Maharashtra News LIVE Updates: देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा सविस्त जाणून घ्या फक्त एका क्लिकवर...

दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 14 Jan 2024 01:22 PM
Akola Police Firing Accused Arrested : पोलिसांच्या गस्ती पथकावर गोळीबार करणारे दरोडेखोर अटकेत

Akola Police Firing Accused Arrested : अकोला जिल्ह्यातील 30 डिसेंबरच्या रात्री उरळ पोलिसांच्या गस्ती पथकावर दरोडेखोरांनी गोळीबार केल्याची खळबळजनक घटना घडली होती. उरळ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मांजरी फाट्यावर हा प्रकार घडला होताय. आज तब्बल 15 दिवसांनी याप्रकरणात पाच आरोपींना अकोला पोलिसांनी अटक केलीय. या आरोपींवर पोलिसांनी 25 हजारांचं बक्षीस ठेवलं होतं. 30 डिसेंबरला पोलीस पथक गस्त घालत असताना पहाटे तीनच्या सुमारास हा गोळीबार झाला होता. पथक गस्त घालत असतांना मांजरी फाट्यावर दोन दुचाकीवरील लोकांच्या हालचाली त्यांना संशयास्पद वाटल्यात. पथकाने त्यांना हटकल्यावर त्यांनी गोळीबार सुरू केला. यात पोलीसांच्या वाहनावर नऊ गोळ्या झाडल्याचे निशाण होते. गोळीबारात एका पोलीस कर्मचारी जखमी झाला होता. या प्रकरणी आता अटक केलेल्या आरोपींमध्ये हातरून नखेगाव नेल धामणा शेगाव आणि वाशिम जिल्ह्यातील रिसोड येथील एका आरोपीचा समावेश आहे. हे सर्वजण परिसरात शिकारीसाठी फिरत असल्याची माहिती पोलीस सूत्राने दिली आहे.

Wardha News : वर्ध्यातील दोन तरुण अयोध्येच्या दिशेने पायी निघाले

Wardha Youngster Ayodhya Visit News : अयोध्येला 22 तारखेला राम रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होत असताना तिथे जाऊन प्रत्यक्ष दर्शन घेण्यासाठी कोट्यावधी रामभक्त आसुसलेले आहेत. अयोध्येत जाऊन कधी रामाचं दर्शन घेता येईल याकरता प्रत्येकाची धडपड आहे. वर्धा जिल्ह्यातील पुलगाव येथील दोन तरुण अयोध्येच्या दिशेने पायी निघाले आहे. पंकज माहोर आणि अंकित जोरिगवार अशी अयोध्येला निघालेल्या दोन राम भक्त तरुणांची नावे आहेत. खांद्यावर दोन बॅग, हातात रामाचा झेंडा आणि रामनामाचा जप करत, हे दोघे पुलगाव ते आयोध्या असा सुमारे 900 पेक्षा जास्त किलोमीटरचा अंतर पायी पार करणार आहे. त्यांच्याजवळ पैसेही नाहीत, मार्गावरील रामभक्तच निवासाची आणि खाण्याची व्यवस्था करत आहे.

Pune News: पुणे : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याविरोधात आज पुण्यात काँग्रेसकडून आंदोलन

Pune News: पुणे : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात आज पुण्यात काँग्रेस कडून आंदोलन करण्यात आले. नारायण राणे यांनी शंकराचार्य यांच्या संदर्भात हिंदू धर्माला त्यांचे काय योगदान असे विधान केलं होतं. यानंतर आता काँग्रेस ने पुण्यात आंदोलन केले. या आंदोलनाच्या वेळीस काँग्रेस कार्यकर्त्यांनी चक्क कोंबडी घेऊन नारायण राणे यांच्या विरोधात तीव्र शब्दात घोषणाबाजी केली.

Milind Deora Quits Congress LIVE Updates : काँग्रेसमध्ये तिकीट मिळणार नव्हते, म्हणून देवरांचा राजीनामा, अतुल लोंढे यांची प्रतिक्रिया

Atul Londhe On Deora : ज्याला काँग्रेसमध्ये तिकीट मिळणार नव्हते, जो दोन वेळा पराभूत  झालेला उमेदवार होता, ज्याच्या विरोधात सर्व्हे आला होता, याची कल्पना आल्यामुळे त्यांनी कॉन्टॅक्ट केला असेल, असे मत काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी व्यक्त केलं आहे. अजून काही पराभूत उमेदवार त्यांच्यासोबत जाताना दिसतील, असंही लोंढे म्हणाले आहेत. एकनाथ शिंदेसोबत जनता बिलकुलच नाही, संविधानाची उपेक्षा करून नार्वेकरांनी निकाल दिला आहे. इन्कम टॅक्स, सीबीआय आणि ईडी याला घाबरून लोक जात आहे. याकरता राहुल गांधींना दोष देण्यात काही अर्थ नाही असे लोंढे म्हणाले..


 

 

 

 

Sindhudurg News : कणकवलीत महायुतीचा कार्यकर्ता मेळावा

सिंधुदुर्ग : महायुतीचा सिंधुदुर्गातील कणकवलीत कार्यकर्ता मेळावा आहे. या मेळाव्यात केंद्रीय मंत्री नारायण राणे, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, महिला बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या सह तिन्ही पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते याच्या उपस्थित मेळावा घेत आहेत. कणकवलीमधील शिवाजी चौकातून भगवती हॉल पर्यंत रॅली काढत आहेत. त्यानंतर मेळाव्याला सुरुवात होणार आहे.

Maharashtra Politics: 2024 साली जनता मतपेटीतून शिल्लक सेनेची तिरडी उचलल्याशिवाय राहणार नाही

Maharashtra Politics: 2024 साली जनता मतपेटीतून शिल्लक सेनेची तिरडी उचलल्याशिवाय राहणार नाही


संजय राऊत यांच्या ट्विटला भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांचं चोख प्रत्युत्तर


2019 साली हिंदुत्ववादी विचारांची हत्या करून सोनिया सेनेशी घरोबा केला-दरेकर


संजय राऊतांच्या तोंडून संविधान आणि लोकशाहीची भाषा शोभत नाही- दरेकर


विधानसभा अध्यक्षांबद्दल संजय राऊत यांच्या आक्षेपार्ह ट्विटला भाजपचं प्रत्युत्तर


भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी एक्सवरून काय म्हटलंय पाहुयात


ज्यांनी 2019 साली जनतेनं दिलेल्या मतांची तिरडी बांधली आणि हिंदुत्ववादी विचारांची हत्या करून सोनिया सेनेशी घरोबा केला. त्यांच्या तोंडून संविधान आणि लोकशाहीची भाषा शोभत नाही.


महाराष्ट्र न्यायप्रिय होता म्हणूनच 2019 साली युतीला बहुमत मिळालं होतं, पण तुम्ही जनतेवर अन्याय करून मविआ सरकार लादलं. अध्यक्षांनी लोकशाहीचं रक्षण करत निकाल दिला. 


आता फोटोत तुम्ही कशीही तिरडी बांधली तरी 2024 साली जनता मतपेटीतून तुमच्यासह शिल्लक सेनेची तिरडी उचलल्याशिवाय राहणार नाही. संजू भाऊ, भेटू जनतेच्या न्यायालयात.

Bhandara News: प्रेमविरहात तरुणीनं केली आत्महत्या; दोन दिवसांनी मिळाला विहिरीत मृतदेह, लाखांदूर तालुक्यातील घटना

Bhandara News: मागील दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या एका 20 वर्षीय तरुणीचा मृतदेह अखेर गावातीलचं विहिरीत सापडला. ही घटना भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील तई बूज इथं उघडकीस आली. प्रांजली शास्त्री कोल्हे (20) असं मृतक तरुणीचं नाव आहे. मृतक प्रांजलीच्या प्रियकराचं काही दिवसांपूर्वी दीर्घ आजारानं मृत्यू झाला होता. तेव्हापासून ती डिप्रेशनमध्ये असल्याची माहिती समोर आली असून त्यातचं तिनं आत्महत्या केल्याची माहिती पालांदुर पोलिसांनी दिली आहे.

Malegaon News: नांदेड जिल्ह्यातील माळेगांवच्या खंडोबा यात्रेला भाविकांची प्रचंड गर्दी

Malegaon News: नांदेड जिल्ह्यातील माळेगांवच्या खंडोबा यात्रेला भुतों भविष्यती गर्दी झालीय, शनिवारी रात्री या यात्रेत लाखोंच्या संख्येने यात्रेकरू सहभागी झाले होते. त्यामुळे यात्रेत आता प्रचंड अशी गर्दी झाली आहे. 

Solapur News: ...अन् रोहित पवार क्लीन बोल्ड!

Solapur News: शरद पवार गटाचे आमदार तथा महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन अध्यक्ष रोहित पवार हे सोलापूर दौऱ्यावर आहेत. सोलापुरातील इंदिरा गांधी क्रिकेट स्टेडियमवर रोहित पवार यांच्या हस्ते एका क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन करण्यात आले. यावेळी आमदार रोहित पवार यांनी स्वतः देखील क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला. सुरुवातीला जोरदार फटका लगावत रोहित पवार यांनी चेंडू सीमारेषेपलीकडे पाठवला. नंतर पुढे येऊन जोरदार फटका लागवण्याचा प्रयत्न करताना मात्र रोहित पवार क्लीन बोल्ड झाले. आपल्या वक्तव्यानी अनेकांना क्लीन बोल्ड करणारे रोहित पवार स्वतः क्रिकेटच्या मैदानात क्लीन बोल्ड झाल्याने उपस्थितांचा हिरमोड झाला असावा.

Kandivali News: कांदिवली पूर्वेत ठाकूर कॉलेजजवळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून रस्त्यावर डीप क्लिनिक मोहीम

Kandivali News: कांदिवली पूर्वेत ठाकूर कॉलेजजवळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून रस्त्यावर डीप क्लिनिक मोहिमेचा अंतर्गत पाणी फवारणी सुरू आहे. यावेळी अनेक पदाधिकारीही उपस्थित आहेत. 

Ahmednagar News: अहमदनगरमध्ये महायुतीचा मेळावा

Ahmednagar News: येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीकडून राज्यात महायुतीच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. खासदार सुजय विखेंच्या विरोधात दक्षिण लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची तयारी सुरू करणारे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार नीलेश लंके यांना महायुतीच्या नगरमध्ये होणाऱ्या मेळाव्याचे महायुतीकडून निमंत्रण देण्यात आले. त्यामुळे लंके महायुतीच्या व्यासपीठावर येणार की नाही? या चर्चेला उधाण आले आहे.

Wardha Lok Sabha: वर्धा लोकसभेची जागा महायुतीत भाजपचीच

Wardha Lok Sabha: वर्धा लोकसभेच्या जागेवर गेल्या सहा महिन्यात वेगवेगळ्या चर्चा होत आहे. महायुतीमधील घटक पक्ष देखील वर्ध्याच्या जागेवर हक्क सांगत आहेत.सध्या वर्ध्यात ही जागा भाजपकडे आहे. महायुतीमध्ये ही जागा नेमकी कुणाला मिळते याकडे सर्वांचे लक्ष लागले असताना खासदार रामदास तडस यांनी वर्धा लोकसभा क्षेत्रात झालेली कामे ही भाजपने केली आहे. त्यामुळे आपण तर ही जागा मागणारच आहोत. परंतु पक्षश्रेष्ठीचा निर्णय जो असेल तो आम्हाला मान्य असेल अशीच प्रतिक्रिया दिलीय. आज महायुतीचा मेळावा वर्ध्यात होत आहे. या मेळाव्यात महायुतीमधील घटकपक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे मंथन होणार आहे. यात वर्धा लोकसभेच्या जागेच्या बाबतीत घटकपक्षातील पदाधीकाऱ्यांमध्ये एकमत होणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 


 

Nashik News: नाशिकच्या येनवल्यामध्ये मकरसंक्रांतीनिमित्त पतंग महोत्सवाचं आयोजन

Nashik News: नाशिकच्या येनवल्यामध्ये मकरसंक्रांतीनिमित्त पतंग महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. तसंच स्त्रियांचे महावस्त्र असलेली ' पैठणीसाठी ' आणि येवलेकर यांच्या उत्साहाचे दर्शन घडविणाऱ्या पतंग महोत्सवामुळे देशभरात नाशिकच्या येवल्याची एक वेगळी ओळख निर्माण झालीय. तसंच पुढचे तीन दिवस हा महोत्सव रंगणार आहे. 

Maharashtra Wether Updates: संक्रांतीनंतर राज्यात हुडहुडी, मुंबईत मात्र घामाच्या धारा

Maharashtra Wether Updates: राज्यात थंडी पुन्हा वाढताना दिसतेय. संक्रांतीनंतर आठवडाभरात  राज्यभरातील किमान तापमानाचा पारा सरासरी 15 अंशांच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. मात्र असं असलं तरी मुंबईत मात्र ऐन थंडीत गरमीचा सामना करावा लागत आहे. तसंच दक्षिण भारतातील हिवाळी पावसाचा हंगाम 15 जानेवारीला आटोपण्याची शक्यता आहे. त्यानंतर महाराष्ट्रात थंडीसाठी पूरकता वाढते. राज्यातील ढगाळ वातावरण कमी होणार असून, कोरडे वातावरण राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात गारठा वाढण्याची शक्यता. 

Pune News: पुण्यात आज भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून हर मंदिर स्वच्छता अभियानाचा शुभारंभ

Pune News: पुण्यात आज भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी हर मंदिर स्वच्छता अभियानाचा शुभारंभ केला.  पुण्यातील शिवाजीनगरमध्ये असलेल्या श्री रोकडोबा देवस्थानापासून या मोहिमेला सुरुवात करण्यात आली. यावेळी भाजपचे अनेक पदाधिकारीही उपस्थित होते. 

Bharat Jodo Nyay Yatra: आजपासून भारत जोडो न्याय यात्रेला सुरूवात, राहुल गांधींच्या नेतृत्वात मणिपूरमधून सुरुवात

Bharat Jodo Nyay Yatra: भारतो जोडाच्या यशानंतर काँग्रेस नेते राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेला आजपासून सुरूवात होत आहे. थौबल येथील जाहीर सभेनंतर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंच्या उपस्थितीत भारत जोडो न्याय यात्रेला सुरूवात होईल. लोकसभा निवडणुकीच्या आधी बेरोजगारी, महागाई आणि सामाजिक न्याय हे मुद्दे यात्रेच्या माध्यमातून उपस्थित केले जाणार आहेत. ही यात्रा पूर्व ते पश्चिम दिशेने 15 राज्यांमधून जाईल आणि मुंबईमध्ये समाप्त होईल. 67 दिवसांच्या यात्रेत राहुल गांधी 6 हजार 700 किमी एवढा प्रवास करतील. राहुल गांधींनी भारत जोडो यात्रा पायीच पूर्ण केली होती. पण यावेळेसची भारत जोडा न्याय यात्रा पायी आणि बसमधून पूर्ण केली जाणार आहे. लांबचं अंतर बसमधून पार केलं जाणार आहे.

Solapur News: सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेचा आजचा दुसरा दिवस

Solapur News: सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेचा आजचा दुसरा दिवस आहे. काल यन्नीमज्जन म्हणजे तैलभिषेक सोहळा पार पडल्यानंतर आज अक्षता सोहळा पार पडणार आहे. दुपारी 12 वाजता सिद्धेश्वर मंदिर परिसरातील अक्षता कट्ट्याजवळ हा सोहळा पार पडेल. त्यापूर्वी मानकरी असलेल्या हिरेहब्बू यांच्या वाड्याजवळून मानाच्या 7 नंदिध्वजाची मिरवणूक सुरू झालीये.

Milind Deora Tweet : पक्षासोबतचं 55 वर्षांचं नातं संपवतोय; मिलिंद देवरा यांचं ट्वीट 

Milind Deora Tweet : मिलिंद देवरा यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचं ट्वीट केलं आहे. ट्वीटमध्ये त्यांनी लिहिलं आहे की, "आज माझ्या राजकीय प्रवासातील एका महत्त्वाच्या अध्यायाचा शेवट होत आहे. मी काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देतोय. माझ्या कुटुंबाचं पक्षाशी असलेलं 55 वर्षांचं नातं संपुष्टात आलं आहे. मी सर्व नेते, सहकारी आणि कार्यकर्त्यांचा वर्षानुवर्ष अखंड पाठिंबा दिल्याबद्दल आभारी आहे." मिलिंद देवरा यांच्या ट्वीटवर काँग्रेसनंही प्रतिक्रिया दिली आहे. पक्षाचे खासदार आणि सरचिटणीस जयराम रमेश यांनी मिलिंद देवरांचे वडील आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मुरली देवरा यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. 

Milind Deora Resigns: काँग्रेस नेते मिलिंद देवरांचा काँग्रेसला रामराम; शिंदे गटात प्रवेश करणार

Milind Deora Resigns: काँग्रेस नेते मिलिंद देवरा शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. मिलिंद देवरा यांनी काँग्रेस  सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय. मिलिंद देवरा 10 माजी नगरसेवक, 25 पदाधिकाऱ्यांसह आज शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. दुपारी 2 वाजता वर्षा बंगल्यावर पक्षप्रवेश होणार आहे.. तसंच  सकाळी 11 वाजता सिद्धीविनायकाचं दर्शन घेऊन मिलींद देवरा आपली भूमीका माध्यमांसोर स्पष्ट करतील.


दक्षिण मुंबई मतदारसंघाबाबत महाविकास आघाडीत काहीशी धुसफूस असल्याचं दिसून येत आहे. ठाकरे गटाकडून वारंवार दक्षिण मुंबई मतदारसंघावर दावा सांगण्यात आल्यापासूनच काँग्रेस नेते नाराज असल्याच्या चर्चा आहेत. अशातच याच नाराजीतून मिलिंद देवरा काँग्रेसची साथ सोडून शिंदेंच्या शिवसेनेत  प्रवेश करत आहेत. 

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.