Nashik Dada Bhuse : सिन्नर महामार्गावर (Sinnar Shirdi Highway) झालेल्या अपघातात जखमी प्रवाशांची विचारपूस करण्यासाठी गेलेले दादा भुसे (Dada Bhuse) यांनी माजी आमदार राजाभाऊ वाजे यांची भेट घेतल्याची भेट घेतली असून जवळपास तासभर चर्चा केली आहे त्यामुळे या तासाभराचे चर्चेत कोणती राजकीय खलबते सुरू होती अशा चर्चांना उधाण आले आहे.


गेल्या काही दिवसांपासून नाशिक (Nashik Politics) जिल्ह्याला राजकारणात अनेक घडामोडी घडत असून कालच्याच सत्यजित तांबे (Satyajit Tambe) यांच्या राजकीय ट्विस्टमुळे नाशिकचे राजकारण दिल्ली हाय कमांडपर्यंत पोहोचलं. त्यातच आज सिन्नर शिर्डी महामार्गावर बसला भीषण अपघात झाला. या अपघातात जवळपास दहा जणांचा मृत्यू झाला यातील जखमींना सिन्नर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. या जखमींना भेटण्यासाठी पालकमंत्री दादा भुसे यांनी सिन्नर गाठलं. जखमींची विचारपूस केल्यानंतर दादा भुसे थेट आमदार वाजे यांच्या भेटीला गेले.


पालकमंत्री दादा भुसे यांनी शिंदे येथील सिन्नर येथील ठाकरे गटाचे माजी आमदार राजाभाऊ वाजे (Rajabhau Vaje) यांची भेट घेतली आहे. बंद दाराआड दादा भुसे यांनी माजी आमदार राजाभाऊ वाजे या दोघांमध्ये जवळपास तासभर चर्चा देखील झाली. त्यामुळे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे. ही भेट कशासाठी आणि का असावी, याचे वेगळे तर्क वितर्क लढवले जात आहेत. त्याचबरोबर शिंदे गटाकडून आणखी काही धक्का मिळण्याची शक्यता या निमित्ताने उपस्थित झाली आहे. 


सिन्नर अपघातातील जखमींची विचारपूस करून दादा भुसे थेट राजाभाऊ वाजे यांच्याकडे दाखल झाले होते. यावेळी बंद दाराआड दोघांमध्ये तासभर चर्चा झाली असून दोघांमध्ये काय चर्चा झाली असावी. राजाभाऊ वाजे शिंदे गटात जाणार का? दादा भुसे यांच्या सिन्नरमधील भेटीमागे दडलंय काय? याकडे सर्व जिल्ह्याचे लक्ष लागून आहे. कारण नाशिक शहरासह जिल्ह्यात ठाकरे गटाला गेल्या काही दिवसांपासून मोठे धक्के मिळत आहेत. शिंदे गटाने अनेक बड्या नेत्यांना आपल्या जाळ्यात ओढत ठाकरे गटाला सुरुंग लावला आहे. त्यातच आता दादा भुसे यांनी थेट माजी आमदार राजाभाऊ वाजे यांची भेट घेतल्याने नेमकी काय खलबत्त झाली. याबाबत सध्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत.


दादा भुसे म्हणाले... 


अंबरनाथ पेंटिंग कंपनीतील शिर्डीच्या दर्शनासाठी 15 बसेस आलेल्या होत्या. यात कामगारांचे कुटुंबीय होते. 15 पैकी 5 व्या क्रमांकांच्या बसचा अपघात झाला असून अत्यंत दुर्दैवि घटना घडली आहे. या अपघाताची मुख्यमंत्री यांनी माहिती घेतली असून ते लक्ष ठेऊन आहे. त्याचबरोबर या घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहे. सिन्नर अपघातातील मृतांच्या कुटुंबीय यांना 5 लाखांची मदत देण्यात येणार असून जखमींना उपचार शासकीय खर्चातून केला जाणार आहे. घटनेची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री यांनी दिले असून प्रत्येक अपघाताची कारणे वेगवेगळी आहेत. नाशिक महानगर आणि जिल्ह्यातील ब्लॅक स्पॉटचे आयडेंटिटी करून त्यावर उपाययोजना करण्यात येईल, त्यानंतर चौकशीमध्ये गोष्टी समोर येतील, असे भुसे यांनी स्पष्ट केले.