Nashik News : मुंबई (Mumbai), मालेगाव (Malegaon) पाठोपाठ नाशिक (Nashik) शहरात देखील गोवरचे (Gover) 4 संशयित रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली असून या 4 संशयित बालकांचे रक्ताचे नमुने तपासणीसाठी मुंबईला आले पाठवण्यात आल्याचे समजते आहे. मालेगावनंतर नाशिकमध्ये गोवरचा धोका वाढल्याने आरोग्य विभाग (Health Department) अलर्ट  झाले आहे. 


प्रामुख्याने लहान मुलांमध्ये आढळणारा गोवरचा आजाराने हात पसरवण्यास सुरवात केली आहे. मुंबई शहरात सुरवातीला आढळून आलेल्या रुग्णानंतर मालेगाव शहरात गोवरचे संशयित रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली होती. आता नाशिक शहरात गोवरचे चार संशयित रुग्ण आढळून आल्याने आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. नाशिक शहरात गोवरचे चार संशयित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे महापालिका सतर्क झाली आहे. त्यामुळे नाशिककरांना देखील सावधगिरी बाळगणे गरजेचे झाले आहे. 


नाशिक जिल्ह्यात मालेगावमध्ये 50 हुन अधिक संशयित रुग्ण आढळून आले होते. मात्र नाशिक शहरात एकही रुग्ण आढळला नव्हता. आता मात्र चार संशयित रुग्ण आढळले आहेत. दरम्यान रिपोर्ट आल्यानंतर आरोग्य विभाग शहरात सर्वेक्षण करणार आहे. आरोग्य विभागाने शहरात केलेल्या तपासणीत 4 संशयित आढळून रुग्ण आले आहेत. हे रुग्ण संशयित असले तरी नागरिकांनी बालकांच्या बाबतीत खबरदारी घेण्याचे आवाहन आरोग्य प्रशासनाकडून करण्यात आले आहे. त्याचबरोबर गोवर झाल्यासारखे वाटले तर त्वरित उपचार घ्यावेत, मुलांना शाळेत पाठवू नये, असे आवाहन वैद्यकीय अधिकारी बापूसाहेब नागरगोजे यांनी केले आहे. 



दरवर्षी साधरणतः जानेवारी ते मार्च दरम्यान गोवरची साथ येते. मात्र यंदा हवामानातील बदलामुळे लवकर साथ आली असून त्यापासून बालकांचा बचाव करण्यासाठी आत्तापासूनच खबरदारी घेण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. मालेगाव शहराच्या बालकांना गोवरने ग्रासले आहे.  यातील अनेक बालकांना गोवर प्रतिबंधक रूबेला लसीकरण करून घेतले नसल्याचे चौकशी अंतिम आढळून आले आहे. एका विशिष्ट भागातील बालकांना त्याची लागण झाली आहे. त्यामुळे आता अशा बालकांवर तातडीने लसीकरण हाती घेण्यात आले आहे. रुग्णांमध्ये तीव्र ताप शरीरावर लाल पुरळ, सर्दी, खोकला, डोळे लाल होणे अशी लक्षण दिसतात. यामुळे लहान मुलांमध्ये लक्षणे आढळल्यास वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेण्याचे आवाहन नाशिक आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.


महापालिका रुग्णालयात संसर्गजन्य कक्ष 
नाशिक शहरात आढळल्यामुळे नाशिक आरोग्य विभाग अलर्ट मोडवर आला आहे. या चारही संशयित रुग्णांचे नमुने मुंबईच्या प्रयोगशाळांमध्ये तपासणीसाठी पाठवले. संशयित रुग्णांमुळे पालिकेचा आरोग्य विभाग सध्या कामाला लागला असून नाशिक महापालिकेच्या रुग्णालयात लहान मुलांसाठी संसर्गजन्य कक्ष सुद्धा सज्ज केला जात आहे.


अशी घ्या बाळाची काळजी ?
गोवर हा शक्यतो लहान मुलांमध्ये आढळणारा सांसर्गिक आजार असून त्यात सर्दी खोकला, ताप आणि अंगावर पुरळ उठतात. निरोगी मुलांना त्याचा विशेष त्रास होत नसला तरी अशक्त मुलांना गोवर त्रासदायक ठरत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. त्यावर परिणामकारक प्रतिबंधक लस उपलब्ध असल्याने ती लहान मुलांना देण्याचा सल्ल्ला डॉक्टर देतात. हि लस शासकीय आरोग्य सेवेतूनही मिळते. बाळाच्या शरीरात आईकडून आलेली प्रतिकारशक्ती सहा महिन्यांपर्यंत असते परंतु म्हणून ही लस पहिल्या सहा महिन्यानंतर पंधराव्या महिन्यात बाळाला द्यावी. दरम्यान गोवरविरुद्ध लढण्यासाठी महत्वाचा उपाय म्हणजे प्रतिबंधक लस. या लसीमुळे कायमची प्रतिकारशक्ती निर्माण होते, तसेच कुणा गोवरबाधित झालेल्या बालकांच्या संपर्कात जाऊ न देणे महत्वाचे असते.