Nashik News : सध्या सगळीकडे ऑनलाईन सेवा (Online Service) सुरू झाली असून यात ग्रामपंचायत देखील सरसावली आहे. महाराष्ट्र शासनाने (Maharashtra Government) महा ई ग्राम सिटीजन कनेक्ट (Maha E Gram Connect) नावाचे अँप्लिकेशन (App) लॉन्च केले असून घरबसल्या ग्रामपंचायतचे सर्व दाखले मोबाईलद्वारे पाहू शकणार आहोत. नाशिक (Nashik) जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील जवळपास 96 ग्रामपंचायतींनी या ॲपचा अवलंब  केला आहे. त्यामुळे नागरिकांना ग्रामपंचायतींमधील सुविधा ऑनलाईन मिळू लागल्या आहेत. 


सध्याचे ऑनलाईनसह जग असून यामध्ये समाजपयोगी लागणाऱ्या अनेक गोष्टी ऑनलाईन उपलब्ध झाल्या आहेत. तर दुसरीकडे ग्रेन स्तरावर महत्वाची समजल्या जाणाऱ्या ग्रामपंचायत देखील डिजिटल झाली आहे. राज्यातील हजारो ग्रामपंचायत (Grampanchayat) या संगणीकृत झाल्या असून त्या माध्यमातून नागरिकांना सेवा पुरवल्या जात आहेत. अशातच महाराष्ट्र्र शासनाने नागरिकांना आणखी सोपी प्रक्रिया करून दिली असून महा ई ग्राम सिटीजन कनेक्ट या अँप लाँच केले आहे. त्यामुळे ग्रामपंचायतमधून मिळणारे हरेक कागदपत्रे आता ऑनलाईन घरबसल्या मिळू शकणार आहेत. याचा अवलंब इगतपुरी तालुक्यातील 96 ग्रामपंचायतींनी केला आहे. 


ग्रामपंचायत म्हटली कि, शाळेत प्रवेश घेण्यासाठी लागणारा दाखला,आधार कार्ड काढण्यासाठी जन्म दाखला आवश्यक असतो. जमिनीची वारस नोंद, बँकातील मयत व्यक्तींच्या ठेवी वगैरे कामासाठी मृत्यू दाखला हवा असतो. विवाह नोंदणी, उतारे, घरांचे उतारे सुद्धा अनेक कामासाठी गरजेचे असतात. यासोबतच शैक्षणिक कामासाठी, शासनाचे विविध योजना मिळवण्यासाठी सुद्धा ग्रामपंचायतीच्या दाखल्यांची आवश्यकता असते. त्यामुळे घरबसल्या सर्व दाखले मिळावेत, करांचा भरणा, सुद्धा क्षणात व्हावा यासाठी शासनाने हे मोबाईल ॲप सुरू केले आहे. महा ई ग्राम सिटीजन कनेक्ट असे त्याचे नाव असून प्ले स्टोर वरून ते डाऊनलोड करता येईल. यामुळे ग्रामीण नागरिकांना घरबसल्या ग्रामपंचायतीच्या सर्व सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. इगतपुरी तालुक्यातील 96 ग्रामपंचायत या ॲप सोबत जोडल्या गेल्या असून नागरिकांनी या याद्वारे सर्व सेवांचा फायदा घ्यावा असे आवाहन इगतपुरीच्या गटविकास अधिकारी डॉक्टर लता गायकवाड यांनी केले आहे


अँपद्वारे मिळणाऱ्या सुविधा 
ग्रामपंचायत हद्दीमध्ये असलेल्या प्रॉपर्टीचा उतारा, विवाह नोंदणी प्रमाणपत्र, जन्म नोंद प्रमाणपत्र, मृत्यू नोंद प्रमाणपत्र, कराचा भरणा या ॲपद्वारे करता येणार आहे. कोणत्याही दाखल्यांसाठी आता आपल्याला ग्रामपंचायतीकडे अर्ज करावा लागणार नाही. प्लेस्टोर वरून महा ई ग्राम सिटीजन कनेक्ट हे ॲप डाऊनलोड करून घेतल्यावर ग्रामपंचायतचे पदाधिकारी अधिकाऱ्यांची यादी सुद्धा पाहायला मिळणार आहे. आपल्याला ग्रामपंचायतीला काही सूचना द्यायच्या असतील तर त्या सुद्धा देण्याची व्यवस्था ॲपमध्ये आहे. या ॲपचा प्रत्येक नागरिकांना मोठा फायदा होणार असून त्याचा सर्वांनी वापर करावा असे आवाहन विस्तार अधिकारी संजय पवार यांनी सांगितले. 


असे करा डाउनलोड 
प्ले स्टोअरमधून महा ई ग्राम सिटीजन कनेक्ट हे ॲप मोबाईलमध्ये इन्स्टाल करा. त्यानंतर सर्वात खाली डोन्ट हॅव आय कॅन अकाउंट? रजिस्टर यावर क्लिक करा. त्यानंतर एक नवीन पेज ओपन होऊन तुमचे नाव, वडिलांचे नाव, आडनाव, लिंग, जन्मतारीख, मोबाईल, नंबर ईमेल टाकावा. त्यानंतर एक ओटीपी द्वारे खात्री करा. ही संपूर्ण माहिती भरल्यानंतर तुमचे रजिस्ट्रेशन प्रोसेस पूर्ण होईल त्यानंतर तुमच्या रहिसर मोबाईल नंबर वर टेक्स्ट मेसेज द्वारे यूजर आयडी पासवर्ड पाठवला जातो. याचा ॲपच्या लॉग इन करण्यासाठी उपयोग होतो.