Abdul Sattar: कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar)  यांनी आपल्याच गटातील एक नेता विरोधकांना पुरावे देत असल्याचा उल्लेख केला होता. अब्दुल सत्तार हा नेता कोण आहे हे सांगत जरी नसले तरी राजकीय विश्लेषकांच्या मते त्यांचा अंगुली निर्देश हा संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांच्याकडे आहे. त्यामुळे आता शिंदे गटात अंतर्गत वाद सुरु झाला आहे का अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. 


मंत्रिमंडळाच्या  वाटपावेळी  टीईटी घोटाळा बाहेर येतो. सुप्रिया सुळे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर माफी मागितल्यानंतरही प्रकरण वाढवलं जातं. गायरान जमिनीवरून घेरलं जातं आणि कृषी महोत्सवात वेगवेगळे पासेस छापून वसूलीचा आरोप होतो. या सगळ्याच्या मागे आपल्याच पक्षातील एक नेता असल्याचं कृषिमंत्री अब्दुल सत्तार म्हणतात. सत्तारांच्या या वक्तव्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात शिंदे गटात खळबळ उडाली आहे. एवढच नाही तर अब्दुल  सत्तार म्हणतात  त्या नेत्याला माझं मंत्रिपद गेल्यावर मंत्रिपद मिळेल असं वाटतं. सत्तारांच्या या वक्तव्यावरून शिंदे गटात सगळं काही अलबेला नाही हे स्पष्ट होतं


मिळलेल्या माहितीनुसार  कृषी महोत्सवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सत्तार यांना हे प्रकरण न वाढवण्याचा सल्ला दिला. तसेच कोणाचं नाव घेऊ नये या बाबत सूचना ही केल्याची माहिती आहे . शिंदे गटाकडून हे प्रकरण वाढू नये याची पुरेपूर काळजी घेतली जात आहे.  


संजय शिरसाट आणि अब्दुल सत्तारात नेमका वाद काय? 



  • शिंदे फडणवीस सरकार येताच आपण मंत्री असल्याचं संजय शिरसाठांनी घोषित केले होतं. एवढंच नाही तर आपण पालकमंत्री आणि सामाजिक न्याय मंत्री होणार असल्याचेही अनेकांना सांगत होते. 

  • मंत्रीपदाच्या यादीत आपलंच नाव होतं पण  रात्रीतून ते सत्तारांमुळे कट झालं असं त्यांचं मत झालं.

  • खरंतर औरंगाबाद येथून पाच आमदार शिंदे गटात गेले होते. त्यामध्ये  संदिपान भुमरे आणि अब्दुल सत्तार मंत्री होते. त्यामुळे मंत्रिमंडळाच्या विस्तारात एका शहरातून तीन मंत्र्यांचा नंबर लागेल आणि तोही कॅबिनेट हे शक्य नव्हतं. त्यामुळे आपला नंबर केवळ सतरांमुळे लागला नाही असा त्यांचा भ्रम होता.

  • इकडे सत्तारांना देखील आपल्याला मंत्रिपदाचा पत्ता कट व्हावा म्हणून आदल्या दिवशी टीईटी घोटाळा ही आपल्याच एका नेत्यांनी काढल्याचे म्हटलं आणि तेही मंत्रीपदासाठी असं त्यांना वाटायचं.

  • पुढे आपल्याला मंत्रिपद जावं आणि त्यासाठी आपलाच नेता कट करत असल्याचे तर त्यांनी स्पष्टच बोलले. त्यामुळे मंत्रीपदाच्या ओढाताणासाठी दोन्ही नेते एकमेकांच्या विरोधात उभा टाकल्याचं समोर येत आहे.


शिंदे, फडणवीस सरकार सत्तेत येऊन वर्षही होत नाही तोपर्यंतच शिंदे गटात राजकीय महत्वकांक्षीपोटी  दोन नेत्यांमध्ये लढाया सुरू झाल्याचे पाहायला मिळतंय. त्यामुळे शिंदे गटातील नेते मंत्रीपदासाठी एकमेकांचे पंख छाटू लागले आहेत असंही सत्तारांच्या वक्तव्यावरूनच स्पष्ट होत आहे .आता हा वाद कुठल्या स्तराला जाऊन पोहोचणार की हा वाद मिटवण्यात एकनाथ शिंदेला यश येणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.