Nashik News : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या (Kumbhmela) पार्श्वभूमीवर नाशिकच्या (Nashik) चोहोबाजूने तब्बल 60 किलोमीटरचा प्रशस्त अशा बाह्यरिंगरोडचे काम होणार आहे. नाशिक मनपाची स्थिती नाजूक असल्याने हे काम एमएसआरडीच्या माध्यमातून करण्यात येणार असून यासाठी तब्बल 10 हजार कोटींचा खर्च येण्याची शक्यता आहे.
नाशिक-त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwer) येथे 2027-2028 या वर्षात सिंहस्थ कुंभमेळा होणार असून कुंभमेळ्याचे नियोजन करण्यासाठी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी समिती गठित करण्याच्या सूचना दिल्या होत्या. सिंहस्थात भूसंपादनासह साठ किलोमीटरच्या बाह्य रिंगरोड प्रस्ताव प्राधान्याने तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. या आराखडयात बांधकाम विभागाने पायाभूत सुविधांचा आराखडा तयार करावा. मिळकत विभागाने आवश्यक भूसंपादन, वैद्यकीय व आरोग्य विभागाने सेवा करण्याच्या सूचना यापूर्वीच करण्यात आल्या आहेत. यासंदर्भात काही दिवसांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठक घेत बाह्यरिंगरोड बाबत सकारात्मक भूमिका मांडली होती.
नाशिक शहराच्या बाहेरून येणाऱ्या वाहनांना शहराच्या पलीकडे जाण्यासाठी बाह्य रिंगरोडचे नियोजन करण्यात आले आहे. हा बाह्य रिंगरोड साधारण 60 किमी लांबीचा होणार असून तयार केलेल्या आराखड्यात रस्त्याची रुंदी काही ठिकाणी 36 एवढी आहे. तर काही ठिकाणी 60 मीटर आहे. मात्र हा संपूर्ण रिंगरोड 60 मीटर एवढाच असणे आवश्यक असल्याचे बोलले जात आहे. या रिंगरोडमुळे बाहेरून येणारी वाहने शहरात येऊन गर्दी करण्यापेक्षा बाहेरच्या मार्गाने जाणार आहेत. त्यामुळे या रिंगरोडमुळे भविष्यात शहरातील वाहतूक कोंडी टाळता येणार आहे. विशेषत: कुंभमेळयात होणाऱ्या गर्दीचा भार शहरात पडणार नाही.
असा असणार बाह्य रिंगरोड
दरम्यान नाशिक बाह्य रिंगरोड हा नांदूर नाका ते जत्रा हॉटेल लिंक रो, सातपूर-अंबड लिंक रोड, गंगापूर- सातपूर लिंक रोड, बिटको विहीतगाव-देवळाली रोड असा असणार आहे. याचबरोबर नाशिक शहराच्या बाहेरून येणाऱ्या वाहनांना शहराच्या पलीकडे जाण्यासाठी बाह्य रिंगरोडचे नियोजन करण्यात आले आहे. हा बाह्य रिंगरोड साधारण 60 किमी लांबीचा होणार असून तयार केलेल्या आराखड्यात रस्त्याची रुंदी काही ठिकाणी 36 एवढी आहे. तर काही ठिकाणी 60 मीटर आहे. मात्र हा संपूर्ण रिंगरोड 60 मीटर एवढाच असणे आवश्यक असल्याचे बोलले जात आहे.
वाहनधारकांना भरावा लागणार टोल
बाह्यरिंगरोडसाठी सुमारे दहा हजार कोटींचा ख्रर्च येणार असल्याची शक्यता आहे. तसेच या रिंगरोडचे काम उच्चस्तरीय गुणवत्तापूर्वक असणार आहे. त्यामुळे या रिंगरोडवर वाहनधारकांकडून टोल आकारला जाणार आहे. त्यामुळे शहर व जिल्हासह बाहेरील र्राज्यातील वाहनांना टोलचा भार सहन करावा लागणार आहे.