समृद्धी महामार्गामुळे (Samruddhi Highway) राज्यातील मुंबई आणि नागपूर या दोन शहरांमधील अंतर तसेच प्रवासाचा वेळ कमी होणार आहे. समृद्धी महामार्गामुळे (Hindu Hrudaysamarat Balasaheb Thackeray Maharashtra Samruddhi Mahamarg) विदर्भ, मराठवाड्यातील प्रवाशांना फायदा होणार आहे. देशातील सर्वाधिक लांबीचा महामार्ग समृद्धी महामार्ग लवकरच सर्वांसाठी खुला होणार आहे.
701 किलोमीटरच्या या महामार्गापैकी 440 किलोमीटर लांबीचं काम पूर्ण झालं आहे आणि याच नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे 2 मे रोजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. नागपूर ते वाशिम जिल्ह्यातील सेलू बाजार असा 210 किलोमीटरचा मार्ग पहिल्या टप्प्यात वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने पुढील मार्ग वाहतुकीसाठी सुरू करण्याचा एमएसआरडीसीचा विचार आहे. या प्रकल्पासाठी जवळपास 55 हजार कोटी रुपये खर्च प्रस्तावित आहे. हा महामार्ग 10 जिल्हे, 26 तालुके, 392 गावांमधून जाणारा आहे. साधारणत: जून 2023 पर्यंत संपूर्ण महामार्गा वाहतूकीसाठी खुला होण्याचा अंदाज आहे.
मुंबई नागपूर महामार्गाचा पहिल्या टप्प्यांचं उद्घाटन होतंय. पुढच्या तीन महिन्यात नागपूर ते शिर्डी महामार्ग सुरु करण्याचा इरादा सरकारचा आहे आणि संपूर्ण महामार्ग 2023 साली सुरू होईल असा विश्वास एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला आहे. तसेच उद्घाटन म्हटले की, श्रेयवाद आलाच आमंत्रण निमंत्रणावरून नाराजी आलीच. मेट्रोच्या कार्यक्रमात याआधी आपण काही नाराजीनाट्य पाहिली आहेतच त्यामुळे विकासकामांसाठी सर्वांनी एकत्र राहण्याचं आवाहन एकनाथ शिंदेंनी केले आहे.
समृद्धी महामार्गामुळे किती तासांत कुठे पोहचणार?
- मुंबई ते नागपूर हा प्रवास 8 तासांचा असेल
- मुंबई ते औरंगाबाद अवध्या 4 तासांचा असेल
- औरंगाबाद ते नागपूरही 4 तासांचा असेल
- नागपूर ते शिर्डीचा प्रवासही 5 तासांचा असेल
संबंधित बातम्या :