मुंबई : शरद पवारांकडून (Sharad pawar)  राज्यभरातील विविध ब्राह्मण संघटनांना चर्चेचं निमंत्रण देण्यात आले आहे. शरद पवार हे ब्राह्मणविरोधी (Brahman) असल्याची मतं सोशल मीडियावर (Social Media) काही जणांकडून व्यक्त केली जातात याबाबत या बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती देखील मिळत आहे. तर या बैठकीला आनंद दवेंच्या ब्राह्मण महासंघासह काही संघटनांचा विरोध आहे. मात्र इतर संघटना चर्चेसाठी तयार आहेत.


 पुण्यातील निसर्ग मंगल कार्यालयात संध्याकाळी पाच वाजता या बैठकीचे आयोजन करण्यात आलंय. या बैठकीसाठी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाबरोबर विविध ब्राम्हण संघटनांना आमंत्रित करण्यात आलय.  राष्ट्रवादीच्या काही नेत्यांकडून ब्राम्हण समाजाबाबत करण्यात आलेल्या वक्तव्यांबाबतची नाराजी शरद पवारांकडे मांडणार असल्याच ब्राह्मण संघटनांच्या प्रतिनिधींनी म्हटलय. तर दुसरीकडे शरद पवारांबद्दल सोशल मीडियावर व्यक्त करण्यात येणारी मतांबाबत देखील या बैठकीत चर्चा होणार आहे.


 ब्राह्मण संघाचे आनंद दवे (Anand Dave) म्हणाले, आमचा शरद पवार यांना व्यक्तिगत विरोध नाही. त्यांच्या मतदार संघातील ब्राह्मण समाज सुद्धा त्यांच्यावर नाराज आहे. शरद पवार राजकीय फायद्यासाठी ब्राह्मण समाजाचा वापर करतातं हे निश्चित. त्यांनी मिटकरी, भुजबळ यांच्या वक्त्यवांबाबत भूमिका स्पष्ट करावी एवढीच अपेक्षा आहे. ज्या वेळेस शरद पवार किंवा राष्ट्रवादीच्या नेत्यांनी ब्राह्मणांबाबत जातीय उल्लेख केले आहेत त्या वेळेस इतर राजकीय पक्ष मूग गिळून गप्प असतात, हे दुर्दैवी सत्य आहे. 


शरद पवारांची भूमिका कधी कुणाला कळलीय का?, देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल


 राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांची भूमिका कधी कुणाला कळली आहे का?, असा खोचक टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे. शुक्रवारी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. छत्रपती संभाजीराजे यांच्या राज्यसभा निवडणुकीवरुन देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांना टोला लगावला आहे. 



संबंधित बातम्या :


Devendra Fadnavis : शरद पवारांची भूमिका कधी कुणाला कळलीय का?, देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल


Ram Shinde : संभाजीराजेंना चांगली वागणूक दिली नाही म्हणणे ही शरद पवारांची डबल ढोलकी, राम शिंदेंची टीका