अमरावती : कोरोनानंतर मोठ्या प्रमाणात घरफोड्या दरोडे आणि चोऱ्या वाढल्याचे समोर येत आहे. भुरट्या चोरांनी आधुनिक तंत्रज्ञानाला सुद्धा चकवा देत आपल्या चोरीच्या कौशल्याचा विकास केल्याचं दिसत आहे. मात्र, अमरावतीच्या अचलपूर येथील झंवर कुटुंबाने जपलेले अठराव्या शतकातील 'हाय सिक्युरिटी लॉक' म्हणजे कुलूप अनेकांना चकमा देणारं आहे. अठराव्या शतकातील हे लॉक लोखंडाचे असून याला सहज उघडता येत नाही. याला उघडण्यासाठी अनेकांची बुद्धीसुद्धा पणाला लागते. लॉक उघडण्यासाठी एक दोन नव्हे तर चक्क चार चाव्यांचा वापर करावा लागतो.
अठराव्या शतकातील 'हाय सिक्युरिटी लॉक'
अमरावती जिल्ह्यातील अचलपूरचे गोपालदास झंवर आणि ब्रिजमोहन झंवर या दोन बंधूंनी हे अठराव्या शतकातील एक आगळं वेगळं आणि विश्वास बसणार नाही असं लॉक जपून ठेवले आहे. पेशाने कास्तकार (शेतकरी) असणाऱ्या या झंवर कुटुंबीयांनी अनेक दुर्मिळ आणि पुरातन वस्तूंचे संग्रह केला आहे. यात हाय सिक्युरिटी लॉक, वाळूचा उपयोग करून तयार केलेली स्टॉप वॉच, बांबूचा उपयोग करून तयार केलेली ज्वेलरी बॉक्स अशा अनेक गोष्टी अनेकांना भुरळ घालणारे आहे. सध्या वाढत्या चोरीचा काळ पाहता हे लॉक अनेकांसाठी उत्सुकतेचा विषय बनला आहे.
झंवर कुटुंबाकडे दुर्मिळ वस्तूंचा खजिना
या चार चावीच्या कुलुपाशिवाय गोपाल झंवर यांच्याकडे इतर तीन कुलूप देखील आहेत. जी अतिशय पुरातन आणि विशेष आहेत. त्यासोबतच पाच मिनिटे आणि एक तास इतका वेळ चालणारी वाळूचे घड्याळं देखील झंवर यांनी जतन करून ठेवले आहे. आजही ह्या सर्व वस्तू अगदी सुस्थितीत असून त्यामध्ये कुठलाही बिघाड आला नसल्याचं गोपाल झंवर यांनी सांगितलं.
अचलपूरचा इतिहास
निजामाची राजधानी असलेले अचलपूर पूर्वीचे जैनधर्मीयांच्या काळातील अलयपूर, निजाम राजवटीतील एलीचपूर ऐतिहासिक शहराला जवळपास 5 किमी परिघाचा परकोट म्हणजे संरक्षक भिंत आहे. त्याला 6 महाद्वार आहे. परकोटाला असलेल्या दरवाजाचा मूळ उद्देश शत्रूपासुन संरक्षण करणे हा दुय्यम उद्देश असून या संरक्षक भिंतीमुळे पूर्वी वर्हाडातील ऐलीचपुर ही सोने, मोती, हिरे यांची मुख्य बाजारपेठ असल्याने कडक सुरक्षा असायची.
इतर महत्त्वाच्या बातम्या :
- Trending : जगातील सर्वात मोठं 'इग्लू रेस्टॉरंट', पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्र, तुम्ही पाहिलं का?
- Ram Rahim Singh : पंजाब निवडणुकीच्या तोंडावर राम रहीम तुरुंगाबाहेर, 21 दिवसांची सुट्टी मंजूर
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha