Maharashtra News LIVE Updates : नांदेड मुखेडात परिक्षा केंद्रांना नक्कल पुरविणाऱ्या झेरॉक्स सेंटर चालकावर गुन्हा दाखल
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये
Solapur : सोलापूर लोकसभा मतदारसंघावर राष्ट्रवादी शरद पवार गटाचा पुन्हा दावा"
"आघाडीचा धर्म आम्ही पाळणार मात्र सोलापूर लोकसभा लढवण्याची आमची देखील तयारी"
"शरद पवार जो निर्णय देतील ते मान्य करून आम्ही काम करणार, सोलापुरातील राष्ट्रवादी शरद पवार गटाची भूमिका"
एकीकडे सोलापूर लोकसभा मतदारसंघात आमदार प्रणिती शिंदेच्या उमेदवारीची चर्चा सुरु असताना शरद पवार गटाने पुन्हा एकदा आपला दावा सांगितला
शरद पवार गटाचे शहराध्यक्ष सुधीर खरटमल आणि प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद गायकवाड यांनी मागितली लोकसभेची उमेदवारी
दरम्यान 6 मार्च रोजी शरद पवार गटाची नवीन चिन्हाच्या प्रचारासाठी पदयात्रा, आमदार रोहित पवार देखील राहणार उपस्थित
सोलापुरातील कोतंम चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौकपर्यंत होणार पदयात्रा
Pune - राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आज शिरूर तालुक्याच्या दौऱ्यावर
- स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज बलिदान भूमी वढू तुळापूर येथे स्मारक विकास आराखड्याचे करणार भूमिपूजन
Buldhana - पोलिसांनी फिर्यादीलाच पोलिस स्टेशन मध्ये केली अमानुष मारहाण.
- मारहाण करतानाचा आरोपीने बनविला व्हिडिओ.
- मारहाणीचे व्हिडिओ आरोपीनेच केले समाज माध्यमात व्हायरल.
- बुलढाणा पोलिसांची अजब कारवाई.
Nashik : भारत जोडो यात्रेवर निघालेल्या काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना राजीव गांधींप्रमाणेच बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा फोन नाशिक पोलीस आयुक्तालयात आठ दिवसांपूर्वी आला होता. त्या पार्श्वभूमीवर पोलसानी चौकशीकरत धमकी देणाऱ्याला ताब्यात घेतले असता तो माथेफिरू असल्याचे निदर्शनास आले. याबाबतची माहिती नाशिक पोलसानी केंद्रीय तपास यंत्रणांना दिली असून संबंधित व्यक्तीवर पोलसांची नजर कायम आहे.
Pune Breaking : पिंपरी- चिंचवडमध्ये आढळलेल्या मेफेड्रोन ड्रग्स प्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल
शेळके अस अटक करण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षकाच आडनाव आहे.
शुक्रवारी पहाटेच्या सुमारास रक्षक चौकात दोन कोटींच मेफेड्रोन ड्रग्स आढळलं होत.
या प्रकरणी सांगवी पोलिसांनी नमामी झा याला अटक केली होती.
या तपासात या ड्रग्स प्रकरणात पोलीस उपनिरीक्षक विकास शेळकेचं नाव समोर आलंय.
अशा गंभीर गुन्ह्यात पोलीस अधिकाऱ्याचे नाव आल्याने पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयात एकच खळबळ उडालीय.
पोलिसांकडून या अटकेची गुप्तता पाळण्यात येत आहे.
Bhandara : महावितरणच्या वतीनं जुनं वीज मीटर काढून, त्याऐवजी नवीन प्री प्रेड मीटर लावण्यात येणार आहेत. याबाबत वीज बिलांचा जुना थकीत भरणा बाकी असल्यास तिला मुदत नं देता सर्व थकीत बिल एकाचवेळी भरण्याची सक्ती करण्यात आली आहे. त्यामुळं जोपर्यंत जुनं बिल भरण्याबाबत वीज ग्राहकांना सवलत मिळणार नाही, किंवा प्रीपेड मीटर लावण्याबाबत सक्ती करू नये, या मागणीला घेवून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं भंडारा-पवनी विधानसभा अध्यक्ष अजय मेश्राम यांनी उपोषण सुरू केलं आहे. आज उपोषणाचा तिसरा दिवस असून जोपर्यंत यावर शासन निर्णय घेत नाही, तोपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचा इशारा अजय मेश्राम यांनी दिला आहे.
Navneet Rana : दुसऱ्या खासदारकीच्या टर्म साठी मी मैदानात - खासदार नवनीत राणा यांच वक्तव्य...
नेते माझी मंचावर बसून खिल्ली उडवत होते पण ते लोकं हसत गेले मी शिकत गेली..
मी पाच वर्ष खासदारकीचे पूर्ण केले आणि दुसऱ्या खासदारकीच्या टर्मसाठी मैदानात उतरले आहे - नवनीत राणा..
अमरावतीत एका कार्यक्रमात नवनीत राणा यांच वक्तव्य..
Mumbai Fire : मुंबईच्या साकीनाका जरीमरी बस स्टॉप जवळ मोठी आग लागली आहे...
सकाळी नऊ वाजून चाळीस मिनिटांनी ही आग लागली आहे..
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचा पाच ते सहा गाड्या घटनास्थळी दाखल होऊन आग विजयाचे प्रयत्न युद्ध पातळीवर करत आहे..
सुदैवाने या आगीमध्ये जीवित हानी झाली नसून मात्र दोन मोठे गाळे जळून खाक झाले आहेत..
Abhishek Ghosalkar : अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणातील आरोपी अमरेंद्र मिश्राची जामिनासाठी मुंबई सत्र न्यायालयात धाव
अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी तेजस्विनी घोसाळकर यांचा जामिनास विरोध
थोड्याच वेळात सुनावणीला सुरुवात होणार
Badlapur : बदलापूर इथे उभ्या असलेल्या एका गाडीच्या डब्याने घेतला पेट
रात्री दीड वाजता लूप लाईन वर उभ्या असलेल्या गाडीला अचानक आग लागली
रेल्वेने तत्काळ सर्व अग्निशमन यंत्रणेला बोलावून आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला
अडीच वाजता ही आग नियंत्रणात आली,
ही गाडी रिकामी असल्याने कोणालाही दुखापत झाली नाही, मात्र डबा पूर्ण जळून खाक झाला,
मात्र शेवटची कर्जत लोकल या घटनेमुळे रखडली, रात्री 3 वाजेपर्यंत ही लोकल अंबरनाथ स्थानकात होती, त्यात प्रवासी देखील होते
लोकल थांबवून ठेवल्याने प्रवाशांचे हाल झाले
Atul Save : मंत्र्यांच्या हाणामारीची घटना ताजी असताना आणखी एका मंत्र्याने मारहाण केल्याची तक्रार मरीनड्राइव्ह पोलिस ठाण्यात दाखल केली आहे
मंत्री अतुल सावेंनी भाजपच्याच पदाधिकार्याला मारहाण केल्याचा आरोप केला असून मंत्री अतुल सावें विरोधात मरीनड्राइव्ह पोलिस ठाण्यात तक्रार केली आहे
तक्रारदार आसाराम डोंगर हे मंत्री अतुल सावेंना भेटायला गेले असताना. डोंगर हे देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळेंच्या संपर्कात राहतात यावरून मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे
नुसते मंत्र्यांनीच नाही तर त्यांच्या दोन स्वीय सहाय्यक यांनीही मारहाण केल्याचा आरोप आसाराम डोंगरे यांनी केला आहे
सावे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागणी आसाराम डोंगरे यांनी केली आहे
निवडणुकीत बारसू रिफायनरी विरोधी अजेंडा जाहीरनाम्यात घ्या,
अन्यथा बारसू रिफायनरी विरोधी संघटना आपला उमेदवार लोकसभेच्या रिंगणात उतरवणार
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारसू रिफायनरी विरोधी संघटनेचा महाविकास आघाडीला इशारा!
Nashik - गेल्या 7 डिसेंबरपासून केंद्र सरकारने देशांतर्गत कांदा उपलब्धता व दर नियंत्रणात ठेवण्यासाठी निर्यातबंदी केल्याने शेतकरी अडचणीत आहेत.या पार्श्वभूमीवर कांद्याची निर्यात पुन्हा खुली होण्यासाठी शेतकऱ्यांची मागणी जोर धरत असतांना नॅशनल को-ऑपरेटिव्ह एक्स्पोर्ट्स लिमिटेडमार्फत (NCEL) ५० हजार टन कांद्याची निर्यात बांग्लादेशात होणार आहे..केंद्र सरकारच्या वाणिज्य व उद्योग मंत्रालयाच्या वाणिज्य विभागाच्या विदेश व्यापार महासंचालनालयाचे महासंचालक संतोष कुमार सारंगी यांनी शुक्रवारी तशी अधिसूचना काढली आहे.
Sidhudurg : सरकार कुठंही आंगणेवाडीच्या विकासासाठी कमी पडणार नाही - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
भक्त निवासाची सोय करण्यासाठी आगणे कुटुंबीयांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी केली
आई भराडी देवीने माझ्यासारख्या भक्ताला दर्शनासाठी खेचून आणलं
गेल्या दीड वर्षात अनेक विकासकामं आपल्या सरकाने केलं
कोकणासाठी सिंचन प्रकल्प वाढवणार.l, बारामाही शेतकऱ्याना पाणी देण्यासाठी प्रयत्न करणार
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर लवकरच पूर्ण होईल
मुंबई सिंधुदुर्ग ग्रीन रोड लवकरच कामाला सुरावात करणार
आपल्या भराडी देवीच्या आईच्या कृपेने आलेलं हे सरकार आहे
कष्टकरी शेतकरी, सर्वसामान्य लोकांची सेवा करण्याची सेवा करण्याचं साकडं
SSC Exam : जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यात कॉपीमुक्त परीक्षा घेण्याचे आवाहन केल्यानंतर परीक्षा केंद्रावर कॉपीमुक्त परीक्षा दिसून येत असतानाच भरारी पथकातील तहसीलदार व गटशिक्षणाधिकारी यांच्या पथकाने शहरातील बाऱ्हाळीनाका येथील स्वामी झेरॉक्स सेंटरवर 29 फेब्रुवारी रोजी छापा टाकला असता या कारवाईत परीक्षा केंद्रावर नक्कल पुरवण्यासाठी 64 झेरॉक्स कॉप्या आढळून आल्या , त्यामुळे झेरॉक्स सेंटर चालक अनिल अरुण स्वामी यांच्यावर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
SSC Exam : जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यात कॉपीमुक्त परीक्षा घेण्याचे आवाहन केल्यानंतर परीक्षा केंद्रावर कॉपीमुक्त परीक्षा दिसून येत असतानाच भरारी पथकातील तहसीलदार व गटशिक्षणाधिकारी यांच्या पथकाने शहरातील बाऱ्हाळीनाका येथील स्वामी झेरॉक्स सेंटरवर 29 फेब्रुवारी रोजी छापा टाकला असता या कारवाईत परीक्षा केंद्रावर नक्कल पुरवण्यासाठी 64 झेरॉक्स कॉप्या आढळून आल्या , त्यामुळे झेरॉक्स सेंटर चालक अनिल अरुण स्वामी यांच्यावर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
Ratnagiri : रत्नागिरी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती जागा वाटपाच्या दाव्यावरून शिवसेनेचे माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी भाजपाला खडे बोल सुनावले आहेत. कोकणात रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड लोकसभा निवडणुकीच्या जागेवरून सध्या शिवसेना भाजपमध्ये दावे प्रतितावे सुरू आहेत या दोन्ही जागांवरती भाजपाने दावा केला आहे अशातच आता महायुतीतील शिवसेनेचे नेते माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी भाजपला खडे बोल सुनावले आहेत.
Ratnagiri : रत्नागिरी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती जागा वाटपाच्या दाव्यावरून शिवसेनेचे माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी भाजपाला खडे बोल सुनावले आहेत. कोकणात रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड लोकसभा निवडणुकीच्या जागेवरून सध्या शिवसेना भाजपमध्ये दावे प्रतितावे सुरू आहेत या दोन्ही जागांवरती भाजपाने दावा केला आहे अशातच आता महायुतीतील शिवसेनेचे नेते माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी भाजपला खडे बोल सुनावले आहेत.
Sindhudurg : सिंधुदुर्गात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, दीपक केसरकर, उदय सामंत काही वेळात आंगणेवाडीत दाखल होणार आहेत
Nashik : नाशिक - चांदवड महामार्गावरील सोग्रस फाट्यावर बांधलेले धार्मिक स्थळ अखेर प्रशासनाने हटविले आहे. सोग्रस फाट्यावरील दुभाजकाजवळ NHAI च्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष खर्च करून येथे धार्मिक स्थळ ( मजार ) बांधलेले होते..याबाबत आमदार नितेश राणे यांनी अधिवेशनात हा विषय उचलला होता..त्यामुळे काल ग्रामस्थ व प्रशासनात बैठक होवून हे धार्मिक स्थळ स्थलांतरित करण्याबाबत निर्णय घेण्यात आला होता..काल रात्रीच
हे धार्मिक स्थळ ( मजार ) पोलीस, महसूल प्रशासन व स्थानिक ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत काढून टाकण्यात आली..
Nashik : नाशिक चांदवड नॅशनल हायवेवरील बेकायदेशीर मजारीवर तोडक कारवाई
भाजप आमदार नितेश राणे याच मजारीविषयी अधिवेशनात झाले होते आक्रमक
नॅशनल हायवेच्या मध्ये अनधिकृत मजार कशी काय बांधली जाते
नितेश राणॆंनी विचारला होता सवाल
या संदर्भात केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांची घेणार होते भेट
त्यानंतर आता मध्यरात्री अनधिकृत मजारीवर प्रशासनाची कारवाई
Ajit Pawar : अजित पवारांसह सर्वपक्षीय नेत्यांना दिलासा?
महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी मुंबई पोलिसांचा सी-समरी रिपोर्ट कोर्टात सादर
मुंबई सत्र न्यायालयातील विशेष कोर्ट 15 मार्च रोजी देणार निर्देश
नव्यानं तपास करूनही कोणतेही पुरावे हाती लागले नसल्याची ईओडब्ल्यूची कोर्टात माहिती
Manoj Jarange : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना रात्री अंतरवलीतच उपचार देण्यात आले. संभाजीनगरच्या डॉक्टरांनी अंतरवलीला जाऊन केली तपासणी. रात्री दहा आणि दीड वाजता इसीजी काढण्यात आला. त्यात कुठलाही धोका नसल्याचे लक्षात आल्यानंतर तिथेच त्यांच्यावर उपचार करण्यात आले. ऍसिडिटी वाढल्यामुळे छातीत कळ आली असल्याचं डॉक्टरांचे म्हणणे आहे.
Pune Megablock : पुणे लोणावळा रेल्वे मार्गावर उद्या मेगाब्लॉक
पुणे लोणावळा लोकल उद्या राहणार बंद
पुणे लोणावळा दरम्यान तांत्रिक कामासाठी उद्या घेण्यात येणार मेगाब्लॉक
पुण्याहून लोणावळ्याला जाणाऱ्या आणि लोणावळ्यातून पुण्याला येणाऱ्या सर्व लोकल उद्या रविवारी दिवसभर राहणार बंद
उद्या एकूण 7 लोकल रेल्वे गाड्या रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आल्याबद्दल
रविवार असल्याने प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता
Pune : वाहन तोडफोड होणाऱ्या भागांचे "मॅपिंग" करा, पुणे पोलिस आयुक्तांचे आदेश
शहरात वाहनांच्या तोडफोडीच्या घटना बंद झाल्या पाहिजेत, अशा आरोपींची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश
पुणे शहरात वाहन तोडफोडीच्या घटनांमध्ये वाढ
येरवडा, मुंढवा यासह काही भागात मागील काही दिवसात वाहन तोडफोडीच्या घटना वाढल्या
ड्रग्ज तस्करांची माहिती काढून कारवाई करा, पुणे पोलीस आयुक्तांचे पोलिसांना आदेश
शहरातील ड्रग्ज तस्करांची माहिती काढून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सर्व पोलिस ठाण्यांच्या वरिष्ठ निरीक्षकांना दिले
Buldhana : बुलढाणा जिल्ह्यात रात्रभर अवकाळी पावसाची रिपरिप.
सकाळपासून अनेक तालुक्यात पावसाची जोरदार हजेरी.
सातत्याने पडत असलेल्या अवकाळी पावसाने शेतकरी विवंचनेत.
Chhatrapati Sambhaji Nagar : छत्रपती संभाजीनगर अँटी करप्शनची मोठी कारवाई
सह दुय्यम निबंधक छगन उत्तमराव पाटील यांच्या घरी झडती
घरात मिळाली तब्बल एक कोटी 35 लाखांची रोकड.
छगन पाटील यांनी सिल्लोडच्या सह दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त तयार करण्यासाठी
पाच हजारांची काल घेतली होती लाच.
Baramati : आज बारामतीमध्ये नमो रोजगार मेळावा
काका-पुतण्या एकाच मंचावर येणार!
शरद पवार आणि अजित पवार एकाच मंचावर दिसतील.
पोलीस उपमुख्यालय, बसस्थानक, पोलीस वसाहतीचे देखील आज उद्घाटन होणार
सुप्रिया सुळे आणि शरद पवार उपस्थिती लावणार का?
Rain : देशासह राज्यात पुढील 48 तासांत पावसाची शक्यता.
हवामान विभागाचा अंदाज
मराठवाडासह विदर्भात पुन्हा पावसाची शक्यता.
मराठवाडा आणि विदर्भात पावसासह गारपीट होण्याचा अंदाज - आयएमडी
नाशिक, बुलढाणा, जालना, हिंगोली भागात गेल्या दोन दिवसात पावसाची हजेरी
Nitin Gadkari : नितीन गडकरींची कॉंग्रेसच्या मल्लिकार्जुन खरगे, जयराम रमेश यांना कायदेशीर नोटीस
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करणे काँग्रेसला महागात पडणार.
केंद्रीय मंत्र्यांनी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि सरचिटणीस जयराम रमेश यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे.
या नोटीसमध्ये हा व्हिडीओ लवकरात लवकर काढावा, आणि माफी मागावी असं सांगण्यात आलं आहे.
पार्श्वभूमी
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -