Maharashtra News LIVE Updates 30th March : साडेतीन वर्षीय मुलीवर बलात्कार, बारामतीतील माणुसकीला काळीमा फासणारी घटना

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 30 Mar 2024 02:33 PM
Mumbai News : काँग्रेसला समर्थन देण्यासाठी दलित संघटनांची बैठक

मुंबई : प्रकाश आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडीने घेतलेल्या भूमिकेवर चर्चा करण्यासाठी राज्यभरातील दलित नेते, बुद्धिजीवी आणि विविध दलित संघटनांची बैठक चेंबूरमध्ये पार पडत आहे. या बैठकीला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे उपस्थित राहणार आहेत. तर प्रभारी रमेश चेन्नीथला आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे ॲानलाईन मार्गदर्शन करणार आहेत. बैठकीला सुरुवात झाली असून खासदार चंद्रकांत हांडोरे उपस्थितांना मार्गदर्शन करीत आहेत.

Satara Bagad Yatra : उदयनराजेंच्या बगाड दर्शनावेळी धक्काबुक्की

Satara News : उदयनराजे भोसले यांनी बगाडाचे दर्शन घेतले. बगाड यात्रेत मोठी गर्दी असल्याने यावेळी धक्काबुक्की झाल्याची माहिती समोर येत आहे.

Ratnagiri News : रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात उद्धव ठाकरेंची जाहीर सभा होणार

Lok Sabha Election 2024 : रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात 3 मेला कणकवलीत उद्धव ठाकरे आणि 4 मेला आदित्य ठाकरे यांची जाहीर सभा होणार असून महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांनी दुसऱ्या टप्प्यातील प्रचाराला सुरुवात केली आहे. गावागावात खळा बैठका घेत प्रचाराला सुरवात केली असून दररोज दहा गावात खळा बैठका घेऊन प्रचार केला जाणार असल्याचं विनायक राऊत यांनी सांगितलं आहे. तर 16 एप्रिलला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यानंतर जाहीर सभा या मतदारसंघात घेणार आहेत. 

Tuljapur Rangpanchami : कुलस्वामिनी तुळजाभवानीच्या मंदिरात रंगपंचमीचा उत्साह

तुळजापूर : महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या मंदिरात रंगपंचमीचा उत्सव मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला. तुळजाभवानीची आरती करून देवीला पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून देवीला कोरडे आणि नैसर्गिक रंग लावून रंगांची उधळण करण्यात आली.

Nandurbar News : मंत्री गिरीश महाजन यांचा उपस्थितीत निवडणूक नियोजन बैठकीला सुरुवात.

नंदुरबार : मंत्री गिरीश महाजन यांचा उपस्थितीत नंदुरबार लोकसभा पदाधिकारी निवडणूक नियोजन बैठकीला सुरुवात....


खासदार हिना गावित, मंत्री विजयकुमार गावित,भाजप महामंत्री विजय चौधरी यांची उपस्थिती.....


नंदूरबार शहरात आयिजत नियोजन बैठकीला भाजप आमदार राजेश पाडवी गैरहजर.....


भाजप च्याय अंतर्गत वादाचा फटका लोकसभा निवडणुकीत बसण्याची शक्यता..

Gold Rate : सोन्याचे दर 70 हजार रुपयांच्या पुढे गेल्याने ग्राहकांची सोने खरेदीकडे पाठ

Gold Price Today : जागतिक पातळीवर अमेरिकन फेडरल बँकानी आपल्या व्याज दरात कपात केली. परिणामी गुंतवणूक दारानी आपली गुंतवणूक ही सोन्यामध्ये करण्यास सुरुवात केल्याने सोन्याच्या मागणीत मोठी वाढ होऊन त्याचा परिणाम सोन्याच्या दरात मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या दोन दिवसात सोन्याच्या दरात अठराशे रुपयांची वाढ होऊन 68800 तर जी एस टी सह हेच दर 70650 इतक्या विक्रमी पातळीवर जाऊन पोहोचले असल्याचं पाहायला मिळत आहे.


सोन्याचे वाढलेले दर हे सर्वसामान्य ग्राहकांच्या आवाक्या बाहेरचे आहेत. एकीकडे शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही तर, दुसरीकडे सोन्याचे दराने 70 हजार रुपयांचा टप्पा पार केल्याने शेतकऱ्यांनी दागिना खरेदी करायचा नाही का, असा सवाल काही ग्राहकांनी व्यक्त केला आहे. सोन्याचे दर सर्वसामान्य ग्राहकांना परवडतील असे असायला हवे, सोन्याच्या वाढत्या दरामुळे आमचे बजेट बिघडलं असल्याची प्रतिक्रिया काही ग्राहकांनी दिली आहे.

Amravati News : महाविकास आघाडीचे बळवंत वानखडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल
Balwant Wankhade Nominatio Filed : अमरावती लोकसभा मतदारसंघ निवडणूकीत आज महाविकास आघाडीच्या वतीने काँग्रेस आमदार बळवंत वानखडे यांचा आपली उमेदवारी अर्ज दाखल केली. बळवंत वानखडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करतांना माविआचे सगळेच नेते उपस्थित होते. आज दुपारी एक वाजता अमरावती शहरात बळवंत वानखडे यांच शक्ती प्रदर्शन राहणार आहे. यावेळी नेहरू मैदान याठिकाणी होणाऱ्या सभेत उबाठा गटाच्या नेत्या सुषमा अंधारे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. या निवडणुकीत नवनीत रानाचा पराभव करण्यासाठी महाविकास आघाडी एकवटली.
Ambadas Danve : थोड्याच वेळात अंबादास दानवे लाईव्ह येणार

Maharashtra Politics : अंबादास दानवे ठाकरेंची साथ सोडणार अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली असताना अंबादास दानवे थोड्याच वेळात फेसबुकवर लाईव्ह येऊन प्रतिक्रिया देणार आहेत.



Vasant More Will Meet Manoj Jarange Patil : वसंत मोरे मनोज जरांगे पाटलांची भेट घेणार

पुणे : वसंत मोरे आज अंतरावली सराटीत घेणार मनोज जरांगे पाटील यांची भेट 


काल प्रकाश आंबेडकर यांना भेटून चर्चा केली होती 


आज मनोज जरांगे यांची भेट घेऊन पाठिंबा मागणार


मराठा समाजाच्या बैठकीलाही उपस्थित होते


वसंत मोरे मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी रवाना झाले आहेत

Yavatmal News : निवडणुकीच्या अनुषंगाने मतदान जागृती मानवी साखळीतून विद्यार्थ्यांनी साकारली देशाची प्रतिकृती

Yavatmal News : 26 एप्रिल रोजी होऊ घातलेल्या लोकसभेच्या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी आज जिल्हा प्रशासनाच्या वतीने यवतमाळच्या नेहरू स्टेडियम वरती जनजागृती मोहोम राबविण्यात आली. यावेळी शहरातील 20 शाळेतील विद्यार्थ्यांनी मानवी साखळी करीत देशाच्या नकाशाची प्रतिकृती साकारण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांकडून एक संकल्प पत्रही देण्यात आले असून आपल्या पालकांकडून भरून मतदान करावे, असे आवाहन करण्यात आले. मतदान जागृती गीताचे सादरीकरण करण्यात आले. 

Girish Mahajan : अनेक मोठे नेते हे भाजप आणि मित्र पक्षात दाखल होणार -गिरीश महाजन

Maharashtra Politics : येणाऱ्या काही दिवसात इतर पक्षातील अनेक मोठे हे भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याचं वक्तव्य मंत्री गिरीश महाजन यांनी केले आहे. विरोधी पक्षात कोणी राहायला तयार नाही, त्यांच्या राज्यातील देशातील नेतृत्वात कोणाचा विश्वास राहिला नसल्याने अनेक जण मोदी यांच्या नेतृत्वात काम करण्यास उत्सुक असल्याने लोकसभा निवडणुकीपर्यंत आमच्या आणि आमच्या मित्र पक्षात येतील. आमच्या मित्र पक्षात कोणतीही नाराजी नाही,लवकरच सगळ्या मित्र पक्षांना सोबत घेऊन आम्ही मेळावे घेणार आहोत.

Ganpatipule Tourist : कोकणात पर्यटकांची गर्दी

Ganpatipule Tourist : सध्या सुट्ट्या आहेत आणि त्यामुळे कोकणात पर्यटक हळूहळू दाखल होत आहेत. लाँग वीकेंड आल्याने पर्यटक कोकणात दाखल झाले आहेत.

Yavatmal News : महायुतीच्या उमेदवारीचा तिढा कायम

Yavatmal News : यवतमाळ-वाशिम लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागताच राजकारण तापले आहे.  महायुतीच्या उमेदवारिवरून खलबते आणि चर्चेचे गुऱ्हाळ सुरू आहे. तर महाविकास आघाडी आणि वंचितने उमेदवारी घोषित करून प्रचारालाही लागले आहे. त्यामुळे होणारी लढत ही दोन्ही ठाकरे गट शिवसेना विरुद्ध शिंदे गट शिवसेना की भाजप विरुद्ध ठाकरे गट शिवसेना हे चित्र लवकर स्पस्ट होणार आहे. 

Jejuri Rangpanchami : जेजुरी गडावर रंगपंचमी साजरी

Rangpanchami : महाराष्ट्राचे कुलदैवत व बहुजन समाजाचा लोकदेव असणाऱ्या श्री खंडोबा देवाच्या जेजुरीगड आणि  कडेपठार गडारील मंदिरात धार्मिक वातावरणात आणि उत्साहात रंगपंचमी साजरी करण्यात आली. रंगपंचमीनिमित्त दोन्ही गडावरील श्री खंडोबा मंदिरात पहाटे विविध रंगांचे पंचामृत तयार करून देवाला रंगांचा अभिषेक घालण्यात आला. पूजा व आरती नंतर श्री मार्तंड भैरव, श्री खंडोबा, म्हाळसा आणि बानुबाई यांच्या मूर्ती आणि स्वयंभू शिवलिंगाना विविध रंग लावून रंगपंचमी धार्मिक वातावरणात आणि उत्साहात साजरी करण्यात आली.

Lasalgaon Onion News : लासलगाव बाजार समिती आजपासून ४ एप्रिलपर्यंत बंद

Nashik News : आशिया खंडातील सर्वांत मोठी लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती ' मार्च एंड 'मुळे शनिवारपासून 4 एप्रिलपर्यंत बंद राहणार आहे. पाच दिवस बाजार समिती बंद असल्याचा परिणाम शेतमाल विक्रीवर दिसून येण्याची शक्यता आहे. लासलगाव व्यापारी असोसिएशनने लासलगाव बाजार समिती प्रशासनास दिलेल्या पत्राच्या अनुषंगाने बाजार समिती बंद राहणार असून, यादरम्यान कांदा व भुसार माल बाजार समितीत विक्रीसाठी आणू नये, असे आवाहन बाजार समितीने केले आहे. 5 एप्रिल पासून बाजार समितीतील कांदा लिलाव पूर्ववत होणार आहे.

Satana Banner : कहो दिलसे सुभाष बाबा फिरसे, सटाण्यात लावलेल्या फलकाची जोरदार चर्चा

सटाणा : धुळे लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ.सुभाष भामरे यांच्या भाक्षी येथील एका भाजप पदाधिकाऱ्याने एक मोठा ' डिजिटल ' फलक लावला आहे. 35 ते 40फूट असलेल्या या फलकावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी खासदार भामरे हे चर्चा करताना दिसत असून 'कहो दिलसे सुभाष बाबा फिरसे' असा मजकूर लिहिण्यात आला आहे. मुख्य रस्त्यालगत असलेला हा फलक लक्ष्यवेधी ठरत आहे.  खा.डॉ.सुभाष भामरे हे सटाणा दौऱ्यावर आले असतांना त्यांच्या हस्ते या फलकाचे उद्घाटन करण्यात आले होते.

Ratnagiri News : रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात भाजपकडून प्रचाराचं नियोजन पूर्ण
Lok Sabha Election 2024 : रत्नागिरी - सिंधुदुर्ग या लोकसभा मतदारसंघात आता भाजपचाच उमेदवार असणार असं म्हणत कोकणातील भाजपच्या कार्यकर्त्यांनी प्रचाराला सुरूवात केली आहे. शुक्रवारी रत्नागिरी शहरात झालेल्या बैठकीनंतर आता भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते पंचायतसमिती गटनिहाय प्रचाराला सुरूवात करणार आहेत. रत्नागिरी - सिंधुदुर्ग या लोकसभा मतदारसंघाचा आवाका पाहता त्याची दक्षिण आणि उत्तर अशारितीनं विभागणी करून पदाधिकाऱ्यांवर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मुख्य बाब म्हणजे नारायण राणे हेच उमेदवार असतील अशी चर्चा असताना भाजपकडून मात्र प्रचाराला सुरूवात करण्यात आली आहे. दरम्यान, केंद्रीय मंत्री नारायण राणे हेच आमचे उमेदवार असतील असा दावा भाजपचे कार्यकर्ते खासगीत बोलताना करत आहेत. लवकरच राणे यांच्या नावाची अधिकृत घोषणा होईल अशा प्रतिक्रिया देखील कार्यकर्ते देत आहेत. 
Buldhana News : शिवजयंती मिरवणूक दगडफेक प्रकरणी 8 जणांना अटक

बुलढाणा : शिवजयंतीच्या मिरवणुकी दरम्यान नांदुरा शहरात काही अज्ञात समाजकंटकांनी दगडफेक केली होती. या घटनेत जवळपास 15 ते 18 जण जखमी झाले आहेत ज्यांच्यावर सामान्य रुग्णालय खामगाव येथे उपचार सुरू आहेत. पोलिसांनी आता या प्रकरणात गुन्हा नोंदवून आठ जणांना अटक केली आहे. तर अद्यापही या प्रकरणातील 30 ते 40 आरोपी फरार आहेत शिवजयंती मिरवणुकी दरम्यान अंधाराचा फायदा घेऊन नांदुरा शहरात मोठी दगडफेक झाली होती.

Malegaon Fire : मालेगावात पॉवरलूमला भीषण आग

MalegaonNews : मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान महिन्यानिमित्त सर्वत्र खरेदीचा उत्साह संचारलेला असताना शुक्रवारी फरहान हॉस्पिटल परिसरात अचानक लागलेल्या आगीने रौद्ररूप धारण केल्याने शंभरपेक्षा अधिक पॉवरलूम यंत्रे जळून खाक झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे शेकडो कुटुंबीयांना मोठा फटका बसला. या आगीत कापडाचे सूत, कापड, यंत्रसाम्रगी जळून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. अचानक लागलेल्या आगीत कापडासह यंत्र जळून खाक झाले. नेमकी आग कशामुळे लागली, याबाबत कारण समजू शकलेले नाही.

Yeola News : येवल्यात आज रंगणार रंगाचे सतरंगी सामने

येवला : नाशिकच्या येवला शहरात सुमारे दीडशे ते दोनशे वर्षांपासून रंगपंचमीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. आज शहरातील टिळक मैदान आणि डी.जे.रोड येथे रंगाचे सतरंगी सामना खेळले जाणार आहेत. नागरिक आणि रंगप्रेमी या सतरंगी सामन्यांसाठी आतुर झाले आहे..सकाळपासून मोठ्या उत्साहात येवलेकर अबाल वृद्धांसह हा रंग उत्सव दिवसभर साजरा करत असतात. पतंगोत्सवाप्रमाणे येवल्यात रंगपंचमी देखील मोठ्या उत्साहात साजरी केली जाते.

Maharashtra Politics : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची पहिली यादी आज जाहीर होणार

NCP Sharad Pawar Candidate List : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची पहिली यादी आज जाहीर होणार आहे. याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.

MIM in Lok Sabha: लोकसभा निवडणुकीत एमआयएम इतर पक्षातील चांगल्या उमेदवारांना पाठिंबा देणार

Imtiyaz Jaleel : आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी. एम आय एम महाराष्ट्रात इतर पक्षातील चांगल्या उमेदवाराला पाठिंबा देणार आहे. बीजेपीला पाठिंबा देणार का या प्रश्नाला उत्तर देताना कोणत्याही पक्षाच्या चांगल्या उमेदवाराला पाठिंबा देणार असे इम्तियाज जलील म्हणाले आहेत. शिवाय झालं गेलं ते विसरून प्रकाश आंबेडकरांनी किंगमेकर होण्यासाठी एमआयएमसोबत युती करण्याचं आवाहन जलील यांनी केलं आहे.  प्रकाश आंबेडकरांसाठी आमची दारं खिडक्या सगळं उघड आहे, असंही जलील म्हणाले आहेत. 

BHANDARA CRIME NEWS : तरुणाचा अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला, भंडाऱ्याच्या गराडा शेतशिवारातील घटना

BHANDARA CRIME NEWS : अंगाचा थरकाप उडविणारी घटना मध्यरात्री भंडारा जिल्ह्यात उघडकीस आली. भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातील गराडा शेतशिवारात एका तरुणाचा अर्धवट जळलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला. श्रीकांत हटवार (26) असं मृतकाचं नाव असून तो सावरी मुरमाडी इथला रहिवासी आहे. या तरुणाची अगोदर हत्या केली, त्यानंतर मृतदेह जाळून टाकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आरोपीनं केला. मात्र, काही नागरिकांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत घटनेची माहिती लाखनी पोलिसांना दिली. या निर्घृण हत्येचं कारण अद्याप स्पष्ट झालं नसून पोलीस आरोपींचा शोध घेत आहे. मृतक श्रीकांत हा ॲट्रॉसिटीच्या एका प्रकरणात आरोपी असल्याची माहिती मिळत आहे.

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...


 


 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.