Nashik News : नाशिक (Nashik) जिल्ह्यातील सप्तशृंगीचे देवस्थान (saptshrungi Devi) आणि त्र्यंबकेश्वरच्या (Trimbakeshwer) स्वामी समर्थ गुरुपीठातील प्रसादाला अन्न आणि औषध विभागाकडून सुरक्षिततेचे भोग प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. महाराष्ट्रातील सिद्धिविनायक मंदिर, इस्कॉन मंदिर, नांदेडचा गुरुद्वारा आणि अक्कलकोटचे स्वामी समर्थ मंदिर अशा मोजक्यात धार्मिक स्थळांचा समावेश यात आहे.
नाशिकचे प्रसिद्ध असलेले सप्तशृंगी गड (Saptshrungi Gad) आणि त्र्यंबकेश्वर येथील श्री स्वामी समर्थ गुरुपीठ (Swami Samarth Gurupith) या दोन्ही धार्मिक स्थळांवर भाविकांना दिला जाणारा महाप्रसाद हा सुरक्षित आणि पौष्टिक आहे. अशी मोहोर अन्नसुरक्षा आणि मानके प्राधिकरणाने लावले आहे. हायजिन ऑफरिंग टू गॉड भोग या अंतर्गत महाप्रसाद प्रामाणिक करण्यात आला आहे, असे प्रमाणपत्र मिळवणारे देशातील केवळ तीनशे तर महाराष्ट्रातील सिद्धिविनायक मंदिर, इस्कॉन मंदिर, नांदेडचा गुरुद्वारा आणि अक्कलकोटचे स्वामी समर्थ मंदिर अशा मोजक्यात धार्मिक स्थळांचा समावेश यात आहे.
धार्मिक स्थळांसाठीच्या भोग उपक्रमांतर्गत नाशिक जिल्ह्यातील देशातील अन्नसुरक्षा मध्ये उत्कृष्ट 75 जिल्ह्यांमध्ये स्थान मिळाले असल्याचे नाशिक विभागाचे सह आयुक्त गणेश परळीकर यांनी सांगितले. दिल्लीच्या अन्नसुरक्षा प्राधिकरणाच्या वतीने इट राईट इंडिया या उपक्रमा अंतर्गत सुरक्षेच्या सर्व बाबींची पूर्तता केली गेल्याने हे प्रमाणपत्र दिले जाते. प्रसाद बनवताना स्वच्छतेसह अन्य बाबींची खबरदारी घेतली जाते. अशा देशभरातील 300 देवस्थानच्या यादीत महाराष्ट्रातील सिद्धिविनायक मंदिर, इस्कॉन मंदिर, नांदेडचा गुरुद्वारा, अक्कलकोटचा स्वामी समर्थांचे मंदिर, वणी येथील सप्तशृंगी देवस्थान आणि त्र्यंबकेश्वरचा स्वामी समर्थ गुरुपीठ यांचा समावेश आहे.
धार्मिक संस्थांच्या प्रसादालयात अन्नसुरक्षा आणि स्वच्छतेस प्रोत्साहन देण्यासाठीच्या हिट राईट इंडिया हा उपक्रम राबवण्यात येत आहे. अन्न व औषध प्रशासनाकडून धार्मिक स्थळांची यासाठी निवड होते. या स्थळांना अन्नसुरक्षा व मानदे कायद्यानुसार परवाना मिळवण्यासाठी अन्नसुरक्षा व मानके प्राधिकृत त्रस्त संस्थेमार्फत अन्नसुरक्षा परीक्षण होते. परीक्षण यशस्वी झाल्यानंतर राज्याच्या अन्नसुरक्षा आयुक्तांकडून भारतीय अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरण नवी दिल्ली यांना प्रमाणीकरणासाठी शिफारस केली जाते. यानंतर प्राधिकरण प्रस्तावाची तपासणी होऊन दोन वर्षांसाठी प्रमाणपत्र प्रदान करण्यात येते.
देशातील 75 जिल्ह्यांमध्ये नाशिकला स्थान
देश विदेशातून असंख्य भाविक देवदर्शनसाठी सप्तशृंगी गड व त्र्यंबकेश्वर या ठिकाणी येत असतात ही बाब लक्षात घेऊन अन्न व औषध प्रशासन नाशिक यांनी गणेशोत्सवानंतर दोन्ही ठिकाणी सदर उपक्रम राबवण्यास सुरुवात केली. त्याचा सतत पाठपुरावा करून जिल्ह्यातील सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्ट यांच्या प्रसादालयाचे संपूर्ण प्रामाणिकरण प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली. त्यानंतर सप्तशृंगी देवी ट्रस्ट आणि त्र्यंबकेश्वर येथील स्वामी समर्थ विद्यापीठ या दोन्ही स्थळांना अन्न व औषध प्रशासनाकडून प्रमाणपत्र देण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या अन्नसुरक्षा मानांकनांमध्ये निश्चितच वाढ होण्यास मदत होईल. सदर विविध उपक्रम जिल्ह्यात मनुष्यबळाचा अभाव असताना देखील अन्न व औषध प्रशासनाने यशस्वी 13 यशस्वीरित्या राबवल्याने नाशिक जिल्ह्याला देशातील अन्नसुरक्षामध्ये उत्कृष्ट 75 जिल्ह्यांमध्ये स्थान मिळाले आहे.