Sanjay Shirsat On Sushma Andhare : ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्याचा आरोप शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांच्यावर करण्यात आला आहे. तर संजय शिरसाट यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करत, राज्यभरातील ठाकरे गटाचे नेते आक्रमक होताना पाहायला मिळत आहे. दरम्यान या सर्व आरोपांवर संजय शिरसाट यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली आहे. सुषमा अंधारेंबद्दल एकही शब्द 'अश्लील' बोलल्याचा दाखवा, मी तत्काळ राजीनामा देतो, अशी भूमिका शिरसाट यांनी मांडली आहे. 


माझ्यासाठी सत्ता महत्वाची नाही. मी चुकीचे काहीही बोललो असल्याचं सिद्ध केल्यास मी लगेच माझ्या आमदारकीचा राजीनामा देण्यासाठी तयार असल्याचे शिरसाट म्हणाले. तर महिलेचा अपमान झाला असल्याचे म्हटले जात आहे. पण जर महिला आहे तर महिलेसारखं बोललं पाहिजे. गुलाबराव पाटील यांच्या मतदारसंघात जाऊन त्यांना शिव्या दिल्या, अब्दुल सत्तार यांच्या मतदारसंघात जाऊन त्यांना देखील शिव्या दिल्या. आमच्या आमदारांच्या मतदारसंघात जाऊन अशाप्रकारे शिव्या देण्याचं कंत्राट यांना कोणी दिले आहे. महिला म्हणून आम्ही काहीच बोललोच नाही, पण त्याचा बाऊ करण्यात आला. यांची पार्श्वभूमी जर पहिली तर यांनी आत्तापर्यंत काय-काय बोलले याची रेकॉर्डिंग आहे. याच सुषमा अंधारे या हिंदू देवतांना बद्दल काय बोलल्या, मराठा समाजा बद्दल काय बोलल्या, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याबद्दल काय बोलल्या असून, त्यांना हा अधिकार कोणी दिला आहे असेही शिरसाट म्हणाले. 


सुषमा अंधारे यांच्यासारखं अभिनेता कोणेही नाही


दरम्यान पुढे बोलताना शिरसाट म्हणाले की, इतरांबद्दल आपण काहीही वक्तव्य करायचे. पण अशावेळी एखांद्याला राग आला आणि त्याने वक्तव्य केले तर सर्व महिलांचा अपमान झाला असे बोंबलायचं असे शिरसाट म्हणाले. त्यांची पत्रकार परिषेद पाहून आलो असून, मी काय वाईट बोललो हे मला कळालेच नाही. तर त्यांच्या चेहऱ्यावरून तर नक्कीच कळाले नाही. अपमान झाल्यावर जी भावना असते, संतापाची भावना असते, ती भावना काही सुषमा अंधारे यांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळाली नाही. त्या संपूर्ण पत्रकार परिषदेत हसत होत्या. त्यामुळे त्यांचंसारखं अभिनेता कोणेही नाही, अशी टीका शिरसाट यांनी केली आहे. 


आमदारकी उडत गेली...


दरम्यान माझ्या विरोधात आंदोलन करण्यात आले.  माझ्याविरोधात आंदोलन करण्यासाठी आज  मातोश्रीवरून फोन गेला. तेव्हा ठाकरे गटाच्या महिला आंदोलनासाठी आल्या होत्या. माझा विरोध आंदोलन करून केला, पण राजकारणात समोरा समोर लढलं पाहिजे. तुम्हाला लढायचं तर समोर या, माझ्याबद्दल मी काहीही खपवून घेणार नाही. जशास तसे उत्तर देणार असून, गेली उडत ती आमदारकी अशा शब्दात शिरसाट यांनी आपल्यावरील आरोपाला उत्तर दिले.


इतर महत्वाच्या बातम्या :


Sanjay Shirsat : संजय शिरसाटांच्या विरोधात छ. संभाजीनगरमध्ये जोडे मारो आंदोलन; जोरदार घोषणाबाजीही