Sharad Pawar News: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांचं (Sharad Pawar) आत्मचरित्र लोक माझे सांगातीच्या सुधारीत आवृत्तीचे आज मुंबईत प्रकाशन झाले. दरम्यान या पुस्तकाचे प्रकाशन झाल्यानंतर शरद पवारांनी आपल्या भावना व्यक्त करत राष्ट्रवादी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावरून निवृत्त होण्याची घोषणा केली. त्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठं भूकंप आला असून, यावर आता अनेक राजकीय प्रतिक्रिया येत आहे. दरम्यान यावरच काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया आली आहे. राष्ट्रवादी पक्षाचे जे कोणी नवीन अध्यक्ष असतील ते महाविकास आघाडीसोबत राहिल. त्यामुळे या सर्व गोष्टीचा महाविकास आघाडीवर कोणताही परिणाम होणार नसल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) म्हणाले आहेत. 


शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष पदावरुन निवृत्त होत असल्याची घोषणा केली. मात्र त्यांनी असा निर्णय का घेतलाय? याबाबत सांगणे कठीण आहे. गेल्या काही दिवसांपासून अजित पवारांबद्दल येत असलेल्या बातम्या असतील किंवा त्यांच्या तब्येतीचं कारण असेल. आता याबाबत सांगणे कठीण असून, त्यांची भेट झाल्यावर याबाबत काय ते कळेल. मात्र शरद पवार शेवटपर्यंत राजकीय आणि सामजिक जीवनात सक्रीय राहतील अशी आम्हाला अपेक्षा आहेत. पण राष्ट्रवादी पक्षाचे जे कोणी नवीन अध्यक्ष असतील ते महाविकास आघाडीसोबत राहिल. त्यामुळे या सर्व गोष्टीचा महाविकास आघाडीवर कोणताही परिणाम होणार नसल्याचे नाना पटोले म्हणाले आहेत. 


पवारांच्या अनुभवाचा नेहमीच सर्वाना फायदा 


शरद पवार यांनी घेतेलेला निर्णय त्यांच्या पक्षांतर्गत निर्णय आहे. शरद पवार हे एक अनुभवी नेते आहेत. त्यांच्या अनुभवाचा नेहमीच सर्वाना फायदा झाला आहे. राष्ट्रवादी पक्षासोबतच इतर राजकीय पक्षांना देखील त्यांच्या या अनुभवाचा फायदा झाला आहे. त्यांनी कुठल्या कारणाने राजीनामा दिला हे सांगणे कठीण राहणार आहे. त्यामुळे यावर आज चर्चा करणे योग्य राहणार नाही. पण याचा महाविकास आघाडीवर कोणताही परिणाम होणार नाही. पण त्यांच्या पक्षात त्यांनी काय निर्णय घ्यावा हे त्यांचा भाग असून, त्यात आम्ही हस्तक्षेप करणे योग्य नाही आणि ते करू देखील नाही, असे नाना पटोले म्हणाले आहेत. विशेष म्हणजे ज्या विचारसरणीने राष्ट्रवादी पक्षाची स्थापना झाली आहे, त्याच विचारसरणीने नवीन अध्यक्ष काम करतील अशी अपेक्षा असल्याचं देखील नाना पटोले म्हणाले.  


इतर महत्वाच्या बातम्या: 


Sharad pawar speech : 'राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होणार', घोषणा करतानाचं शरद पवारांचं भाषण जसेच्या तसे