Nashik News : उन्हाची तीव्रता वाढ लागली असून त्यामुळे धरणांच्या जलसाठ्यात (water Storage) घट होऊ लागली आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी अजून महिनाभराचा काळ शिल्लक आहे. असे असताना नाशिक जिल्ह्यात अवघा 39 टक्के पाणीसाठा उपलब्ध असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे उन्हाळ्याच्या अखेरच्या टप्प्यात जिल्ह्यातील नागरिकांना पाणीटंचाईचा (Water Crisis) सामना करावा लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 


एकीकडे अवकाळी पावसाचा (Unseasonal Rain) कहर दुसरीकडे यंदाच्या वर्षात अल निनोचा (AL Nino) असणारा प्रभाव यामुळे पाणी पुरवठ्याचे गणित चुकण्याची शक्यता आहे. अशातच हळूहळू तापमानाचा (Temprature) पारा वाढल्याने होणारे बाष्पीभवन व पाण्याने वाढलेली मागणी यामुळे जिल्ह्यातील जलसाठा झपाट्याने खालावत आहे. सद्यस्थितीत नाशिक (Nashik) जिल्ह्यातील 24 धरणात अवघा 39 टक्के जलसाठा शिल्लक आहे. विशेष म्हणजे दोन धरणात दहा टक्क्याहून कमी तर माणिकपुंज धरण  (Gangapur Dam)कोरडेठाक पडले आहे. येणाऱ्या काळात पाण्याच्या मागणीत वाढ होणार असून उपलब्ध जलसाठ्याचे काटेकोर नियोजन जिल्हा प्रशासनाला करावे लागणार आहे. गतवर्षी पावसाने जोरदार बॅटिंग केल्याने जिल्ह्यातील सर्व धरणे ऑगस्ट अखेर ओव्हरफ्लो झाली होती. यांना मात्र हवामान खात्यासह स्कायमेट या संस्थेने देशभरात पावसाचे प्रमाण घटेल असा इशारा दिला आहे. तसेच अल निनोच्या संकटामुळे मान्सूनच्या आगमनास जुलैऐवजी ऑगस्ट उजाडेल असा अंदाज वर्तवला आहे. 


दरम्यान मे महिन्यात उष्णतेच्या झळा तीव्र झाल्या असून धरणातील पाच जलसाठ्याचे झपाट्याने बाष्पीभवन होत आहे. गाव, पाडे, वस्त्यांवर पाणी टंचाईच्या झळा जाणवू लागले आहेत. अनेक छोट्या धरणांची तळ गाठण्याकडे वाटचाल सुरू आहे. येत्या काळात तापमानांचा पारा चढत राहणार असून पाण्याची मागणी ही वाढणार आहे. आजमितीला अनेक ठिकाणी पाणी टंचाई जाणवायला सुरवात झाली आहे. सद्यस्थितीत धरणात 39 टक्के जलसाठा आहे. याच पाण्यावर जिल्हावासीयांची पुढील महिन्याची भिस्त अवलंबून आहे. मान्सूनचे वेळेवर आगमन झाले, तर ठीक अन्यथा उपलब्ध जलसाठ्यात दोन महिने जिल्ह्याची तहान भागवण्याची कसरत जिल्हा प्रशासनाला करावे लागणार आहे. 


बंगालच्या चक्रीवादळाचा हवामानावर प्रभाव


दरम्यान या वर्षातील पहिल्या चक्रीवादळाची स्थिती पश्चिम बंगालच्या उपसागरास अंदमान समुद्रात तयार होणार आहे. कमी दाबाचे क्षेत्र विकसित होऊन पुढील 48 तासात समुद्र खवळणार असून चक्रीवादळाचा प्रवास बंगालचा उपसागरातून उत्तरेकडे सुरू होईल. याचा प्रभाव राज्यातील मराठवाडा विदर्भाचा मध्य महाराष्ट्रातील नाशिक, पुणे जिल्ह्यात सुद्धा पहावयास मिळू शकतो, अशी शक्यता आव्हान खात्याने वर्तवली आहे नाशिक जिल्ह्यातही हवामानावर परिणाम दिसून येण्याची शक्यता नाकारता येत नाही. यंदाच्या वर्षात नाशिक जिल्हा अवकाळी पावसापासून सतत सामना करत आहे. पण आता हे नवीन संकट उभे राहिल्याने पुन्हा हवामानाचे स्थिती बिघडण्याची शक्यता आहे. मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, सातारा, सोलापूर आणि विदर्भातील काही जिल्ह्यात पुढील पाच दिवसात गडगडाटी पाऊस होऊ शकतो, असा अंदाज वर्तवला आहे.