Chhagan Bhujbal : येवल्याला (Yeola) बरेच दिवस झाले गेलो नव्हतो, शपथ घेतल्यानंतर फक्त नाशिकला आलो, मात्र मतदारसंघात जाणे झाले नाही, पुढे कॅबिनेट मीटिंग आहे, अधिवेशन सुरु झाल्यानंतर जाता येणार नाही, म्हणून दौरा करत असल्याचे मंत्री छगन भुजबळांनी सांगितले. तसेच पवार साहेबांच्या (Sharad Pawar) सभेला उत्तर देण्यासाठी चाललो नसल्याचे स्पष्टीकरण देखील छगन भुजबळ यांनी दिले. 


मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा येवला मतदारसंघात दौरा करत आहेत. या पार्श्वभूमीवर आज नाशिकमध्ये (Nashik) आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले की, येवल्याला बरेच दिवस झाले गेलो नव्हतो. तसेच शपथ घेतल्यानंतर फक्त नाशिकला आलो. मात्र मतदारसंघात जाणे झाले नाही. त्याचबरोबर अधिवेशन सुरु झाल्यानंतर जाता येणार नाही, म्हणून दौरा करत असल्याचे छगन भुजबळांनी सांगितले. शिवाय पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची इच्छा होती, त्यासाठी येवल्याला जात आहे. मतदारसंघातील मतदारांना आधी नमस्कार आणि नंतर जिल्हा नियोजन समितीची बैठक असेही ते म्हणाले. 


दरम्यान शरद पवार यांची येवल्यात सभा असताना त्याच दिवशी छगन भुजबळ हे नाशिकमध्ये आले होते. त्यादिवशी पाथर्डी फाट्यापासून ते भुजबळफार्म पर्यंत त्यांच्या स्वागताचे कार्यक्रम पार पडले. त्यांनतर आता येवला मतदारसंघाचा दौरा करत आहेत. यावर ते म्हणाले की, शक्ती प्रदर्शनासाठी जात नाही तर येवलेकरांना भेटण्यासाठी जात आहे. पुढील काही दिवस अधिवेशन काळ असल्याने जाता येणार नाही, म्हणून हा दौरा आहे, यात शक्तिप्रदर्शन कुठे आले? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला. मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदा येवल्यात जात आहे. येथील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची इच्छा होती. तयारीची कल्पना नाही, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह असतोच, असेही ते म्हणाले. 



23 तारखेला उत्तर सभा?


आमच्या रात्रीपर्यंत मिटिंग सुरू होत्या. नंतर परत कॅबिनेट मीटिंग आहे, त्यामुळे येवल्याला जात आहे. माझ्या कामाचा आढावा प्रत्येक मतदाराला माहिती आहे, पण थोडीफार उजळणी होते. पवार साहेबांच्या सभेला उत्तर देण्यासाठी चाललो नाही. 23 तारखेला उत्तर सभा घेण्याचा विचार सुरू असल्याचे मोठे विधान भुजबळांनी केले. तसेच खातेवाटपावर ते म्हणाले की, खात्याची वाटणी झाली आहे. तिसरा गट जात आहे, म्हटल्यावर कुणाची तरी खाती काढावी लागणार, तेव्हाच खाते मिळते. एकाचे खाते काढून दुसऱ्याला द्यायचे आहे. त्यामुळे उशीर होत असल्याचे स्पष्टीकरण भुजबळ यांनी दिले. अजित पवार यांना अर्थ खातं मिळणार ही फक्त बातमी, त्यामुळे खात्री नाही. तसेच मी काहीही मागणी केली नाही. सगळी ताकदीची खाते घेऊन झाली आहे. टॉप खाते झालेत, सर्व जण जे ठरवतील, ते मिळेल, असे सांगत 16 आमदार अपात्र संदर्भात विधानसभा अध्यक्ष योग्य निर्णय घेतील. नोटीस देऊन सगळ्यांचे म्हणणे ते ऐकत आहेत, त्यांनतर विधानसभा अध्यक्ष योग्य निर्णय घेतील, असा विश्वास भुजबळ यांनी 16 अपात्रतेच्या निर्णयावर व्यक्त केला. 


इतर महत्वाच्या बातम्या :


Chhagan Bhujbal : मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर भुजबळ पहिल्यांदाच येवला दौऱ्यावर; स्वागताची जोरदार तयारी