Nashik Kalaram Mandir : आमलकी एकादशी (Amalaki Ekadashi) निमित्त नाशिकच्या ऐतिहासिक का राम मंदिरात रामरायाला तब्बल 32 हात पांढराशुभ्र फेटा बांधण्यात आला. या सोहळ्याला पाटोत्सव सोहळा (Patotsav) असं म्हटलं जातं. आमलकी एकादशीनिमित्त नाशिकच्या काळाराम मंदिरात हा सोहळा संपन्न झाला. गेल्या 27 पिढ्यांपासून पुजारी घराण्यातील ही परंपरा असून अनेक शतके या परंपरेचे पालन केले जात असल्याचं दिसून आलं.


नाशिकचं (Nashik) काळाराम मंदिर हे पंचवटीत (Kalaram Mandir) एक काळ्या दगडात बांधलेले सुप्रसिद्ध मंदिर आहे. या मंदिरात अनेक उत्सव साजरे केले जातात. त्यापैकीच एक म्हणजे पाटोत्सव होय. एरवी 11 महिन्याला सर्व एकादशीला पितांबर नेसवलेले असते. फक्त हा फाल्गुन मास हे पांढरे वस्त्र उन्हाळ्याच्या त्रास होऊ नये, म्हणून पण असते, असे म्हटले जाते. देवकलाहास निवृत्तीपूर्वक देवकला अभिवृद्धीसाठी देवतांच्या मस्तकावर पट्टबंध बांधणे, याला पाटोत्सव असे प्रतिष्ठामहोददी व प्रतिष्ठामौक्तिकम या प्राचीन ग्रंथात सांगितले आहे. त्यानुसार हा सोहळा मोठ्या भक्तिभावात संपन्न झाला. याप्रसंगी विश्वस्त धनंजय पुजारी, श्रीमहंत सुधीरदास महाराज,निनाद पुजारी दीपक कुलकर्णी, सचिन पुजारी, प्रदीप वाघमारे यांनी आज हा विधी संपन्न केला. 


दरम्यान रामरायाला (Shree Ram) तब्बल 32 हात पांढराशुभ्र फेटा बांधण्यात आला. 32 का तर 32 ही संख्या अनुष्टुप छंदाचे रुप आहे. त्यानुसार हा विधी संपन्न झाला.


ही परंपरा 27 पिढ्यांच्या वारसाकडून गेली अनेक वर्षे अखंड पालन केली जात आहे. प्रथेत वस्त्रातील रामरायाचे दर्शन मोठे पुण्यकारक सांगितलं आहे. रंगपंचमीच्या दिवशी केशर व पळसाचा फुलांचा रंग उकळून त्याचा रंग तयार केला जातो. वासंतिक नवरात्र उत्सवात मानकरी समोरबुवा पुजारी यांच्या हस्ते 'श्रीं'ना श्रीखंडाचा नैवेद्य दिला जातो. यावेळी श्वेत वस्त्रावर रंग व गुलाल टाकल्यावर नाशिककरांची रंगपंचमी रहाड उत्सवाला सुरवात होते. फेटा नेसवायच्या आधी रामरायाला 16 पुरुषसुक्ताव्दारे महापूजा संपन्न केली जाते. त्यानंतर विधीपूर्वक प्रथम श्वेतवस्त्र झगा पोशाख सीतादेवींना साडी चोळी नेसवून मग श्रीरामांना प्रथम फेटा बांधायला सुरुवात करतात. या सर्व कार्याला तब्बल दोन तास लागत असल्याचे पुजारी सांगतात. 


पाटोत्सवाची अनोखी परंपरा 


देवकलाह्लास निवृत्ती पूर्वक देवकला अभिवृद्धीसाठी देवतांच्या मस्तकावर पट्टबन्ध बांधने याला पाटोत्सव असे 'प्रतिष्ठामहोददी व प्रतिष्ठामौक्तिकम्' या प्राचीन ग्रंथात सांगितले आहे. 32 ही संख्या अनुष्टुप छंदाचे रुप आहे. वेदातील पुरुषसुक्त रामरक्षा पवमानसुक्तांतील बहुतांशी ऋचा याच छंदात आल्या आहे. चारही वेदातील स्तुती मंत्र अनुष्टुपछंदात आहे. या छंदातील स्तुती ने प्राणरुपी देवता प्रसन्न होतात म्हणून देवतांना देखील या छंदातील स्तुती आवडते..