Nashik Accident : नाशिक (Nashik) शहरासह जिल्ह्यात अपघाताचे (Accident) सत्र काही केल्या कमी होताना दिसत नसून मुंबई आग्रा महामार्गावर झालेल्या अपघात तीन जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर त्याच सुमारास वाडीवऱ्हे परिसरात पोलिसांच्या गाडीला अपघात झाला आहे. 


एकीकडे काही दिवसांपूर्वीच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी नाशिक शहरसह जिल्हा अपघात मुक्त करू अशी घोषणा केली होती. मात्र ती घोषणा हि केवळ घोषणा बनून उरली आहे. कारण दररोज अपघाताच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. मंगळवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास मुंबई आग्रा महामार्गाजवळील इगतपुरी येथील सह्याद्रिनगर समोर झालेल्या भीषण अपघातात इगतपुरी तालुक्यातील बोरटेंभे येथील तीन युवक जागीच ठार झाल्याची घटना घडली. तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. जखमीला इगतपुरी (Igatpuri) ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असुन या अपघातामुळे नागरिकांत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.


मुंबई आग्रा महामार्गावरील पंढरपुरवाडी भागात मंगळवारी रात्री 9 वाजताच्या सुमारास घाटनदेवी येथून बोरटेंभेकडे जाणाऱ्या टांग्याला आणि मोटार सायकलला एका भरघाव आयशरने जोरदार धडक दिली. इगतपुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना इगतपुरीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे. दरम्यान अपघातानंतर नागरिकांमध्ये नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. झालेल्या या भीषण अपघातात बोरटेंभे येथील प्रभाकर सुधाकर आडोळे, कुशल सुधाकर आडोळे व रोहित भगीरथ आडोळे हे जागीच ठार झाले आहेत. हे सर्वजण बोरटेंभे येथील रहिवासी असुन या घटनेमुळे बोरटेंभे गावात शोककळा पसरली आहे. अपघातानंतर आयशरचा चालक फरार झाला असून इगतपुरी पोलीस त्याचा शोध घेत आहे. 


नाशिकमध्ये अपघाताचे सत्र काही थांबेना 


तर दुसरी घटना अशी कि, नाशिक मुंबई महामार्गावर गोंदेजवळ पोलिस वाहनाला अपघात झाला आहे. नाशिक मध्यवर्ती गुन्हे शाखेचे पथक मुंबई हायकोर्टात जात असतांना घटना घडली. दुसऱ्या वाहनाने दिलेल्या धडकेत पोलिसांचे बलेरो वाहन उलटल्याने अपघात झाला. सुदैवाने तिन पोलीस कर्मचारी बचावले आहेत. काल रात्री उशिरा ही घटना घडली. मुंबई आग्रा महामार्गावर इगतपुरी तालुक्यातील गोंदे औद्योगिक वसाहतीतील लेयर कंपनी जवळ पोलिसांच्या वाहनाला सकाळी अपघात झाला नाशिकहून मुंबईच्या दिशेने जाताना ही घटना घडली. या घटनेत नाशिक शहर दलाचे तीन पोलीस जखमी झाले असून जखमींना येथील वाडीवऱ्हे प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Nashik News: घोडं, मैदान फार लांब नाही, लवकर समजेलच; नाशिकच्या ठाकरे गटाचा शिंदे गटाला इशारा