Pune Bandh Live Update : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांविरोधात आज पुणे बंदची हाक
Pune Bandh Live Update : राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी (Bhagat Singh Koshyari ) छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत (Chatrapati Shivaji Maharaj) आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे आज पुणे बंदची हाक दिली आहे.
छत्रपची शिवाजी महारांजबद्दलचा आदर अजूनही बघायला मिळतो. रायगडावर गेल्यावर मला वेदना झाल्या. कारण नसताना शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह विधानं करतात. त्यांच्या सन्मान झाला पाहिजे ही सांगण्याची वेळ आली आहे. या पेक्षा मोठी शोकांतिका नाही. नुपुर शर्माच्या बाबतीत तत्काळ कारवाई करण्यात आली तशीच कारवाई राज्यपालांंवर करण्यात यावी, अशी मागणी भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी केली आहे.
पुण्यातील राज्यपालांविरोधातील मुक मोर्चा लाल महालाजवळ पोहचला आहे. यानंतर या मोर्चाचं रुपांतर सभेत होणार आहे. यावेळी सर्वपक्षीय नेत्यांची उपस्थिती आहे. भाजपचे खासदार उदयन राजे भोसले, शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे सभेतून हल्लाबोल करणार आहे.
पुण्यातील शाळा बंद ठेवण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. मात्र शाळा बंदच ठेवा अशी सक्ती करण्यात आली नाही आहे. पुण्यातील मध्यवर्ती परिसरात असलेली नुमवी शाळा बंद ठेवण्यात आली आहे. त्यातबरोबर पुण्याच्या काही शाळादेखील बंद ठेवण्यात आल्या आहे. काही प्रमाणात सकाळी शाळेत विद्यार्थी दाखल झाले होते. मात्र विद्यार्थ्यांना घरी परत पाठवून शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत.
राज्यपालांविरोधात पुणे बंदची हाक दिली आहे. यातबरोबर मुक मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. या मोर्चात शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. महिला कार्यकर्त्यांचादेखील यात सहभाग आहे. कॉंग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी राज्यपालांना हटवा, अशी मागणी केली आहे.
पुणे बंदला उत्तम प्रतिसाद दिसत आहे. पुण्यातील महत्वाचा असलेल्या फर्ग्यूसन रोडवर शांतता पसरली आहे. काही प्रमाणात वाहतूक सुरु आहे. मात्र रस्त्यांवरील सगळे दुकानं बंद आहेत. रस्त्यावर तुरळक नागरिक दिसत आहेत.
पुणे बंदच्या हाकेला पुणेकरांकडूनही उत्तम प्रतिसाद मिळत आहे. पुण्यातील लक्ष्मी रोड आणि कुमठेकर रोड परिसरात शुटशुकाट दिसत आहे. या भागात मोठ्या प्रमाणात सोन्या चांदीचे दुकानं आहेत. ही सगळी दुकानं बंद असून रस्त्यावर नागरिकदेखील कमी प्रमाणात दिसत आहे.
या मोर्चात सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात सहभागी झाले आहे. रस्त्यांवर कार्यकर्त्यांची गर्दी आहे. याच गर्दीतून नेते आणि कार्यकर्त्यांनी समाजभान राखत ॲम्बुलन्सला जायला वाट करून दिली आहे.
राज्यपालांविरोधात मुक मोर्चा सुरु आहे. सर्वपक्षीयांकडून या मुक मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. सध्या हा मुक मोर्चा लक्ष्मी रोडपर्यंत पोहचला आहे. त्यानंतर लाल महालाजवळ या मोर्चाचं रुपांतर सभेमध्ये होणार आहे.
वडगावशेरी, कल्याणी नगर, चंदन नगर परिसरात औषधांची दुकानं, भाजी मार्केट सुरु आहेत. तसेच काही शाळांना सुट्टी तर काही शाळा सुरू आहेत, चौका चौकात पोलीस थांबलेले दिसत आहेत
वडगावशेरी, कल्याणी नगर, चंदन नगर परिसरात औषधांची दुकानं, भाजी मार्केट सुरु आहेत. तसेच काही शाळांना सुट्टी तर काही शाळा सुरू आहेत, चौका चौकात पोलीस थांबलेले दिसत आहेत
पुण्यातील वडगावशेरी परिसरात पुणे बंदला संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. भाजी मार्केट आणि काही प्रमाणात दुकानं सुरु आहेत. मात्र रस्त्यांवर शुकशुकाट दिसत आहे.
महापुरुषांबाबत बेताल वक्तव्य करणाऱ्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपच्या नेत्यांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांंनी केली आहे. आज पुणे बंद आहे मात्र कारवाई केली नाही किंवा काहीही प्रतिक्रिया दिली नाही तर राज्यभर आंदोलनं करु, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
देवेंद्र फडणवीसांच्या मताने हे सरकार चालत आहे. त्यांनी फक्त पक्षापुरता नाहीतर राज्याचा विचार करायला हवा. फडणवीस एका पक्षाचे उपमुख्यमंत्री किंवा गृहमंत्री नसून महाराष्ट्राचे गृहमंत्री आहात, हे देवेंद्र फडणवीसांना लक्षाण आणून द्यायला हवं. भाजपला महापुरुष म्हणून गोळवलकर गुरुजी आणि हेडगेवारच हवे आहेत. बाकी महापुरुषांना त्यांना मोडीत काढायचं आहे. यासाठी हा सगळा प्रकार ठरवून केला जात आहे, असा हल्लाबोल शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी भाजपवर केला आहे.
देवेंद्र फडणवीसांच्या मताने हे सरकार चालत आहे. त्यांनी फक्त पक्षापुरता नाहीतर राज्याचा विचार करायला हवा. फडणवीस एका पक्षाचे मुख्यमंत्री किंवा गृहमंत्री नसून महाराष्ट्राचे गृहमंत्री आहात, हे देवेंद्र फडणवीसांना लक्षाण आणून द्यायला हवं. भाजपला महापुरुष म्हणून गोळवलकर गुरुजी आणि हेडगेवारच हवे आहेत. बाकी महापुरुषांना त्यांना मोडीत काढायचं आहे. यासाठी हा सगळा प्रकार ठरवून केला जात आहे, असा हल्लाबोल शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी भाजपवर केला आहे.
या मोर्च्यात छत्रपती उदयनराजे महाराज, छत्रपती संभाजी राजे, विरोधी पक्षनेते अजितदादा पवार, शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे आदी नेते सहभागी होणार आहेत तसेच ते जाहीर सभेतही बोलणार आहेत. यात स्थानिक नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित असणार आहे.
भगतसिंह कोश्यारीच्या वक्तव्याविरोधात आजच्या पुणे बंदमध्ये अपमानास्पद घोषणांवर बंदी घालण्यात आली आहे. या बंद दरम्यान संपूर्ण शहरात सुरक्षा मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आली आहे.
आज पुणे बंदची (Pune Bandh) हाक दिली आहे. यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी सुमारे साडेसात हजार पोलिसांचा बंदोबस्त ठेवला आहे.
राज्यपालांविरोधात पुणे बंदची हाक दिली आहे. त्याचबरोबर मुक मोर्चादेखील आयोजित करण्यात आला आहे. या मोर्चाला पुण्यातील डेक्कन गरवारे पुलावरील संभाजीराजे यांच्या पुतळ्याला अभिवानदन करुन मोर्चाला सुरुवात झाली आहे. यावेळी उदयनराजे भोसलेदेखील उपस्थित आहे.
राज्यपालांविरोधात पुणे बंदची हाक दिली आहे. त्याचबरोबर मुक मोर्चादेखील आयोजित करण्यात आला आहे. या मोर्चाला पुण्यातील डेक्कन गरवारे पुलावरील संभाजीराजे यांच्या पुतळ्याला अभिवानदन करुन मोर्चाला सुरुवात झाली आहे. यावेळी उदयनराजे भोसलेदेखील उपस्थित आहे.
- मार्केट यार्ड बंद राहणार असल्याने भाजीपाला आणि फुलांचे मार्केट बंद राहणार आहे.
- विविध व्यापारी संघटनांनी पाठिंबा दिल्याने लक्ष्मी रस्त्यासह शहरातील सर्व दुकाने तीन वाजेपर्यंत बंद राहणार आहेत.
- गणेशोत्सव मंडळांनी पाठिंबा दिल्याने प्रमुख गणेश मंदिरे बंद राहणार आहेत.
- शाळांना बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आलय. मात्र जबरदस्ती करण्यात येणार नाही.
- पी एम पी एम एल ही सार्वजनिक वाहतूक बस सेवा बंद राहणार आहे.
- रिक्षा संघटनांनी पाठिंबा दिल्याने रिक्षा बंद राहणार आहेत.
- हॉटेल्स बंद राहणार आहेत.
Pune Bandh : राज्यपालांसह वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्यांविरोधात सगळ्या संघटना एकवटल्या आहेत. व्यापारी संघाने देखील पाठिंबा दिला आहे. लक्ष्मी रोड परिसरातील सगळी दुकानं तीन वाजेपर्यंत बंद असणार आहेत. राज्यपालांच्या वक्तव्यावरुन व्यापारी देखील आक्रमक झाल्याचं दिसत आहे. त्यांनी देखील राज्यपालांचा निषेध व्यक्त केला आहे.
Pune Bandh : पुणे बंदमुळे राज्यातील दुसरी सर्वात मोठी कृषी उत्पन्न बाजार समिती असलेली पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती बंद ठेवण्यात आलीय. एरव्ही इथे पश्चिम महाराष्ट्रातून भाजीपाला येत असतो. पण आज इथे शुकशुकाट दिसतोय.
Pune Bandh : राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी (Bhagat Singh Koshyari ) छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत (Chatrapati Shivaji Maharaj) आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे आज पुणे बंदची (Pune Bandh) हाक दिली आहे. यात कोणताही उचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी सुमारे साडे सात हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला आहे. पुणे पोलिसांनी सुमारे 100 वरिष्ठ अधिकारी, 1000 हून अधिक पोलीस कर्मचारी तैनात केले आहेत.
Pune Bandh : राज्यपालांविरोधात व्यापारी संघटनांनंतर आता पुण्यातील गणेशोत्सव मंडळांनीदेखील पाठिंबा दिला आहे. त्यामुळे राज्यपालांविरोधात असलेल्या या बंदला चांगलाच प्रतिसाद मिळणार असल्याचं चित्र आहे.
Pune : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, चंद्रकांत पाटील, प्रसाद लाड आणि वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्यांविरोधात निषेध म्हणून सामाजिक संघटना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना यांनी पुकारलेल्या पुणे बंदचा परिणाम आज दिसून येणार आहे. व्यापारी संघटना, आडत व्यापारी वगैरेंनी या बंदला पाठिंबा दिला आहे
पार्श्वभूमी
Pune Bandh Live Update : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat singh koshyari), चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil), प्रसाद लाड (Prasad Lad) आणि वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्यांविरोधात निषेध म्हणून सामाजिक संघटना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना यांनी पुकारलेल्या पुणे बंदचा परिणाम आज दिसून येणार आहे. व्यापारी संघटना, आडत व्यापारी वगैरेंनी या बंदला पाठिंबा दिला आहे. या बंदसाठी उदयनराजे भोसले, संभाजीराजे छत्रपती, सुषमा अंधारे, सुप्रिया सुळे आणि इतरही अनेक नेत्यांना आमंत्रित करण्यात आलं आहे.
कोण कोण या बंदमध्ये सहभागी होणार?
राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, संभाजी ब्रिगेड, मराठा क्रांती मोर्चा आणि ठाकरे गट देखील या बंदमध्ये सहभागी होणार आहे. त्या सोबतच पुण्यातील व्यापारी संघटना आणि गणेशोत्सव मंडळांनीदेखील पाठिंबा दिला आहे. आज सकाळी 9-30 वाजता डेक्कन जिमखाना येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मूक मोर्चास प्रारंभ होणार आहे. डेक्कन जिमखाना, अलका चित्रपटगृह चौक, मार्गे लक्ष्मी रस्त्याने बेलबाग चौकातून लालमहाल येथे मुकमोर्चाची सांगता जाहीर सभेने होणार आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -