Maharashtra News LIVE Updates : देश विदेशातील महत्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
अमर काळे यांनी राष्टवादी काँग्रेस शरद पवार गटात पक्ष प्रवेश केला आहे. शरद पवार, जयंत पाटील, अनिल देशमुख यांच्या उपस्थितीत सिल्व्हर ओकवर हा पक्षप्रवेश झाला. त्यामुळे वर्ध्यातून महाविकास आघाडीकडून अमर काळे यांची लोकसभेसाठी उमेदवारी जवळपास निश्चित झाली आहे.
प्रीतम मुंडे यांच्या विरोधात राष्ट्रवादीकडून निवडणूक लढलेले बजरंग सोनवणे हे सध्या तरी विरोधक आहेत मात्र आणखी काही सांगता येत नाही 18 तारीख आणखी लांब आहे असं म्हणत पंकजा मुंडे यांनी दरवेळी भाजपच्या विरोधात निवडणूक लढणारा पुन्हा भाजपमध्ये येतो या प्रश्नाला उत्तर देताना काहीही होऊ शकतं, असा सूचक इशारा दिला आहे.
परभणीच्या बदल्यात राष्ट्रवादीला धाराशिवची जागा मिळणार, अशी शक्यता वर्तवली जात आहे. धाराशिव लोकसभा जागेसाठी अजित पवारांच्या घरी झालेल्या बैठकीत तीनही पक्ष आग्रही होते. मात्र ही जागा राष्ट्रवादीला देण्याबाबत जवळपास निश्चिती झाल्याचे समजते. तीन पक्षाच्या नेत्यांच्या बैठकीनंतर मतदारसंघात येणाऱ्या सर्व आमदारांची आज अजित पवार यांच्या बंगल्यावर बैठक झाली. म्हाडाची जागा राष्ट्रवादीला दिल्यास राष्ट्रवादी धाराशिव सोडू शकते. राहुल मोठे, विक्रम काळे, सतीश चव्हाण आणि सुरेश बिराजदार यांच्या नावाची धाराशिव राष्ट्रवादीसाठी चर्चा आहे.
रत्नागिरी सिंधदुर्ग लोकसभेसाठी इच्छुक असणारे किरण सामंत मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत. हेमंत गोडसे यांच्याशी चर्चा झाल्यानंतर खासदार श्रीकांत शिंदे यांची किरण सामंत यांच्या सोबत चर्चा केली आहे. रत्नागिरी सिंधदुर्ग जागेसाठी शिवसेना आणि भाजप आग्रही आहेत. मात्र किरण सामंत आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट झाली नाही.
- नाशिकच्या जागेवरून भाजप पुन्हा आक्रमक
- भाजप पदाधिकाऱ्यांचा राजीनामा देण्याचा इशारा
- नाशिक लोकसभा मतदारसंघातील काही मंडळ अध्यक्षांनी दिला राजीनाम्याचा इशारा
- नाशिकची जागा भाजपाला नाही दिली तर राजीनामा देणार, असे पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
मविआतील कुणीही खोट बोलत नाही. वंचितला मविआने चार जागांचा प्रस्ताव दिला होता. वंचित सोबत आघाडीसाठी दिल्लीतील नेत्यांनीही प्रयत्न केले. वंचितला आम्ही सन्मानानेच वागवले. सिल्व्हर ओकवर कधीच जागावाटपाची चर्चा झाली नाही, असे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.
मविआतील कुणीही खोट बोलत नाही. वंचितला मविआने चार जागांचा प्रस्ताव दिला होता. वंचित सोबत आघाडीसाठी दिल्लीतील नेत्यांनीही प्रयत्न केले. वंचितला आम्ही सन्मानानेच वागवले. सिल्व्हर ओकवर कधीच जागावाटपाची चर्चा झाली नाही, असे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.
शरद पवारांच्या उपस्थितीत साताऱ्यात इंडिया आघाडीची बैठक झाली. या इंडिया आघाडीच्या बैठकीत पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव उमेदवारीसाठी पुढे आले आहे.
शरद पवारांच्या उपस्थितीत साताऱ्यात इंडिया आघाडीची बैठक झाली. या इंडिया आघाडीच्या बैठकीत पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव उमेदवारीसाठी पुढे आले आहे.
हातकणंगले नंतर कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातही भाजप कार्यकर्त्यांची नाराजी
गेल्या वेळी आम्ही मदत केली मात्र पाच वर्षात आमचे फोन देखील उचललेले नाहीत
भाजप चे प्रदेश सचिव महेश जाधव यांनी संजय मंडलिक यांच्यावर जाहीरपणे व्यक्त केली नाराजी
मुश्रीफ आणि मंडलिक आता तुम्ही जुने मित्र विसरा असा ही दिला गर्भित इशारा
आम्ही ताकतीने मदत करू मात्र यापुढे असं चालणार नाही
सोयीस्करपणे राजकारण करू नका संजय मंडलिक यांना महेश जाधव यांनी सर्वासमक्ष सुनावले
महेश जाधव उघड नाराजी नंतर संजय मंडलिक यांनी व्यक्त केली दिलगिरी
उमेदवार देखीसातारा लोकसभेसाठी आमदार बाळासाहेब पाटील, आमदार शशिकांत शिंदे, जिल्हाध्यक्ष सुनील माने आणि सत्यजित पाटणकर याची नावे बैठकीतून समोर आलेली आहेत असे शरद पवार म्हणाले. माझा विचार होता माढ्याची जागा धनगर समाजाला द्यावी. पण मतदार पळवतात हे माहिती होते, पण या निवडणुकीत उमेदवार पळवतात हे दिसत असल्याचे पवार म्हणाले. जेलमध्ये जाण्या पेक्षा भाजप मध्ये गेलेले बर अशी मिश्किल टिपण्णी राजकारणावर पवारांनी केली. महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती आहे. अशी स्थिती असताना शासनाची संपूर्ण ताकद लावली पाहिजे या बाबत संघर्षाची भूमिका घ्यावी लागणार आहे. केजरीवाल यांना अटक केली ती कशासाठी? असा सवालही पवारांनी केला. .
महाविकास आघाडीतील वादग्रस्त जागांवरती मैत्रीपूर्ण लढत करण्याचा काॅग्रेस नेत्यांचा सुर
काँग्रेस नेत्यांची आजच्या पार पडलेल्या ऑनलाईन बैठकीत भुमिका
सांगली, भिवंडी, दक्षिण मध्य मुंबई आणि इतर दोन जागांवरती राष्ट्रवादी आणि शिवसेना ऐकत नसेल तर मैत्रीपूर्ण लढत करण्याची काॅगेरस नेत्यांची भुमिका
राज्यातील महत्त्वाच्या काँग्रेस नेत्यांची आणि प्रभारी रमेश चन्नीथला यांच्या उपस्थितीत बैठकीत सुर
मैत्रीपूर्ण लढत करण्यासाठी दिल्लीतील हाय कमांडला या संदर्भात कळवल जाणार
यावरती ३१ मार्चला इंडीया आघाडीच्या बैठकीत निर्णय होणार
महाविकास आघाडीसोबतची चर्चा अद्यापही बंद झाली नसल्याची माहिती वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी दिली. इतर संघटनांसोबत देखील आम्ही चर्चा करत आहोत. दोन तारखेला इतर संघटना कोणत्या आहेत ते कळेल असे ते म्हणाले. त्यामुळं आता प्रकाश आंबेडकर यांनी सस्पेन्स वाढवला आहे. संजय राऊत आणि महाविकास आघाडी वेगळे आहेत. संजय राऊत महाविकास आघाडीत बिघाडी करत आहेत. आमच्याकडे तीनच जागांचा प्रस्ताव होता. आम्ही कोणतेही दरवाजे बंद केले नाहीत.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या संभाव्य उमेदवार सुनेत्रा पवार यांनी आज रेवदंडा येथे आप्पासाहेब धर्माधिकारी यांची भेट घेतली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे देखील उपस्थित होते.
सातारा लोकसभा मतदारसंघात मोठा ट्विस्ट आला आहे. विद्यमान खासदार आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते श्रीनिवास पाटील यांनी लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. प्रकृतीच्या कारणामुळे त्यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे.
विधानसभा मतदारसंघनिहाय कार्यकर्त्यांच्या बैठकीत श्रीनिवास पाटील यांनी उमेदवारीच नाकारली. तब्बेतीचे कारण सांगून रिंगणातून माघार घेतली.
केंद्रीय मंत्री रामदास आठवले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घेणार भेट
दुपारी सागर या निवासस्थानी भेट घेण्यासाठी येणार आहेत
आरपीआयने भाजपकडे दोन जागांची मागणी केली होती
मात्र एकही जागा मिळत नसल्याने आरपीआय नाराज आहे
देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीने नाराजी दूर होण्याची शक्यता
आमदार निलेश लंके आज दुपारी 2 वाजता कार्यकर्त्यांची बैठक घेणार आहेत.
आ. निलेश लंके आज आमदारकीचा राजीनामा देण्याचो शक्यता...
मतदारसंघातील जनतेचा कौल जाणून घेऊन निर्णय घेणार...
जो काही निर्णय होईल तो महत्वपूर्णच असेल,आ. निलेश लंके यांचे वक्तव्य...
माझा मतदारसंघ माझं कुटुंब आहे त्यामुळे कुटुंबातील सदस्यांशी बोलून निर्णय घेणार...
शिरुरमधील मधील इच्छुक उमेदवार मंगलदास बांदल सागर बंगल्यावर दाखल
मंगलदास बांदल हे आढळराव पाटील यांचे कट्टर विरोधक
गेल्या निवडणूक बांदल यांनी ऐन निवडणुकीत घेतली होती माघार
मात्र आढळराव पाटलांविरोधात राष्ट्रवादीच्या अमोल कोल्हे यांना केली होती मदत
या निवडणुकीत अपक्ष लढण्याची बांदल यांनी जाहीर केली भूमिका
त्यामुळे सागर बंगल्यावर हा तिढा सुटणार का? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष
प्रत्येक वादळ शमवीण्याची ताकद सागर बंगल्यावर असून, बच्चू कडू यांचं देखील वादळ शमेल असे वक्तव्य भाजप आमदार नितेश राणे यांनी केलं आहे.
महाविकास आघाडीचे महत्त्वाची संयुक्त पत्रकार परिषद ३ एप्रिलला होणार
मुंबई शिवालय येथे होणार पत्रकार परिषद
या परिषदेला उद्धव ठाकरे, शरद पवार, संजय राऊत, बाळासाहेब थोरात, जयंत पाटील , नाना पटोले आणि महत्वाचे नेते उपस्थितीत राहणार आहेत
शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी काल लोकसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. आज त्यांनी बुलढाणा विधानसभा मतदार संघातील आपल्या कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा आयोजित केला आहे , सकाळी साडे अकरा वाजता हा मेळावा बुलढाणा येथे सुरू होणार असून या मेळाव्यात आ.संजय गायकवाड काय भूमिका मांडतात हे बघणे महत्वाचं असेल. शिवाय या मेळाव्यात शिवसेना शिंदे गटाचे व महायुतीचे कोण कोणते नेते उपस्थिती लावणार हेही तितकंच महत्त्वाचं असेल...
दिवंगत विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाचा निर्णय आज किंवा उद्या होण्याची शक्यता
ज्योती मेटे यांचा शिवसंग्राम मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याला होकार
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश झाल्यास आपणाला उमेदवारी मिळावी अशी ज्योती मेटे यांची भावना
अद्याप बीड लोकसभेचा उमेदवार कोण असणार याबाबत निश्चिती नाही
बीड लोकसभा मतदारसंघातून लढण्यासाठी ज्योती मेटे आणि बजरंग बाप्पा सोनवणे इच्छुक
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवेशाबाबत अद्याप आमची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या सोबत चर्चा सुरूच असल्याची ज्योती मेटे यांची एबीपी माझाला माहिती
अजित पवारांनी शिरूर लोकसभेसाठी शिवाजी आढळरावांची वर्णी लावली, तेंव्हापासून भोसरीचे माजी आमदार विलास लांडे जणू गायबच झालेत. ते पुन्हा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश तर करणार नाहीत ना? अशी चर्चा शिरूर लोकसभेत रंगलेली आहे. 2019 प्रमाणे यंदा ही लांडेंना डावलण्यात आल्यानं ते कमालीचे नाराज आहेत. पुढची भूमिका ही त्यांनी गुलदस्त्यात ठेवली आहे. एरवी लांडेंनी माध्यमांसमोर येऊन आपली आहे ती अगदी टोकाची ही भूमिका जाहीरपणे मांडलेली आहे. पण गेल्या आठवड्यात शिरूर लोकसभेत झालेल्या बैठकीवेळी आढळरावांना उमेदवारी देणार असून तुम्हाला त्यांचा प्रचार करावा लागेल. असा आदेश अजित पवारांनी दिला तेंव्हापासून मात्र लांडे माध्यमांना टाळतायेत. जणू ते गायबच झालेत, अशी काहीशी परिस्थिती निर्माण झालीये. यामुळं विलास लांडे आता यावेळी शिवाजी आढळरावांचा प्रचार करणार की? अमोल कोल्हेच्या प्रचाराची जबाबदारी स्वीकारा, या शरद पवारांच्या आवाहनाला प्रतिसाद देणार? याकडे शिरूर लोकसभेतील प्रत्येकाचं लक्ष लागून आहे.
पुण्यात होळीला नागरिकांवर फुगे टाकणाऱ्या तरुणांच्या पालकांवर गुन्हा
पुण्यातील एफ सी रोड वर हुल्लडबाजी करत नागरिकांवर टाकत होते फुगे
पोलिसांनी हुल्लडबाजी केल्याप्रकरणी काढायला लावल्या उठाबष्या
प्रतिक मोरे, करण डावरे या तरुणांना ताब्यात घेतले असून त्यांच्या पालकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, होळीच्या दिवशी काही तरुण संध्याकाळी पुण्यातील एफ सी रोड वरून हुल्लडबाजी करत होते. गाडीवर जाताना ते रोड वरून जात असलेल्या आणि उभे असलेल्या नागरिकांवर रंगाचे फुगे फेकत होते. या प्रकरणी पोलिसांनी परिसरातील सी सी टिव्ही फुटेज तपासून तसेच गाडीचा क्रमांक ट्रेस करून या तरुणांचा शोध लावला आणि त्यांना ताब्यात घेतले.
हे तरुण अल्पवयीन असल्यामुळे मोटर वाहन कायदा प्रमाणे त्यांच्या पालकांवर डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे
यवतमाळच्या महागाव तालुक्यातील भोसा परिसरात वाळू घाटावर अंदाधुंद गोळीबार, रेती तस्करांकडून फायरिंग, मध्यरात्रीची घटना
यवतमाळ पोलीस अॅक्शन मोडवर
पैनगंगा नदीपात्रा रस्त्याच्या कारणांवरून एका गटाची दुसऱ्या गटावर फायरिंग
फायरिंगच्या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, वाळू घाटावरील रस्त्याच्या कारणावरून झाली फायरिंग
कृष्णा ढालेंच्या फिर्यादी वरून महागांव पोलिसात 25 जणांविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल
चार आरोपींना अटक, चार रिकामे काडतूस आणि दोन जिवंत काढतूस घटनास्थळावरून जप्त
घटनेत जीवितहानी नाही, मात्र वचपा काढण्यासाठी रेती तस्करांनी गोळीबार केल्याची माहीती
घटनेची माहिती मिळताच ऍडिशनल एसपी, दारव्हा आणि उमरखेड उपविभागीय पोलीस अधिकारी सह आर्णी-महागांव पोलीस अधिकारी तळ टोकून
सहा तासापासून पोलीस घटनास्थळी, स्विफ्ट डिझायर, टिप्पर ची तोडफोड, फायरिंग नंतर अनेक जण फरार
आचारसंहितेत रिव्हॉल्व्हर आल्या कुठून? या घटनेनंतर महसूल विभागाकडून ती वादग्रस्त रेती घाटात सील करणार का या कडे लक्ष
माजी राज्यमंत्री मिनाक्षीताई पाटील यांचं निधन
राहत्या घरी झाल निधन
मिनाक्षीताई पाटील या शेकापचे आमदार जयंत पाटील यांच्या बहिण
वसंत मोरे घेणार वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची भेट
आज दुपारी राजगृहावर वसंत मोरे हे प्रकाश आंबेडकर यांची भेट घेणार आहेत
वसंत मोरे हे पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवण्यात इच्छुक आहेत
वसंत मोरे यांनी आधी महाविकास आघाडीचे नेत्यांच्या भेटी घेतल्या होत्या
मात्र महाविकास आघाडीमध्ये पुणे लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी काँग्रेसचे नेते रवींद्र धंगेकर यांना देण्यात आली आहे
त्यामुळे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या सोबत वसंत मोरे उमेदवारी संदर्भात चर्चा करू शकतात
वंचित बहुजन आघाडीने आतापर्यंत आठ उमेदवार हे जाहीर केले आहेत
Buldhana Loksabha Election : मला निवडणूक लढवावसं वाटलं म्हणून मी अर्ज दाखल केला असल्याचे मत शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी व्यक्त केलं. मी बुलढाणा लोकसभेची निवडणूक लढवणार आहे. तूर्तास मी माझी उमेदवारी मागे घेणार नाही. उमेदवारी जरी प्रतापराव जाधव यांना मिळाली असली तर तेच पक्षाचे उमेदवार असतील. चार तारखेनंतर कळेल काय होत ते. मी माझ्या उमेदवारी वर ठाम असल्याचेगायकवाड म्हणाले. मी बंड केलेलं नाही असेही ते म्हणाले.
पार्श्वभूमी
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -