Nashik News : 'देव कोणत्या रूपात येऊन आपल्याला मदत करेल हे सांगता येत नाही, अशीच एक घटना नाशिक (Nashik) शहरातील रेल्वे स्टेशनवर घडली आहे. कोलकत्याहून (Kolkata) मुंबईच्या (Mumbai) दिशेने रेल्वेने 13 महिन्यांच्या चिमुरड्याला त्याचे आई-वडील व्हेंटिलेटर वर लावून व तीन ऑक्सिजन सिलेंडर घेऊन जात होते. मात्र रेल्वे सात तास उशिराने मुंबईकडे निघाल्याने वाटतच दोन सिलेंडर संपले. अवघ्या अर्धा सिलेंडर शिल्लक राहिल्याने चिमुरड्याचा जीव वाचवण्यासाठी त्याची आई धडपड करत होती. ही बाब नाशिक शहरातील सामाजिक कार्यकर्ते दीपक डोके (Deepak Doke) यांनी यांना समजताच त्यांनी दोन ऑक्सिजनचे सिलेंडर उपलब्ध करून देत चिमूरड्याचे प्राण वाचवले. चिमूरड्याला गोल्डन हवर्समध्ये ऑक्सिजन मिळाल्याने त्याच्या आईच्या आनंदाला पारावर उरला नाही. 


नाशिक शहरातील इंदिरानगर येथील भूषण जैन हे गुरुवारी मध्यरात्री मध्य रेल्वेच्या मार्गावर चिमूरडा असलेल्या सेवाग्राम एक्सप्रेसमधून प्रवास करत होते. त्यांना या मुलास ऑक्सिजनची गरज असल्याचे समजले. त्यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून सामाजिक कार्यकर्ते दीपक डोके यांच्याशी संपर्क साधला. त्यांना रेल्वेतील लहान मुलास ऑक्सिजन सिलेंडरची आसल्याचे कळविले. डोके यांनीही क्षणाचा विलंबन लावता वेळेवर ऑक्सिजन सिलेंडर मिळण्यासाठी जिल्हा रुग्णालयाचे शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांच्याशी संपर्क साधला. डॉ. थोरात यांनीही ऑक्सिजन देण्याची सोय केली. गुरुवारी रात्री रेल्वे मनमाडहुन मुंबईच्या दिशेने जात होती. 


दरम्यान रेल्वे काही वेळानंतर नाशिकरोड स्थानकावर पोहचण्याचा आधी सिलेंडर पोहचणे महत्वाचे होते. त्यानुसार रेल्वे नाशिकरोड रेल्वे स्टेशनवर येण्यापूर्वी सिलेंडरची सोय करून ते सिलेंडर रेल्वे स्टेशनवर पोहोचवण्यासाठी रुग्णवाहिका गरजेची होती. त्यानुसार नाशिक रोड भागातील माजी नगरसेविका शोभा गायधनी रुग्णवाहिका उपलब्ध करून गोल्डन हवर्समध्ये सिलेंडर पोहोचवला. एकाच वेळी नाशिक जिल्हा रुग्णालय व दुसरीकडे नाशिक रोड अशा दोन्ही भागातून यंत्रणा कार्यरत झाल्याने त्या चिमुरड्याला वेळेत ऑक्सिजन सिलेंडर मिळाला. परिणामी सकाळी मुंबईतील वाडिया रुग्णालयाचे घोड्यावर उपचार करण्यात आले असून आता त्याचे प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळते आहे. 


रेल्वेला सात तास उशीर झाल्यामुळे त्या बाळाच्या पालकांवर ऑक्सिजनसाठी म्हणून करण्याची वेळ आली. रेल्वे प्रशासनाकडून अशावेळी सिलेंडरची सोय होण्याची गरज होती. पण ते शक्य झाले नाही, नेमक्या त्याच गाडीतून प्रवास करणाऱ्या भूषण जैन यांनी संपर्क केल्यामुळे ही बातमी समजली. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात, शिवा गायधनी यांच्यासह अनेकांचे प्रयत्न कामे आले. कोलकत्याच्या 13 महिन्याच्या बाळाला नाशिकवरून योग्य वेळी मदत झाल्याचे समाधान असल्याचे दीपक डोके यांनी सांगितले.