Nashik Crime : नाशिकच्या (Nashik) दिंडोरी रोडवरील मेरीच्या शासकीय वसाहतीत राहणारे कनिष्ठ लिपिक संतू वायकांडे यांचा खून (Murder) करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात (Panchavati Police Station) खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हे शोध पथकाला अवघ्या बारा तासांत खुनाची उकल करण्यात यश आले आहे. दिंडोरी तालुक्यातील (Dindori Taluka) इंदोरे गावातील वायकांडे यांचे मावसकाका संशयित निवृत्ती हरी कोरडे यास अटक केली आहे.
नाशिक शहरातील पंचवटी परिसरात दोन दिवसांपूर्वी मेरीच्या (MERI) जलविज्ञान प्रकल्पात कनिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत असणाऱ्या वायकांडे यांचा गळा आवळून खून झाला होता. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली होती. या प्रकरणी पंचवटी पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हे शोध पथकाने तपासाची चक्रे फिरवत सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून अवघ्या बारा तासात संशयिताला बेड्या ठोकल्या आहेत.
पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शासकीय वसाहतीमधील एका खोलीत पत्नी लता व आपल्या दोन शाळकरी मुलांसह वाळकांडे राहत होते ते मेरीच्या जलविज्ञान प्रकल्पात नोकरीला होते दरम्यान दिवाळीनिमित्त त्यांची पत्नी मुले तीन दिवसांपूर्वी माहेरी गेले होते वाळकांडे हे घरी एकटेच होते या घटनेतील भुताच्या शेतकरी असलेल्या मावस काकांनी आपल्या पुतण्या सोबत सोमवार रात्री उशिरापर्यंत मध्ये पार्टी केली मध्याच्या नशेत काका पुतण्यांमध्ये शाब्दिक वाद झाले यावेळी चार महिन्यांपूर्वी कोरडे यांच्याकडून वाळकांडे यांनी उसनवार घेतलेल्या दोन हजार रुपयांची त्यांनी मागणी केली यावेळी दोघांमध्ये हाणामारी झाली. याचा राग आल्याने कोरडे यांनी वायकांडे झोपी जाण्याची वाट बघितली. मंगळवारी पहाटेच्या सुमारास चार्जरच्या वायरीने त्यांचा गळा आवळून गावाकडे पलायन केले.
दरम्यान दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास पत्नी मुले घरी परतल्यानंतर त्यांनी दरवाजा उघडला. त्यावेळी वायकांडे बेशुद्ध अवस्थेत पडलेले आढळून आले. त्यांनी तात्काळ त्यांच्या भावाला बोलावून घेत जिल्हा रुग्णालयात त्यांना दाखल केले. तेथे डॉक्टरांनी तपासणी केली असता त्यांना मयत घोषित केले. पोलिसांनी पंचनामा केला असता मयत वायखंडे यांच्या गळ्यावर व्रण आढळून आले. फिर्यादी लता वायकांडे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करीत तपासाला गती दिली. तपास सुरू असताना सीसीटीव्ही फुटेज हाती लागले. त्यावरूनच संशयितांचा छडा लागला. संशयित कोरडे हे सोमवार रात्री वायकांडे यांच्या घरी आलेले होते. त्या व्यतिरिक्त सोमवारी रात्रीपासून मंगळवारपर्यंत कोणी त्यांच्या घरी आले असल्याचे लक्षात आले. पोलिसांनी संशयित कोरडे यात चौकशीसाठी ताब्यात घेतले. यावेळी त्यांने गुन्ह्याची कबुली दिली. वायकांडे यांनी मद्यधुंद अवस्थेत लाथा बुक्क्यांनी मारहाण केल्याचा राग मनात असल्याने त्यांचा गळा आवळला असे त्याने पोलिसांनी सांगितले.
दोन हजार रुपयांसाठी खून
संशयित हा शेतातील घेवडा विकण्यासाठी नाशिक भाजी मार्केटमध्ये आला होता. घरी जाण्यासाठी उशीर झाल्याने, घरी जाण्याकरता वाहन नसल्याने तो संतु वायकांडे यांच्या राहत असलेल्या घरी गेला. त्यावेळी वायकंडे यांची पत्नी व मुले हे दिवाळीसाठी माहेरी असल्याने हे दोघेच घरी होते. मद्यपार्टीनंतर वायकांडे यांनी तीन चार महिन्यांपूर्वी घेतलेल्या दोन हजार रुपयांवरून दोघांमध्ये वाद झाला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. त्यानंतर पहाटेच्या सुमारास वायकांडे हे झोपेत असताना संशयितांने मोबाईल चार्जिंगच्या वायरने आवळून त्यांचा खून करून सकाळी सात वाजेच्या सुमारास मूळ गावी पलायन केले.