Nashik News : राज्य शासनाच्या गृह विभागाने (Home Minister) वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीच्या आदेशानुसार नाशिक (Nashik) शहर पोलीस आयुक्तालयातील उपायुक्त अमोल तांबे, विजय खरात तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक सुनील कडासने, विभागाचे अध्यक्ष अजय देवरे यांची बाहेरील जिल्ह्यात बदली करण्यात आली आहे. तर शहराला तीन नवे उपायुक्त मिळाले असून राज्य गुप्तवार्ता नाशिक विभागाच्या उपायुक्त शर्मिष्ठा घाडगे वालावलकर यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. 


राज्यातील भारतीय पोलीस सेवा (Indian Police Service) व महाराष्ट्र पोलीस सेवा दर्जेच्या 104 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश गृह विभागांनी काढले असून यामुळे शहर नाशिक शहर (Nashik Police) पोलीस आयुक्तालयासह महाराष्ट्र पोलीस अकादमी, नाशिक ग्रामीण अधीक्षक कार्यालय, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, राज्य गुप्तवार्ता, गुन्हे अन्वेषण विभागात मोठे फेरबदल झाल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या झालेल्या बदल्यांत सहा अधिकाऱ्यांची नाशिकमध्ये बदलीने पदस्थापना झाली आहे. सुनील कडसने यांची नाशिक लोहमार्ग पोलीस अधीक्षक पदी, अमोल तांबे यांची पुणे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षक पदी तर गुन्हे अन्वेषणचे अजय देवरे यांची लातूरच्या अप्पर अधीक्षकपदी बदली करण्यात आली. उपायुक्त विजय खरात यांची महासंचालक कार्यालयातील दक्षता विभागाचे सहाय्यक महानिरीक्षक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. 


राज्य गुप्त वार्ता विभाग नाशिकच्या उपायुक्त पदी मुंबईच्या (Mumbai) बंदरे परिमंडळाच्या गीता चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. देवरे यांच्या बदलीने रिक्त झालेल्या सीआयडीच्या अधीक्षक पदी पिंपरी चिंचवड उपायुक्त इप्पर मंचक ज्ञानोबा यांची नियुक्ती करण्यात आले आहे. तसेच आयुक्तालयातील तांबे, खरात व बारकुंड यांच्या बदलीने रिक्त झालेल्या पदांवर नाशिक ग्रामीण छप्पर अधीक्षक चंद्रकांत खांडवी राज्य फोर्स एक, मुंबईचे किरण कुमार चव्हाण तसेच धुळे येथील अप्पर अधीक्षक प्रशांत जगन्नाथ बच्छाव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच नागरी हक्क संरक्षण नाशिकचे उपायुक्त अकबर पठाण यांचे मुंबई शहर पोलीस दलात बदली करण्यात आली आहे. नाशिक ग्रामीणमधील खांडवी यांच्या बदली रिक्त झालेल्या पदावर महाडचे उपविभागीय पोलिस अधिकारी निलेश तांबे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अकादमीचे अधीक्षक गौरव सिंग यांची मुंबईत उपायुक्त पदी तर दिपाली काळे यांची सोलापूरला उपयुक्त पदी बदली करण्यात आली आहे. 


दरम्यान पोलीस आयुक्तालयातील उपायुक्तांच्या बदल्याची चर्चा ही मागील काही महिन्यांपासून सुरू होती. सेवेच्या तीन वर्षाचा कार्यकाळ पूर्ण होऊन सुद्धा बदल्या होत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात होते. मात्र सरकार बदलताच नाशिक पोलीस दलातील अधिकाऱ्यांच्या झटपट बदल्या करण्यात आल्या. पोलीस अधीक्षक ते शहरातली उपायुक्तांच्याही रखडलेल्या बदल्या मार्गी लागल्याने आता बदलांच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. नाशिक शहरात खून, प्राणघात हल्ले, घरफोड्या, चेंज स्नचिंग, हाणामाऱ्या, जबरी लूट महिलांविषयी गुन्ह्यांमध्ये मागील काही महिन्यांपासून वाढ झाली आहे. यामुळे गुन्हेगारांमधील खाकीचा वचक कमी झाल्याची चर्चा सुरू आहे. अशातच आता नवे अधिकारी आल्यामुळे या गुन्ह्यांचे प्रमाण कमी होणार का अशी चर्चा रंगू लागली आहे.