Nashik Crime : नाशिकसह (Nashik) जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून एटीएम फोडण्याच्या सातत्याने उघडकीस येत आहेत. त्यामुळे बँकेच्या एटीएम (Bank ATM) सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अशातच नाशिकरोड पोलीस स्टेशन (Nashikroad Police) हद्दीतील सामनगाव रोड येथील एटीएमचा चोरट्यांनी चोरून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मध्यरात्री चार वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे. 


नाशिक शहराजवळील सामनगाव रोड (Samanagaon) परिसरात चोरट्यांनी थेट एटीएम (ATM) न फोडता उचलून नेले असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. परिसरात आरपीएफ सेंटर असून, या सेंटरजवळ एसबीआय बँकेचे एटीएम आहे. मध्यरात्री 4 च्या सुमारास चोरट्यांनी थेट एटीएमच उचलून नेले. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच नाशिकरोड पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही (cctv) फुटेज तपासले असता, त्यात एक पिकअप व स्विफ्ट डिझायर गाडी परिसरातून जाताना दिसत आहे. पोलिसांनी फुटेजच्या आधारे तपास सुरू केला आहे. चोरट्यांनी नेमकी किती रक्कम लांबविली, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. 


सामनगाव, चाडेगाव या भागात रेल्वे सुरक्षा दलाचे प्रशिक्षण केंद्र असून तिथे भारतातून अधिकारी, कर्मचारी जवान प्रशिक्षण घेण्यासाठी येत असतात. हा भाग ग्रामीण परिसरात येत असल्याने पैसे काढण्याकरीता रेल्वे सुरक्षा केंद्रातील अधिकारी, कर्मचारी जवान यांना खूप त्रास होत असतो. या पार्श्वभूमीवर प्रशिक्षण केंद्रातील अधिकाऱ्यांनी एटीएम बसवण्यासाठी चाडेगाव ग्रामस्थांकडे विनंती केल्यानंतर गावकऱ्यांनी जागा उपलब्ध करून दिली. त्यानुसार या ठिकाणी स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम मशीन बसवण्यात आले. दरम्यान आज पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास चार चोरट्यांनी थेट एटीएम मशीनच कट करून पिकप वाहनाद्वारे पळवून नेले. भल्यापहाटे झालेल्या प्रकारामुळे परिसरात भीतीचं वातावरण आहे. हा चोरीचा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. 


सीसीटीव्ही द्वारे तपास सुरू 


घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकारी तसेच गुन्हे शोध पथकातील अधिकारी, कर्मचारी यांनी भेट देऊन तपास करीत आहे. दरम्यान एटीएममध्ये किती किती रक्कम होती, याबाबत निश्चित आकडा समजू शकला नाही. या घटनेची नाशिकरोड परिसरात मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने मध्यरात्रीच्या सुमारास रस्त्यावर शुकशुकाट असतो. परिसरातील नागरिकही रात्री लवकर झोपून घेतात. परिणामी या संधीचा फायदा घेऊन सामनगाव रोड परिसरात असलेल्या आरपीएफ सेंटर जवळील एटीएमच चोरट्यांनी चोरून नेले. सदरची घटना सकाळी नागरिकांना समजली. सध्या पावसाळा असल्याने रात्री लवकर नागरिक झोपून घेतात. या भागात अनेक वेळा चोऱ्या, दरोडा असे प्रकार घडले असून पोलिसांनी या भागात गस्त वाढवावी, अशी मागणी स्थानिक गावकऱ्यांनी केली आहे.


इतर महत्वाच्या बातम्या : 


Nashik ATM Chori : बँकेचं एटीएम फोडून चोरट्यांनी पैसे नाही तर थेट मशीनच लंपास केलं