Nashik News : नाशिक (Nashik) जिल्ह्यात परतीच्या पावसाने चांगलाच धुमाकूळ घातल्याने शेतीची कामे ठप्प झाली होती. जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwer), इगतपुरी (Igatpuri), पेठ, सुरगाणा आदी तालुक्यात मोठ्या प्रमाणावर भात शेती (Rice Crop) केली जाते. परतीच्या पावसामुळे शेतात आणि साचल्याने भात पीक ऐन बहरात असताना खराब होण्याच्या मार्गावर होते. मात्र आता पावसाने उघडीप दिल्याने भात शेती फुलली असून कापणीला प्रारंभ झाला आहे. 


यंदा नाशिक जिल्ह्यासह राज्यात पावसाने थैमान (Rain) घातले होते. अतिवृष्टीने अनेक भागात शेती पिकांचे नुकसान झाले होते. त्यानंतर पावसानाने उघडीप दिली. मात्र परतीचा पाऊस थांबता थांबेना, अशी अवस्था गत काही दिवस जिल्हाभरात पाहायला मिळाली. जिल्ह्यातील आदिवासी तालुके म्हणून ओळख असलेल्या इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा परिसरात 70 टक्के भात लागवड केली जाते. अशातच यंदा पावसाने थैमान घातल्यानंतर दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले होते. मात्र पावसाने शेतकऱ्यांवर कृपा करत उघडीप दिली. त्यानंतर भात शेती बहरात आली. 


अशातच राज्यात परतीचा पाऊस सुरु झाला. त्यामुळे अनेक भागात शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. परिणामी भात शेतीला देखील फटका बसला. मात्र गत काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्यानंतर आता भात शेती कापणीला आल्याने सगळीकडे सोंगणीची कामे सुरु झाली आहेत.  आता थंडीचे दिवस सुरु झाल्याने भात पिके काढण्यास सुरवात झाली आहे.  दरम्यान त्र्यंबकेश्वर, इगतपुरी तालुक्यांना तांदळाचे कोठार म्हणून ओळखले जाते. अनेक तांदळाची जाती या दोन्ही तालुक्यात पाहायला मिळतात. येथील तांदूळ खाण्यासाठी अत्यंत स्वादिष्ट असल्याने मोठ्या प्रमाणात तांदळास बाजारपेठेत मागणी आहे. या वर्षी परतीच्या पावसाने शेतकऱ्याचे हाल केले असले तरीही, भातपीक तग धरून होते. काही शिवारात भातावर रोगाचा प्रादुर्भाव दिसून आला. यामुळे काहीअंशी उत्पादनात घट होईल. भाताचे उत्पादन कितीही वाढले, तरी रोपणी भाताचा तांदूळ जादा दराने विकला जातो. चांगल्या प्रतीचा व दर्जेदार तांदूळ खरेदीसाठी घरापर्यंत पोचतो. 


मशीनने भात कापणी 
मागील काही वर्षांपासून मजुरांचा तुडवडा होत असल्याने भात कापणीसाठी मशिन्स उपलब्ध झाली आहेत. या यंत्राच्या साहाय्याने भात कापणीसह मळणी एकाचवेळी होत असल्याने वेळ व खर्चाची बचत होत आहे. त्याचबरोबर अनेकजण शेतकऱ्यांना वापरता येईल, अशाही मशिन्सचा वापर करीत आहेत. दोन्ही हातांच्या साहाय्याने मशिन्स भात कापणी केली जाते. अवघ्या काही वेळात भात कापणी होत असल्याने शेतकरी प्राधान्य देत आहेत.