Nashik News : लाकडी ठोकळा डोक्यावर पडल्याने झालेल्या रक्तस्रावामुळे अठरा वर्षीय युवकाचा मृत्यू (Youth Death) झाल्याची घटना घडली आहे. अरुण कुमार मांडवी असे दुर्दैवी मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. तो नाशिक शहरातील गंगापूर रोड (Gangapur Road) परिसरातील आनंदवल्ली शिवारात राहत होता. नेहमीप्रमाणे कामावर गेल्यानंतर काम सुरु असताना ही घटना घडली. 


मूळचा परराज्यातील असणारा अरुण हा कामानिमित्त नाशिक (Nashik) शहरात वास्तव्यास होता. शहरातील गंगापूर रोड भागातील एका बांधकाम साईटवर तो कामगार म्हणून जात होता. 31 मार्च रोजी नेहमीप्रमाणे साईटवर गेल्यानंतर काम सुरु होते. अशातच बांधकाम साईटवरील वरच्या माळ्यावरुन अचानक एक लाकडी ठोकळा त्याच्या डोक्यात पडला. या घटनेत तो गंभीर जखमी झाला. डोक्यावर ठोकळा पडल्याने रक्तस्राव अधिक झाल्याने त्याला भाऊ गणेश भगत याने तात्काळ जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासून त्यास मयत घोषित केले.


अरुण हा आनंदवल्ली शिवारात वास्तव्यास होता. त्या ठिकाणाहून तो कामावर जात असे. दरम्यान 31 मार्च रोजी सकाळी नेहमीप्रमाणे कामावर गेला. यावेळी काम सुरु असताना अचानक लाकडी ठोकळा त्याच्या डोक्यात पडला. यात तो गंभीर जखमी झाल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. दोन दिवसांच्या उपचारानंतर त्याचा मृत्यू झाल्याचे तापसी अंमलदार झिरवाळ यांनी सांगितले. याबाबत गंगापूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 


रामकुंडात तरुण बुडाला.... 


नाशिक शहरातील (Nashik) दुसऱ्या एका घटनेत एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सहर्ष राजेंद्र भालेराव असे या तरुणाचे नाव आहे. हा तरुण मित्रांसमवेत रामकुंड परिसरात पोहण्यासाठी गेला होता. यावेळी मित्रांसोबत त्यानेही वाहत्या पाण्यात उडी मारल्यानंतर पाण्याचा अंदाज न आल्याने दोघे जण बुडाले. यातील एकाला वाचवण्यात यश आले तर सहर्षचा दुर्दैवी मृत्यू झाला. सध्या गंगापूर धरणातून पाणी सोडण्यात आले असून गोदावरीतून पाणी वाहत आहे. अशातच शहरातील काही मित्रांचा ग्रुप हा पोहण्यासाठी रामकुंडावर आला होता. यात सहर्ष देखील होता. 


रामकुंडाजवळील गांधी तलावात मित्रांसमवेत तो देखील पोहण्यासाठी उतरला. मात्र त्याच दरम्यान पाण्याचा प्रवाह हा अधिक असल्याचा त्यांना अंदाज न आल्याने दोघे जण पाण्यात वाहू लागले होते. त्यातील एकाला वाचविण्यात आले. मात्र, सहर्ष हा पाण्यात बुडाला, उशीरानंतर त्याला बाहेर काढण्यात आले. तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तात्काळ तपासल्यानंतर त्याचे निधन झाल्याचे सांगितले. या घटनेने कॉलेजसह मित्रा परिवारात हळहळ व्यक्त केली जात आहे. भालेराव कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.