Nashik accident : नाशिकच्या (Nashik) सिन्नर (Sinnar) येथून सायकलवर शिर्डी येथे साईबाबांच्या (Shirdi Saibaba) दर्शनासाठी निघालेल्या दोघा तरुणांवर काळाने घाला घातला आहे. सिन्नर शिर्डी हायवेवर मिरगाव शिवारात पाठीमागून वेगाने आलेल्या कारने सायकल स्वरांना चिरडल्याने दोघा साईभक्तांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. सिन्नरमधील लोंढे गल्लीतील आदित्य महेंद्र मिठे आणि कृष्णा संतोष गोळे सर या दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू (Death) झाल्याने सिन्नरमध्ये शोककळा पसरली आहे. 


सध्या अनेकजण शिर्डी साईबाबाच्या दर्शनासाठी जात असून अनेकजण मोठ्या वाहातून तर काहीजण पायी तर काहीजण सायकलचा वापर करत शिर्डी गाठतात. सिन्नरमधून असाच पाच मित्रांचा ग्रुप शिर्डीसाठी सायकलद्वारे निघाला होता. यामध्ये आदित्य मीठे, कृष्णा गोळेसर, आनंद दिगंबर गोळेसर, ओम राजेंद्र गोळेसर आणि अमर विजय असे पाच मित्र शुक्रवारी निघाले होते. सिन्नर येथून शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी सायकलवर निघाले होते. रस्त्याच्या डावी बाजू एक जात असताना सकाळी सात वाजता सुमारास पाथरे मिरगाव शिवारात पोहोचले. यावेळी पाठीमागून वेगाने आलेल्या महिंद्रा कारने त्यांना धडक 9major Accident) दिली. या धडकेत आदित्य मीठे आणि कृष्णा गोळेसर गंभीर जखमी झाले. तसेच इतर तीन मित्र किरकोळ जखमी झाले. पाथरे शिवारातील रस्त्यालगत वास्तव्य असलेल्या स्थानिकांनी जखमींना सिन्नरच्या खाजगी रुग्णालयात दाखल केले तर उलटलेल्या कारमधील प्रवाशांना ही सुखरूप बाहेर काढले. 


सकाळच्या सुमारास अपघात झाल्यानंतर मोठा आवाज झाला. आवाजाची तीव्रता एकूण आजूबाजूच्या परिसरात राहणार्य नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. परिस्थिती चे गांभीर्य लक्षात घेऊन या युवकांनी पांगरी येथील रुग्णवाहिकेला पाचरण करून मृतांसह जखमी सायकल स्वरांना सिन्नर येथे पाठवून दिले. कार मधील किरकोळ जखमी प्रवासी मुंबईचे असल्याने त्यांनी मुंबईतच उपचार घेण्याचा निर्णय घेतल्याने त्यांना मुंबईला (Mumbai) पाठवण्यात आले.


दरम्यान सायकलवरील दोघांची प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी नाशिक येथे नेण्यात सांगितले. नाशिकच्या खाजगी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले. मात्र काही वेळातच दोघांची प्राणज्योत मालवली. दोघांचे मृतदेह सिन्नर ग्रामीण रुग्णालयात (Sinnar Rural Hospital) शवविच्छेदनासाठी आणण्यात आले. कृष्णा गोळेसर महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात शिकत होता तर आदित्य मिठे तेलाचा व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. दोन्ही तरुणांचा अपघाती मृत्यू झाल्याने सिन्नर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. 


सिन्नर शिर्डी महामार्ग अपघात प्रवण क्षेत्र 
सिन्नर - शिर्डी राष्ट्रीय महामार्गावरून वाहतूक वर्दळीची असते. नाशिक शिर्डीला जोडणारा महत्वाचा मार्ग असल्याने लहान मोठ्या वाहनांसह सर्वच वाहने या मार्गावर असतात. शिवाय स्पीडचे लिमिटही वाहनधारक पाळताना दिसत नाहीत. अशातच हा महामार्ग पुरता खड्डेमय झाला आहे. सिन्नर शिर्डी महामार्गावर साई भक्तांची वर्षभर ये जा असते. मात्र अशा बेसुमार चालणाऱ्या वाहनामुळे अपघाताला सामोरे जावे लागते. त्यामुळे महामार्गावर ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे रस्ते अपघातांना निमंत्रण मिळत आहे.