाढेल. जगात स्वित्झर्लंड आणि चायना या ठिकाणी स्कायवॉक आहे. स्वित्झर्लंडचा स्कायवॉक हा 397 मीटरचा आहे. तर चायनाचा स्कायवॉक 360 मीटरचा आहे. त्यामुळे चिखलदरा येथे होत असलेला स्कायवॉक हा जगातील तिसरा असला तरी जगातील सर्वांत मोठा स्कायवॉक ठरणार आहे..


चिखलदरा पर्यटन विकासाच्या आराखड्यात स्काय वॉकचा समावेश करण्यात आला आहे. पर्यटनाच्या दृष्टीने चिखलदरा येथे दोन टेकड्यांना जोडणारा हा भारतातील पहिला स्काय वॉक राहणार आहे. गोरा घाट पॉईंट पासून तर हरिकेन पॉईंट पर्यंत पाचशे मीटरचा हा स्कायवॉक असणार आहे. 


हे देखील वाचा-



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha