Nashik Sinnar Accident: नाशिक-शिर्डी महामार्गावर (Nashik Shirdi Highway) आज पहाटे वावी-पाथरे गावाजवळ झालेल्या खासगी बसला भीषण अपघात (Bus Accident) झाला. या अपघातात दहा प्रवाशांचा मृत्यू झाला असून काहीजण जखमी आहेत. यातील सात मृतांची ओळख पटली असून पालकमंत्री दादा भुसे रुग्णालयात जखमींची विचारपूस करण्यासाठी गेले आहेत.
Nashik Sinnar Accident: नाशिक (Nashik) जिल्ह्यातील सिन्नर शिर्डी महामार्गावर पाथरेजवळ खासगी बस आणि ट्रकचा भीषण अपघात (Major Accident) झाल्याची घटना आज सकाळी घडली. या भीषण अपघातात जवळपास 10 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच, अनेक प्रवासी जखमी झाले असून त्यांना सिन्नर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री आणि नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे हे सिन्नरच्या रुग्णालयात पोहचले असून जखमी प्रवाशांची विचारपूस केली आहे. त्याचबरोबर या अपघातातील सात मृत प्रवाशांची ओळख पटली असून यामध्ये दीक्षा गोंधळी, प्रतीक्षा गोंधळी, श्रावण भारस्कर, श्रद्धा भारस्कर, नरेश उबाळे, वैशाली नरेश उबाळे, बालाजी कृष्णा मोहंती (ड्रायव्हर) अशी मृत प्रवाशांची नावे आहेत.
मुंबई येथून शिर्डीकडे जाणारी खासगी बस आणि शिर्डीकडून सिन्नर बाजूकडे जाणारा मालवाहू ट्रक यांची समोरासमोर धडक होऊन अपघात झाला. अपघात एवढा भीषण होता की, बसची एक बाजू पूर्णतः चक्काचूर झालेली पाहायला मिळत आहे. यामध्ये जवळपास 45 प्रवाशी या बसमध्ये प्रवास करत होते. दहा प्रवाशांचा मृत्यू झाला असून अनेकांवर सिन्नर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यातील सात मृत प्रवाशांची ओळख पटली असून अद्याप तीन मृतांची ओळख पटविण्याचे काम सुरु आहे. ते सर्व अंबरनाथ येथील रहिवासी असल्याचे समजते आहे. शिर्डी येथे देवदर्शनासाठी निघाले होते, मात्र वाटेत भीषण संकटाला सामोरे जावे लागले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील घटनेसंदर्भात दुःख व्यक्त केले आहे. तर दादा भुसे सिन्नरच्या रुग्णालयात पोहचले आहेत.
पाहा व्हिडीओ : Nashik Sinnar Accident : बस-ट्रकचा भीषण अपघात, दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना 5 लखांची मदत
पाच लाखाची मदत
दरम्यान, अपघातानंतर मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख रुपये देण्याचे आणि जखमींवर शासकीय खर्चाने उपचार करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत. या अपघाताचे वृत्त कळताच मुख्यमंत्र्यांनी नाशिक विभागीय आयुक्त तसेच जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून याविषयी अधिक माहिती घेतली. या अपघातात आत्तापर्यंत दहा जण ठार झाले असून काही प्रवासी जखमी झाले आहेत. जखमी प्रवाशांना तातडीने शिर्डी नाशिक या ठिकाणी हलवून त्यांच्यावर योग्य ते उपचार सुरू करावेत, तसेच हा अपघात नेमका कशामुळे झाला त्याची चौकशी करावी असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. त्याचबरोबर अपघातासंदर्भात मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त करण्यात आला आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
नाशिकमध्ये भीषण अपघात, खासगी बस आणि ट्रकची जोरदार धडक; 10 जणांचा मृत्यू