Maharashtra News LIVE Updates : सोलापुरात भाजपची डोकेदुखी वाढणार, पाणी प्रश्नावर मंगळवेढा तालुक्यातील 24 गावे टाकणार बहिष्कार

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये..

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 05 Mar 2024 02:40 PM
Washim News : टोल कर्मचाऱ्यांचे आंदोलन, दोन महिन्यापासून वेतन थांबल्याने कर्मचारी आक्रमक

वाशिम : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर वाशिमच्या कारंजा लाड येथे गेल्या दोन महिन्यापासून वेतन थांबल्याने येथील टोल वसुली करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केल आहे.  गेल्या दोन तासापासून एकाही वाहनाकडून टोल वसुली न करता वाहन सोडून हे आंदोलन सुरू करण्यात आलं आहे. यापूर्वीही अनेक वेळा समृद्धी महामार्गावर टोल वसुली करतात ठेवण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना पगार न दिल्यामुळे यापूर्वी आंदोलन करण्यात आले होते. मात्र, इतका मोठा महामार्ग आणि सर्वाधिक टोल असलेला महामार्ग असं सर्व असतानाही वेतन देण्यासाठी अनाकानी का केला जात आहे असा प्रश्न आता यावेळी उपस्थित होत आहे. पगार नियमित देण्यात यावा ही मागणी घेऊन हे आंदोलन सुरू करत असल्याचं सांगण्यात आलं आहे.

Sindhudurg Accident : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर कुडाळ आणि कणकवलीत कार अपघातात 1 ठार, 4 जण गंभीर जखमी

Sindhudurg News : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर सिंधुदुर्गात दोन अपघातात एक ठार तर चार गंभीर जखमी झाला आहेत. कुडाळ मागील राष्ट्रिय महामार्गावर ओव्हर ब्रिजवर कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात कारमधील एकाचा मृत्यू झाला तर अन्य तिघे गंभीर जखमी आहेत. जखमींना गोवा येथे उपचारासाठी हलविण्यात आले. या अपघातात कारचा चेंदामेंदा झाला असून यावरून अपघाताची भीषणता दिसून येते. तर दुसरीकडे मुंबई गोवा महामार्गावर कणकवली मध्ये बोलेरो कार पलटी होऊन अपघात झाला. यामध्ये चालक अक्षय ज्ञानदेव केळकेंद्र गंभीर जखमी झाला आहे.

Ratnagiri Turtle : कासव संवर्धनात गुहागर तालुका राज्यात अव्वल

Ratnagiri News : कासव संवर्धन कार्यक्रम, कासव प्रेमींसाठी आणि रत्नागिरी जिल्हावासियांसाठी आनंदाची बातमी... यंदा कासव संवर्धनात रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुका राज्यात अव्वल ठरला आहे. राज्याचा विचार करता गुहागर तालुक्यात तब्बल 23 हजार 198 अंड्याचे संवर्धन करण्यात आलं आहे. फेब्रुवारी महिन्याचा विचार केला, तर एकूण 1318 कासवांची पिल्ले समुद्रात सोडली आहेत. 2012 मध्ये 9 घरट्यांपासून सुरू झालेला प्रवास 2023 अखेर साधारण 300 घरट्यांपर्यंत पोहोचला आहे. मागील दहा वर्षात आतापर्यंत एकूण 53 हजार हून अधिक अंडी संवर्धित करून त्यातून जन्माला येणारे पिल्ले समुद्रात सोडण्यास वनविभाग आणि स्थानिक कासवप्रेमी यांना यश आलं आहे.

 Anil Desai : चौकशीला पूर्णपणे सहकार्य करू : अनिल देसाई

Maharashtra News : चौकशीला पूर्णपणे सहकार्य करू, असं अनिल देसाई यांनी म्हटलं आहे. या चौकशीमुळे कुठल्याही प्रकारचा प्रेशर पक्षावर येणार नाही. हा पार्टी फंड आहे, त्याचा वापर पक्षाच्या कार्यासाठी केला जातो. त्यांना जर या संबंधी चौकशी करायची असेल तर सगळी माहिती आम्ही देऊ. तुम्ही म्हणत आहात आणि जनतेला कळत आहे. लोकसभा निवडणुका जवळ आलेले आहेत आणि अनुषंगाने ही कारवाई होती आहे. जी तक्रार दाखल केली आहे, पक्षाच्या निधी संदर्भात आहे आणि त्यावर आम्ही सगळी माहिती देऊ, असं देसाई यांनी सांगितलं आहे.

Bhandara-Gondia News : भंडारा - गोंदिया लोकसभेवर राष्ट्रवादी काँग्रेसचा दाव्यानं भाजपात संभ्रम

Bhandara-Gondia Lok Sabha News : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासादर प्रफुल्ल पटेल यांची राज्यसभेवर निवड झाल्यानंतर भंडारा-गोंदिया लोकसभा निवडणुकीत भाजपाचा मार्ग सुकर झाल्याचं बोललं जातं होतं. पण, भंडारा इथं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या विस्तारीत सभेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनंचं लढावी, असा ठराव घेवून या क्षेत्रावर दावा केला आहे. भंडारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या या भूमिकेमुळं भाजपकडून इच्छुक असलेले नेते मात्र संभ्रमात पडलेत. 7 मार्चला गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी इथं अजित पवार यांची सभा होत आहे. या सभेच्या तयारीसाठी भंडाऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता आणि पदाधिकाऱ्यांची बैठक बोलाविली होती, त्यात हा ठराव घेण्यात आला आहे. भंडाऱ्यात घेण्यात आलेल्या कार्यकर्त्यांच्या भावनांचा हा ठराव आज मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत सादर केला जाणार आहे. त्यामुळं आता भाजपसह अन्य पक्षांच्या नजरा राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्णयाकडे लागल्या आहेत.

Manoj Jarange Patil : मराठा तरुणाच्या घरी मनोज जरांगे पाटील यांची भेट

Beed News : मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याने बीड तालुक्यातल्या गवळवाडी येथील तरुणाने आत्महत्या केली होती आणि याच तरुणाच्या कुटुंबीयांच्या भेटीसाठी मनोज जरांगे पाटील पोहोचले होते. जरांगे पाटील हे सध्या बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून गवळवाडी गावात त्यांनी धीरज मस्के या आत्महत्या केलेल्या मराठा तरुणांच्या कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केलं. यावेळी नारायण गडचे महंत शिवाजी महाराज हे देखील उपस्थित होते. मनोज जरांगे पाटील हे आज बीड जिल्हा दोवऱ्यावर आहेत. गवळवाडी येथे त्यांनी अखंड हरिनाम सप्ताहात देखील भेट देऊन मराठा समाज बंधवाशी सवांद साधला.

Anil Desai : शिवसेना ठाकरे गटाचे नेते चौकशीसाठी हजर, मुंबई आर्थिक गुन्हे शाखेकडून समन्स

Anil Desai Enquiry : शिवसेना ठाकरेचे माजी खासदार मुंबई आर्थिक गुन्हे शाखा कार्यालयात दाखल झाले आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे  नेते माजी खासदार अनिल देसाई यांना मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून समन्स बजावण्यात आला होता. शिवसेना पक्षाच्या निधी  संदर्भात शिवसेना शिंदे गटाने आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची दखल घेऊन आर्थिक गुन्हे शाखेने  शिवसेना पक्षाच्या निधी खात्या संदर्भातील चौकशी सुरू केली असून अनिल देसाई यांना आज चौकशीसाठी बोलावलं आहे. निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांची शिवसेना ही खरी शिवसेना असल्याचा जाहीर केल्यानंतर पक्षनिधी खात्यातील 50 कोटी रुपये काढल्याचा आरोप शिवसेना शिंदे गटाने करत तक्रार दाखल केली होती. त्यासंबंधी आता अनिल देसाई यांची चौकशी होणार असल्याची माहिती आहे.

Congress Seat Sharing : कांग्रेसच्या वाट्याला येणाऱ्या 22 जागांचा आज आढावा होणार

 Lok Sabha 2024 : कांग्रेसच्या वाट्याला येणाऱ्या जागांचा आज होणार आढावा 


कांग्रेस घेणार आज 22 जागांचा आढावा


या 22 जागांपैकी 18 ते 20 जागा कांग्रेस लढवणार


या 22 लोकसभा मतदारसंघातील उमेदवार कोण याची ही चाचपणी आज  केली जाणार


कोणत्या जागेवर कांग्रेस लढणार?


भिवंडी
पुणे
सोलापुर
कोल्हापूर ( छ. शाहू महाराज यांच्यासाठी सोडण्याची शक्यता)
नंदुरबार
सांगली
धुळे
जालना
रामटेक
नांदेड
यवतमाळ
भंडारा  
हिंगोली
नागपुर
चंद्रपूर
अमरावती
गोंदिया
गडचिरोली


यासह 22 जागांचा आढावा कांग्रेस कडून घेतला जाणार आहे. प्रदेश कांग्रेसचा आढावा घेतल्यानंतर मुंबई काॅगेस मुंबईतील जागांचा आढावा घेणार आहेत.

अमित शहांची आजची बैठक संघटनात्मक : राधाकृष्ण विखे

Amit Shah Visit Maharashtra : अमित शहांची आजची बैठक संघटनात्मक असून, ते राज्यातील विविध क्लस्टरच्या बैठका घेतायेत. संजय राऊतांच्या डोक्यावर परिणाम झालाय. ज्या उद्धव ठाकरेंचं राज्यात काहीच योगदान नव्हतं, ते इतरांच्या योगदानाबद्दल विचारतायेत. अडीच वर्ष त्यांनी घरी बसून कारभार केला. लोकसभा लढवण्याचा विचार करण्याचं प्रत्येकाला स्वातंत्र्य. निलेश लंकेंना समजावणार नाहीय. त्यांना अजितदादा बोलतील.  बच्चू कडून मुख्यमंत्री बोलतील, ते नाराज नाहीत.  महादेव जानकर मविआत जाणार नाहीत, असे विकेह म्हणाले. 

Sangli Water Cut : सांगली महापालिका क्षेत्रात बुधवारी अपुरा पाणीपुरवठा होणार

Sangli News : सांगली महापालिका क्षेत्रात बुधवारी अपुरा पाणीपुरवठा होणार आहे. पालिकेने यासंदर्भात माहिती दिली आहे.


 

Rahul Gandhi : राहुल गांधींची भारत जोडो यात्रा 12 मार्चला धुळे जिल्ह्यात

Bharat Jodo Nyay Yatra : राहुल गांधींची भारत जोडो यात्रा 12 मार्चला धुळे जिल्ह्यात आहे. 12 मार्चला सायंकाळी दोंडाईचा येथे आल्यानंतर 13 मार्चला सोनगीर देवभाने कापडणे नगाव देवपूर मार्गे शहरात आल्यानंतर महात्मा गांधी पुतळा ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत रॅली काढून शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ राहुल गांधींची सभा होणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेमुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण होणार आहे.

Thane Maharojgar Melava : मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात महारोजगार मेळावा

Namo Maharojgar Melava 2024 : पवारांच्या बारामतीनंतर उद्या मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात महारोजगार मेळावा


कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांचे आयोजन


ठाण्यातील मॉडेल मिल कंपाऊंड येथे 6 आणि 7 मार्चला नमो महारोजगार मेळावा


विरोधकांच्या बेरोजगारीच्या मुद्द्याला उत्तर देण्यासाठी महारोजगार मेळाव्यांचा धडाका


देशातील पहिल्या स्किल युनिव्हर्सिटीचेही मुख्यमंत्री करणार उद्घाटन


विद्याविहार येथे स्वामी विवेकानंदांच्या नावाने आंतरराष्ट्रीय कौशल्य विकास प्रबोधिनी सुरु होणार


चार आंतरराष्ट्रीय भाषा, AI सारख्या नाविन्यपूर्ण विषयाचे मिळणार प्रशिक्षण


जपान, जर्मनी, फ्रान्स सारख्या देशात थेट रोजगार मिळवून देणार

Amit Shah Maharashtra Daura : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह जळगाव दौऱ्यावर

Amit Shah Jalgaon Visit : भाजपा नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज भाजपा युवा संमेलनाच्या निमित्ताने जळगाव दौऱ्यावर आहेत. अमित शाह हे प्रथमच जळगाव मधे येत असल्याने त्यांच्या स्वागताच्या साठी जय्यत तयारी सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे.
आगामी लोकसभा निवडणुका पाहता अमित शाह यांचा हा दौरा पक्ष बळकटीसाठी अतिशय महत्वाचा मानला जात आहे. जळगाव जिल्हा हा भाजपचा बालेकिल्ला असला, तरी विरोधकांना आगामी काळातील निवडणुकीत पूर्णपणे नामोहरम करण्याची भाजपची रणनीती असल्याचं पाहायला मिळत आहे. याचाच एक भाग म्हणून आजचा अमित शाह यांचा दौरा मानला जात असून युवा संमेलनात ते युवकांसह भाजप नेत्यांना काय मार्गदर्शन करतात, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. अमित शाह यांच्या या दौऱ्याचा निमित्ताने त्यांच्यासोबत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस, चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री गिरीश महाजन आणि स्थानिक आमदार, खासदार, सुद्धा उपस्थित राहणार असल्याने जिल्ह्याच्या तसेच राज्याच्या राजकारणाच्या दृष्टीने अमित शाह यांचा हा दौरा महत्व पूर्ण मानला जात आहे.

Virar Accident : पायलिंग मशीन एका कारवर पडल्याची घटना

विरार : विरारमध्ये बिल्डिंगच्या पायलिंग मशीन एका कारवर पडल्याची घटना घडली आहे. विरार पश्चिमेच्या विरार गार्डनमध्ये मायफेअर डेव्हलपरचे बिल्डर नयन शाहा यांचे मोठे कंट्रक्शनचे काम चालू आहे. या कामाच्या दरम्यान सोमवारी सायंकाळी 6:30 च्या सुमारास पायलिंग खोदण्याची मशीन चक्क एका कारवर पडली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसून, कारचं मात्र मोठे नुकसान झाले आहे. सकाळ-सायंकाळ या परिसरात शाळकरी मुले, वयोवृद्ध नागरिक, रहिवाशी ये-जा करत असतात. बिल्डरने सेफ्टीबाबत योग्य काळजी घेतली नाही, जर कुणाच्या अंगावर ही पायलिंगची मशीन पडली असती तर, याला जवाबदार कोण, असा सवाल स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला आहे.

Sindhudurg Kiranotsav News : तळकोकणातील सातेरी मंदिरात किरणोत्सव सोहळा

Sindhudurg News : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्लेचं ग्रामदैवत सातेरी मंदिर पूरातन पांडवकालीन मंदिर आहे. या मंदिराची बांधणी वास्तुकलेचा एक सुंदर नमुना असून कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात जसा किरणोत्सव होतो, अगदी तसाच किरणोत्सव वेंगुर्लेचे ग्रामदैवत श्री देवी सातेरीच्या मंदिरात होतो. सलग तीन दिवस हा किरणोत्सव योग असतो. हा किरणोत्सव योग पाहण्यासाठी भाविक गर्दी करतात. खगोलशास्त्राचा अभ्यास करुन वास्तूशास्त्र कलेचा सुंदर मिलाप असलेले हे वेंगुर्ले येथील सातेरी मंदिर असून किरणोत्सव सोहळा पाहून भाविक आनंदित झाले. श्री देवी सातेरीच्या मुखावर सकाळची सोनेरी किरणे पडल्यानंतर फार विलोभनीय दृश्य भाविकांनी अनुभवायला मिळत. हा किरणोत्सव योग सूर्याच्या उत्तरायण आणि दक्षिणायन यामध्ये घडून येतो. 

Palghar Traffic : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी

पालघर : मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मनोर वरई फाटा ते वसईपर्यंत दोन्ही बाजूने मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. गेले काही दिवस या महामार्गाचे सिमेंट काँक्रीची करणाच्या काम सुरू असल्याने सतत या महामार्गावर वाहतूक कोंडी होत असून महामार्ग प्रशासन आणि संबंधित ठेकेदाराच्या दुर्लक्षामुळे वाहन चालक तसेच प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे

Amit Shah Akola Daura :

Amit Shah News : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज अकोल्यात येत आहे. शाह अकोल्यात सहा लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहेत. मतदारसंघामध्ये पश्चिम विदर्भातील अकोला, बुलडाणा, अमरावती, यवतम्ळ-वाशीमसह पुर्व विदर्भातील चंद्रपूर आणि वर्धा लोकसभेचा समावेश आहे. अकोला शहरालगतच्या रिधोरा गावातील हॉटेल ग्रँड जलसा येथे ही बैठक होत आहे. यानिमित्तानं अकोल्यात मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. अकोला विमानतळ ते कार्यक्रम स्थळापर्यंत प्रत्येक चौकाचौकात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.

Sindhudurg News : सिंधुदुर्गातील नागवे गावात बिबट्याचा मुक्त संचार

Sindhudurg Leopeard News : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवलीमधील नागवे गावात पहाटे बिबट्या गावात फिरत असल्याचं समोर आल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गावात येणाऱ्या वाहन चालकाला बिबटया गावातील रस्त्यावर दिसला. हा बिबट्या गेले चार दिवस भर वस्तीत फिरत असल्याने नागरिकांनी वनविभागाला बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी केली आहे.

Yujendra Pawar : युगेंद्र पवार आज आणि उद्या बारामती गावभेट दौरा करणार

Baramati Lok Sabha News : लोकसभा निवडणुक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात घडामोडींना वेग आला आहे. युगेंद्र पवार आज बारामती तालुक्यात गावभेट दौरा करणार आहेत. युगेंद्र पवारांनी काकांची साथ सोडून आता आत्याच्या प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. आज आणि उद्या युगेंद्र पवार बारामती तालुक्यात गावभेट दौरा करणार आहेत.  अजित पवारांनी मला कुटुंबात एकटे पाडले जात आहे. पवार कुटुंबातील व्यक्ती माझा प्रचार करणार नाही, असे अजित पवार म्हणाले होते. त्यानंतर अजित पवारांचा सख्खा पुतण्या आत्यासाठी प्रचार करणार आहे.




 


Nashik News : ड्रीपच्या नळीमध्ये अडकले हरीण आणि काळविट, ग्रामस्थांकडून सुटका

Chandwad News : चांदवड : नाशिकच्या चांदवड तालुक्यातील कातरवाडी गावात पाण्याच्या शोधात आलेले हरीण आणि काळविट कांद्याच्या शेतातील ड्रीपच्या नळीमध्ये अडकले. शिंग आणि गळ्याभोवती फास बसल्याने त्याच अवस्थेत ते सैरावैरा धावू लागले. स्थानिक वन्यजीवप्रेमी आणि वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी तब्बल दोन तास अथक परिश्रम घेत दोघांचीही सुखरूप सुटका केली. दरम्यान, या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये शेतकऱ्यांच्या कांद्याची मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. वन विभागाने तातडीने वन्यप्राण्यांसाठी पिण्याचे पाण्याची सुविधा उपलब्ध करावी, कृत्रिम पाणवठे तयार करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Nashik News : मनमाडला पोलिसांकडून सशस्त्र पथ संचलन 

मनमाड : आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या मनमाडमध्ये केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल अर्थात सीआयएसएफ पथक आणि मनमाड पोलिस प्रशासनातर्फे शहरातून सशस्त्र पथसंचलन करून शक्ती प्रदर्शन करण्यात आले. चार वरिष्ठ पोलीस अधिकारी, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे जवान, पोलीस कर्मचारी या पथ संचलनात सहभागी झाले होते. शहर पोलीस स्थानकातून या संचलनाला सुरुवात झाली. नगीना मशीन, एकात्मता चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, खंडेराव मंदिर, सुभाष रोड, गांधी चौकातून निघालेल्या सशस्त्र पथसंचालनाने नागरीकांचे लक्ष वेधून घेतले.

Nagpur News : डॉ. सुभाष चौधरी यांना मुंबई उच्च न्यायालयाचा दणका

Nagpur News : कुलगुरू प्रकरण अपडेट


राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांच्या निलंबनाच्या आदेशाला स्थगिती द्यायला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नकार दिला आहे. न्यायालयाने दोन्ही पक्षाची बाजू ऐकून घेत आपला निर्णय राखून ठेवला. वेगवेगळ्या तक्रारीनंतर राज्यपाल रमेश बैस यांनी डॉ. सुभाष चौधरी यांचे कुलगुरू पदावरून निलंबन केले होते. निलंबनाला न्यायालयात आव्हान दिले जाऊ शकते याची कल्पना सरकारला होती. त्यामुळे राज्य सरकारने  आधीच न्यायालयात कॅव्हेट दाखल केले होते.

Nagpur Leopeard Injured : बिबट्याला वाहनाची जोरदार धडक, बिबट्या जखमी

Nagpur News : नागपूर : रस्ता पार करताना बिबट्याला वाहनाची जोरदार धडक, धडकेत बिबट्या जखमी


नागपूर जिल्ह्याच्या सावनेर तालुक्यातील आदासा गणपती मंदिर परिसरात जवळची घटना 


जखमी झालेल्या बिबट्या बराच वेळ रस्त्यावर दुचाकीखाली पडून 


वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी बिबट्याला ताब्यात घेऊन उपचारासाठी दाखल केले

Sangli Burning Car : सांगलीत बर्निंग कारचा थरार, पार्किंगमधील गाडीनं अचानक घेतला पेट, वाहन जळून खाक

Sangli Accident : सांगली- मिरज रोडवर वालचंद कॉलेज समोर बर्निंग कारचा थरार रात्री पाहायला मिळाला. रस्ताच्या कडेला चारचाकी पार्क करत असतानाच वाहनाने रस्त्यात अचानक पेट घेतल्याने वाहन जळून खाक झाल्याने लाखो रुपयांचं नुकसान झाले आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. शरद रामचंद्र नलावडे असं वाहनाच्या मालकाचे नाव आहे. नलावडे आपल्या कुटुंबासमवेत वॉटर पार्क प्रदर्शन पाहण्यासाठी आले असता कॉलेजजवळ आल्यानंतर गाडीतून अचानक धूर बाहेर येत असल्यामुळे शरद नलावडे यांनी गाडीतून आपल्या कुटुंबासह उतरून बाजूला झाले आणि त्यानंतर काही क्षणातच गाडीने पेट घेतला. यानंतर  क्षणार्धात गाडी जळून खाक झाली आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान शर्तीचे प्रयत्न करत गाडीची आग विझवण्याचा प्रयत्न केला. पोलीस घटनास्थळी दाखल झालेले आहेत वाहतूक शाखेचे पोलीस ही घटनास्थळी दाखल झाले. या सर्व घटनांच्या मुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या आणि बघ्याची गर्दी प्रचंड झाली होती.

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये..


 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.