Supriya Sule : खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना झेड प्लस सुरक्षा दिली पाहिजे, अशी माझी सरकारकडे मागणी असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केलं. याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनाही बोलणार असल्याचे सुळे म्हणाल्या. दरम्यान, झेपत नसेल तर देवेंद्र फडणवीसांनी (DCM Devendra Fadnavis) गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या. 


संजय राऊत हे देशाचे मोठे नेते आहेत. त्यांच्याबद्दल असं बोलणं जाणं दुर्दैवी आहे. गृह मंत्रालयाचं हे टोटल अपयश असल्याचे सुळे यावेळी म्हणाल्या. संजय राऊतांना झेड प्लस सुरक्षा देण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना बोलणार असल्याचे सुळे म्हणाल्या. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. दरम्यान, सुप्रिया सुळेंच्या टीकेला फडणवीसांनीही प्रत्युत्तर दिलं आहे. 


काय म्हणाले देवेंद्र फडणवीस  


मी गृहमंत्री झाल्यामुळं अनेक लोकांची अडचण झाली आहे. त्या लोकांना मी गृहमंत्री नाही राहिलो तर बर होईल असं वाटत आहे. पण त्यांना मी सांगू इच्छितो की, मी गृहमंत्री राहणार आहे. मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गृहमंत्री पदाचा चार्ज दिला आहे. त्यामुळं जे जे चुकीचं काम करतील त्यांना शासन झाल्याशिवाय राहणार नसल्याचे फडणवीस म्हणाले. मागच्या काळत मी पाच वर्ष गृहमंत्री म्हणून कारभार सांभाळला आहे. मी जे कायदेशीर आहे तेच करतो. मी कोणाला घाबरत नाही. कायद्यानेच वागतो हे राज्य कायद्यानेच चालेल असे प्रत्युत्तर देवेंद्र फडणवीस यांनी सुप्रिया सुळेंच्या टीकेला दिले. तसेच भविष्यात चुकीचे काम करणाऱ्यांना सोडणार नसल्याचेही फडणवीस म्हणाले.


संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी


संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. दिल्लीत आल्यावर AK47 ने उडवून टाकू असा धमकीचा मेसेज राऊतांना आला आहे. लॅारेन्स बिश्नोई गॅगकडून धमकी मिळाली आहे. संजय राऊत धमकी प्रकरणी पुण्यातून (Pune) दोन जणांना ताब्यात घेतले आहे. काल राऊत यांच्या मोबाईलवर धमकीचे मेसेज आले होते.  संजय राऊत यांना धमकी दिल्याप्रकरणी पुण्यातून राहुल तळेकर ( वय साधारण 23) या तरुणाला पुण्यातील गुन्हे शाखेने काल रात्री उशिरा अटक केली आहे. ही अटक पुण्यातील खराडी भागातून करण्यात आली आहे. मुंबई पोलीस आणि पुणे पोलिस यांच्या गुन्हे शाखेनं संयुक्त कारवाई केली आहे. राहुल तळेकरला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने मुंबई पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. 


महत्त्वाच्या बातम्या:


Devendra Fadnavis : दारुच्या नशेत संजय राऊतांना धमकी, फडणवीसांची प्रतिक्रिया; चुकीचं काम करणाऱ्यांवर कारवाई करणार