Maharashtra News Updates : अदानी समुहाच्या घोटाळ्याविरोधातील काँग्रेसचा मोर्चा पोलिसांनी अडवला, नेत्यांना घेतलं ताब्यात

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 13 Mar 2023 11:28 PM
समृद्धी महामार्गावर आता चोरट्यांची दहशत

आत्तापर्यंत अपघातांमुळे चर्चेत आलेला समृद्धी महामार्गावर आता चोरट्यांची दहशत पाहायला मिळत आहे. छत्रपती संभाजी नगरच्या जांबरगाव जवळ समृद्धी महामार्गावर चोरट्यांनी चारचाकी वाहनांवर दगडफेक केल्याची घटना समोर आली आहे . धक्कादायक म्हणजे या दगडफेकीत एक महिला प्रवासी जखमी झाली आहे. तर या दगडफेकीत चार चाकी कारच्या काचाही फुटल्याचं समोर आला आहे.

खांडबारा परिसरात जोरदार अवकाळी पावसाची सुरूवात; शेतकऱ्यांची मोठी धावपळ
नवापूर तालुक्यात होळी दिवशी अवकाळी पावसाने पहिल्यांदा हजेरी लावली त्यानंतर पुन्हा दुसऱ्यांदा आज अवकाळी पाऊस नवापूर तालुक्यात जोरदार हजेरी लावली आहे. या अस्मानी संकटाने शेतकरी हवालदिल झाला आहे नवापूर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांची पीकही काढणीला आली असून पीकमाल शेतात पडलेला आहे.यामध्ये मका,तूर,गहू, कपास आधीचा समावेश आहे तसेच फळबागांना देखील याचा धोका निर्माण झाला आहे.

 

अवकाळी पावसाचा ग्रामीण भागाला मोठा फटका बसला असून शेतपिकं, फळबागांचे अतोनात नुकसान होण्याची शक्यता आहे.त्यामुळे भाजीपाला आणि फळभाज्यांच्या पुरवठ्यावर परिणाम होऊन दरवाढीचे संकट उभे ठाकले आहे. राज्यात पुढील दोन ते तीन दिवस मेघगर्जनेसह पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

अवकाळी पावसामुळे नवापूर तालुक्यात दाणदाण उडाल्याचं चित्र आहे. नवापूर तालुक्यातील खांडबारा परिसरामध्ये सहा वाजून 45 मिनिटांनी वादळी वाऱ्यासह विजेचा कडकडाटाने अवकाळी पावसाला जोरदार सुरुवात झाली. ग्रामीण भागातील विद्युत पुरवठा देखील काही भागात खंडित करण्यात आला आहे.

 

 

सकाळपासूनच संपूर्ण आभाळ भरून आलेले असून ढगाळ वातावरणा नुसार जोरदार पाऊस पडण्याची शक्यता ही निर्माण झाली आहे. खांडबारा परिसरात जोरदार अवकाळी पावसाने परिसरातील 15 ते 20 खेडेगावातील ग्रामस्थ व शेतकऱ्यांचे प्रचंड हाल झाले शेतात पडलेला पीक माल आवरण्यासाठी मोठी धावपळ करावी लागली.
Ratnagiri News : रत्नागिरी जिल्ह्यातील 15 हजार कर्मचारी संपावर; अत्यावश्यक सेवेसाठी प्रशासन सज्ज

Ratnagiri News :  रत्नागिरी जिल्ह्यातील 15 हजार कर्मचारी संपावर जाणार आहेत. अत्यावश्यक सेवेसाठी प्रशासन सज्ज असून पोलिस, होमगार्डची मदत घेतली जाणार आहे. संपाच्या परिणामी सर्व शासकीय कार्यालयामध्ये शुकशुकाट असण्याची शक्यता आहे.  जिल्ह्यातील नगरपरिषद आणि नगरपालिका कर्मचाऱ्यांच्या संपात सहभागी होण्याचा निर्णय उद्या होणार असल्याची माहिती आहे.

Ratnagiri News : रत्नागिरी जिल्ह्यातील 15 हजार कर्मचारी संपावर; अत्यावश्यक सेवेसाठी प्रशासन सज्ज

Ratnagiri News :  रत्नागिरी जिल्ह्यातील 15 हजार कर्मचारी संपावर जाणार आहेत. अत्यावश्यक सेवेसाठी प्रशासन सज्ज असून पोलिस, होमगार्डची मदत घेतली जाणार आहे. संपाच्या परिणामी सर्व शासकीय कार्यालयामध्ये शुकशुकाट असण्याची शक्यता आहे.  जिल्ह्यातील नगरपरिषद आणि नगरपालिका कर्मचाऱ्यांच्या संपात सहभागी होण्याचा निर्णय उद्या होणार असल्याची माहिती आहे.

उद्धव ठाकरे गटाला आणखी धक्का, संग्राम कुपेकर करणार भाजपमध्ये प्रवेश

उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसला आहे. कोल्हापूरच्या चंदगड तालुक्यातील नेते संग्राम कुपेकर भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. संग्राम कुपेकर हे दिवंगत नेते बाबा कुपेकर यांचे पुतणे आहेत.  उद्या मुंबईत भाजप कार्यालयात त्यांचा भाजपमध्ये प्रवेश होणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत हा प्रवेश होणार आहे. 

भिवंडीत आगीचे सत्र सुरूच, दर्गा रोड परिसरात यंत्रमाग कारखान्याला भीषण आग

भिवंडीत आगीचे सत्र अद्याप सुरूच आहे. शहरातील दिवानशाहचा दर्गा रोड परिसरात यंत्रमाग कारखान्याला भीषण आग लागली आहे. या आगीत पाच यंत्रमाग कारखाने जळून खाक झाले आहेत. आगीचे कारण अस्पष्ट असून यात जीवित हानी झालेली नाही. घटनास्थळी भिवंडी अग्निशमन दलाच्या दोन गाड्या दाखल झाल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी जवानांचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. 

फेब्रुवारीचा किरकोळ महागाई दर ६.४४ टक्के, जानेवारी महिन्याच्या तुलनेत किरकोळ महागाई दरात घसरण 

फेब्रुवारीचा किरकोळ महागाई दर ६.४४ टक्के, जानेवारी महिन्याच्या तुलनेत किरकोळ महागाई दरात घसरण 


जानेवारी महिन्यात किरकोळ महागाई दर ६.५२ टक्क्यांवर होता, तो आता फेब्रुवारी २०२३ मध्ये ६.४ टक्क्यांपर्यंत खाली घसरला आहे 


महागाई दर सलग दुसऱ्या महिन्यात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या २-६ टक्क्यांच्या टॉलरन्स बँडच्या वर 


फेब्रुवारीतील अन्नधान्य महागाई दर ५.९५ टक्क्यांवर


भाजीपाल्यांचा महागाई दर फेब्रुवारी महिन्यात ११.६ टक्के राहिला तर जानेवारी महिन्यात तो ११.७ टक्के होता 


इंधनाच्या महागाई दरात देखील घसरण, फेब्रुवारी महिन्यात ९.९ टक्क्यांवर, जानेवारी महिन्यात इंधन महागाई १०.८४ टक्के होती 


महागाई दर नियंत्रणात आणण्यासाठी आरबीआयकडून मे २०२२ पासून २.२५ टक्के व्याजदरात वाढ

मुंबईच्या मालाड पूर्वेत आप्पा पाडाचा झोपडपट्टीमध्ये मोठी आग, अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल

मुंबईच्या मालाड पूर्वेत आप्पा पाडाचा झोपडपट्टीमध्ये मोठी आग लागली आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. मोठी झोपडपट्टी असल्यामुळे आग वाढण्याची शक्यता आहे. 

अदानी समुहाच्या घोटाळ्याविरोधातील काँग्रेसचा मोर्चा पोलिसांनी अडवला, नेत्यांना घेतलं ताब्यात

अदानी समुहाच्या घोटाळ्याविरोधात काँग्रेसने आज मोर्चा काढला आहे. परंतु, गिरगाव चौपाटीजवळ पोलिसांनी हा मोर्चा अडवला आहे. आंदोलन करणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.  


 


 

Old Pension Scheme : कर्मचारी संपाबाबत तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्र्यांनी घेतली बैठक

कर्मचारी संपाबाबत तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्र्यांनी घेतली बैठक


जुनी पेन्शन योजनेच्या अभ्यासासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांची समिती नेमणार


निवृत्तीनंतर शासकीय कर्मचाऱ्यांना सुरक्षित व सन्मानपूर्वक आयुष्य जगता यावं हे तत्व म्हणून मान्य- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


राज्य शासनाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याच्या मागणीबाबत अभ्यास करण्यासाठी राज्य शासन प्रशासकीय अधिकाऱ्यांची समिती गठीत करणार आहे. विहीत कालावधीत ही समिती अहवाल देईल. निवृत्तीनंतर अधिकारी-कर्मचाऱ्यांना सुरक्षित व सन्मानपूर्वक आयुष्य जगता यावं हे तत्व म्हणून मान्य करण्यात आल्याचे सांगतानाच संपावर जाण्याचा निर्णय मागे घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले.

Thane Water Cut : ठाणेकरांनो पाणी जपून वापरा! बुधवारी ठाण्यातील काही भागात पाणीपुरवठा बंद राहणार

Thane News :  ठाणे महानगरपालिकेच्या  योजनेमधील 2000 मि.मी व्यासाची मुख्य जलवाहिनी लोढा धाम येथे भारतीय राष्ट्रीय महामार्ग एन-एच तीनच्या बाजूस बुधवारी स्थलांतरीत करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. परिणामी सकाळी 9 ते गुरूवारी सकाळी 9 वाजेपर्यंत 24  तास पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.या अनुषंगाने ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील माजीवडा, घोडबंदर रोड, पातलीपाडा, गांधीनगर, सिद्धांचल, ऋतुपार्क, जेलटाकी, सिध्देश्वर, समतानगर, इंदिरानगर, लोकमान्यनगर, श्रीनगर, रामनगर, इटर्निटी, जॉन्सन, साकेत, रुस्तमजी तसेच कळव्याच्या व मुंब्र्याच्या काही भागात 24 तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे. या शटडाऊनमुळे पाणीपुरवठा पूर्वपदावर येईपर्यत पुढील एक ते दोन दिवस कमी दाबान पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. तरी नागरिकांनी पाण्याचा योग्य तो साठा करुन ठेवावा व ठाणे महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन ठाणे महानगरपालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

 Maharashtra News:  पेन्शन बैठकीत तोडगा नाही, संघटना आंदोलनावर ठाम

 Maharashtra News:  जुन्या पेन्शन योजनेबद्दल राज्याच्या मुख्य सचिवांसोबत कर्मचारी संघटनांची बैठक पार पडली. निर्णयात्मक चर्चा होत नाही तोपर्यंत संघटना आंदोलनावर ठाम आहेत. 

Beed News:  आईच्या मृत्यूनंतर कुठलाही विधी न करता अकरा शेतकऱ्यांच्या मुलींच्या नावावर एक लाख रुपये डिपॉझिट

Beed News:  माजलगाव तालुक्यातील पिंपळगाव येथील एका शेतकऱ्याने आपल्या आईचा मृत्यूनंतर कर्मकांडाला फाटा देऊन अकरा अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या मुलीच्या नावे प्रत्येकी एक लाख रुपयांचा भविष्य निधी जमा केला आहे. आईच्या मृत्यूनंतर इतर कुठलाही निधी न करता मायकर कुटुंबीयांनी त्या सामाजिक उपक्रमाचे आयोजन केलं होतं. यावेळी अकरा मुलींच्या खात्यावर प्रत्येकी एक लाख रुपये जमा करण्यात आले आहेत

 Ahmednagar News: शेवगाव बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद, शहरातून निषेध मोर्चा

 Ahmednagar News: शेवगाव शहरात मुस्लिम समाजाच्या युवकांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह स्टेट्स ठेवल्याने शेवगावात तणावपूर्ण वातावरण बनले आहे.. शेख एजाज लाला , सय्यद अमानअली आसिर या आरोपींनी छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना औरंगजेबाशी करणारे स्टेट्स ठेवल्याने हा वाद निर्माण झाला  पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोन्ही आरोपींना अटक देखील केली आह. मात्र, आरोपींवर कडक कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी सर्वपक्षीयांच्या वतीने आज शेवगावमध्ये बंदची हाक देण्यात आली. सकाळपासूनच या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दरम्यान आज सर्वपक्षीयांच्या वतीने शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात निषेध नोंदवण्यात आला आहे. त्यानंतर शहरातून निषेध मोर्चा देखील काढण्यात आला. डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकातून सुरू झालेल्या मोर्चाचा समारोप छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ झाला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांची आरती करण्यात आली. सकल हिंदू समाजाच्या वतीने या निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आलं होत. दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शहरात मोठा पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आलाय.

मुंबईतील गोरेगाव ओशिवरा परिसरातील एका झोपडपट्टीला भीषण, अग्निशमन दलाच्या 12 गाड्या आणि 6 जम्बो टँकर घटनास्थळी

Mumbai Fire : मुंबईतील गोरेगाव ओशिवरा परिसरातील एका झोपडपट्टीला भीषण आग लागली. लेव्हल 3 ची आग सांगितलंं जात आहे. आतापर्यंत अग्निशमन दलाच्या 12 गाड्या आणि 6 जम्बो टँकरही घटनास्थळी उपस्थित आहेत.

Nanded News:  पावसाचे दहा कोटी लिटर पाणी विद्यापीठासाठी संजीवनी ठरले.

Nanded News:  नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या साडेपाचशे एकर जमिनीत वर्षाकाठी दहा कोटी लिटर पावसाचे पाणी अडवून विद्यापीठातील पाणीटंचाईवर तर मात करण्यात आलीच शिवाय हरित विद्यापीठ करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकण्यात आले आहे. स्थापत्य अभियांत्रिकी विभागाने ही कमाल साधली आहे.

पारव्यांना दाणे टाकताना आढळून आल्यास पुणे महापालिकेकडून पाचशे रुपये दंड

Pune News : पारव्यांना दाणे टाकताना कोणी आढळून आल्यास पुणे महापालिकेकडून पाचशे रुपये दंड करण्यात येणार आहे. अनेकजण आपल्याला पुण्य मिळेल या भावनेने पारव्यांना खायला घालतात.  त्यामुळे या पारव्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मात्र या पारव्यांमुळे न्यूमोनिया आणि श्वसनाचे इतर विकार बळावत असल्याने महापालिकेकडून या पारव्यांना खायला घालणाऱ्यांना दंड करण्यात येणार आहे.

स्वप्नपूर्ती डिस्टिलरीचा वीजपुरवठा तोडा, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे आदेश

सांगलीतील कृष्णा नदीत रसायनयुक्त पाण्यामुळे हजारो माशांचा मृत्यू झाला होता.. त्याप्रकरणी वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या स्वप्नपूर्ती डिस्टिलरी प्रकल्पावर कारवाई करण्यात आलीये.  प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या प्रादेशिक अधिकाऱ्यांनी पुढील आदेशापर्यंत प्रकल्पावर बंदी घालण्यात आलीये... स्वप्नपूर्ती डिस्टिलरीचा वीजपुरवठा तोडावा, असे आदेश महावितरणला दिले असून कंपनीचा पाणीपुरवठा तोडण्याचे आदेश पाटबंधारे विभागाला दिले आहेत.  

स्वप्नपूर्ती डिस्टिलरीचा वीजपुरवठा तोडा, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे आदेश

सांगलीतील कृष्णा नदीत रसायनयुक्त पाण्यामुळे हजारो माशांचा मृत्यू झाला होता.. त्याप्रकरणी वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या स्वप्नपूर्ती डिस्टिलरी प्रकल्पावर कारवाई करण्यात आलीये.  प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या प्रादेशिक अधिकाऱ्यांनी पुढील आदेशापर्यंत प्रकल्पावर बंदी घालण्यात आलीये... स्वप्नपूर्ती डिस्टिलरीचा वीजपुरवठा तोडावा, असे आदेश महावितरणला दिले असून कंपनीचा पाणीपुरवठा तोडण्याचे आदेश पाटबंधारे विभागाला दिले आहेत.  

 Pune News: पारव्यांना प्रेमापोटी खाऊ घालू नका, अन्यथा पुणे महापालिकेकडून पाचशे रुपये दंड

 Pune News: पारव्यांना दाणे टाकताना कोणी आढळून आल्यास पुणे महापालिकेकडून पाचशे रुपये दंड करण्यात येणार आहे. अनेकजण आपल्याला पुण्य मिळेल या भावनेने पारव्यांना खायला घालतात.  त्यामुळे या पारव्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलीय.  मात्र या पारव्यांमुळे न्यूमोनिया आणि श्वसनाचे इतर विकार बळावत असल्याने महापालिकेकडून या पारव्यांना खायला घालणाऱ्यांना दंड करण्यात येणार आहे.

धुळे जिल्ह्या पुढील चार ते पाच दिवसात अवकाळी पावसाची शक्यता

Dhule News : गेल्या काही दिवसांपूर्वी धुळे शहरात सहज जिल्ह्यातील काही भागांमध्ये अवकाळी पावसासह गारपिटीने पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या संकटातून शेतकरी सावरत नाही त्यातच आता हवामान विभागाने पुन्हा एकदा अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली असून यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. धुळे जिल्ह्यातील साक्री शिरपूर शिंदखेडा या तालुक्यात गेल्या आठ ते दहा दिवसांपूर्वी अवकाळी पावसाने हजेरी लावली तर साक्री तालुक्यातील खोरे टिटणे या भागात गारपिटीने पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी आलेला घास हिरावला गेला होता. या नुकसानग्रस्त भागाची पालकमंत्री गिरीश महाजन यांनी पाहणी केल्यानंतर तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. जिल्ह्यातील बहुतांश भागातील पंचनामे पूर्ण झाले असले तरी धुळे तालुक्यातील कापडणे परिसरात अद्यापही पंचनामा यांना सुरुवात झालेली नाही. यामुळे शेतकऱ्यांना पंचनामाची प्रत्यक्ष लागली आहे. या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीच्या संकटातून शेतकरी अद्यापही सावरला नसताना त्यातच आता हवामान विभागाने जिल्ह्यात पुढील चार ते पाच दिवसात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.ो पिकांची काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे

Maharashtra Goa Highway:  मुंबई-गोवा महामार्गावर दोन व्यावसायिकांमध्ये झटापट

Maharashtra Goa Highway:  मुंबई-गोवा महामार्गावर दोन व्यावसायिकांमध्ये झटापट झाल्याची घटना समोर आली आहे.  व्यावसायाच्या वादातून जोरदार दगडफेक आणि गोळीबार झाले आहे. पेण तालुक्यातील कोपर फाटा येथील हॉटेल मिलन पॅलेस समोर झटापट झाली.  या 20 ते 25 जणांच्या टोळक्याने कोकणवासीयांना ही लुटले. दापोलीवरून बोरीवली येथे जाणाऱ्या प्रवाशांना मारहाण करत 15 तोळे सोने लुटले.

Beed News: ऊसाच्या बैलगाडीतून पडून नऊ वर्षाच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू

Beed News: बीडच्या  शिरूर तालुक्यातील हिवरसिंग येथील ऊसतोड मजुराच्या मुलीचा बैलगाडीतून पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. देवयानी गायकवाड वय वर्ष नऊ असं या मुलीचे नाव आहे. ती आपल्या आई-वडिलांसोबत ऊस तोडणीसाठी सातारा जिल्ह्यातल्या कराड येथे गेलेली होती आणि यावेळी ऊसाने भरलेल्या बैलगाडीतून पडून या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. देवयानी गायकवाड ही हिवरसिंग गावात जिल्हा परिषदेच्या शाळेत चौथीच्या वर्गात शिक्षण घेत होती मात्र गेल्या तीन महिन्यापासून आई-वडील ऊस तोडणी साठी गेल्याने ती देखील त्यांच्यासोबत गेली होती. 

Buldhana News: आज बुलढाणा जिल्ह्यातील सर्व नायब तहसीलदार नैमित्तिक रजेवर

Buldhana News:  नायब तहसीलदारांना ग्रेड पे वाढवून देण्यात यावा या मागणीसाठी राज्यभरात नायब तहसीलदार संघटना आंदोलन करणार आहे. तीन एप्रिल पासून सर्व नायब तहसीलदार बेमुदत कामबंद आंदोलन करणार आहे.. तत्पूर्वी आज बुलढाणा जिल्ह्यातील  नायब तहसीलदार नैमित्तिक रजेवर जात आहेत. आपल्या मागण्या अमरावती येथे आयुक्तांकडे मांडण्याकरता आज नायब तहसीलदाराकडून अमरावती येथे आयुक्त कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलनही केले जाणार आहे. त्यासाठी आज बुलढाणा जिल्ह्यातील सर्वच नायब तहसीलदार हे नैमित्तिक रजेवर गेले आहेत.. त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यात तहसील कार्यालयात फक्त तहसीलदार हजर असतील त्यामुळे सर्वसामान्यांची कामे आज होणार नाहीत असं चित्र आहे. गेल्या अनेक वर्षापासून नायब तहसीलदारांचा ग्रेड पे वाढवून देण्यात यावा ही मागणी नायब तहसीलदार संघटने कडून सरकार दरबारी करण्यात येत आहे.. मात्र या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्यामुळे हे आंदोलन पुकारण्यात आले असल्याचे नायब तहसीलदार संघटने कडून सांगण्यात आलं आहे.

Sangli News: नवऱ्याला रजा द्या, बायकोचा डेपोत ठिय्या; आटपाडी आगारातील प्रकार

Sangli News:    पतीने रजेचा रीतसर अर्ज देऊनही तो नाकारल्याने आटपाडी येथील एसटी कर्मचाऱ्याच्या पत्नीने आगारप्रमुखाच्या दालनासमोर झोपून आंदोलन सुरू केले हे . या अनोख्या आंदोलनाची चर्चा आटपाडी परिसरात रंगली आहे .


 
Hasan Mushrif: आमदार हसन मुश्रीफ ईडी आज ईडी कार्यालयात हजर राहणार नाही, सूत्रांची माहिती

Hasan Mushrif:   राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ यांना आज ईडीने चौकशीला हजर राहण्यासाठी समन्स बजावलं आहे, मात्र मुश्रीफ आज चौकशीला हजर राहणार नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळालीये. वकिलांमार्फत मुश्रीफ बाजी मांडणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली

खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र, पत्रातून त्यांनी भाजप आमदार राहुल कुल यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप

Sanjay Raut : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलंय.  या पत्रातून त्यांनी भाजप आमदार राहुल कुल यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे.


 





 MNS:  गुढीपाडव्यानिमित्त 22 मार्चला मनसेकडून पाडवा मेळाव्याचं आयोजन

 MNS:  गुढीपाडव्यानिमित्त 22 मार्चला मनसेकडून पाडवा मेळाव्याचं आयोजन करण्यात आले आहे.  शिवाजी पार्कवर  मेळाव्याचं आयोजन करण्यात आले आहे.  मैदानाची परवानगी मिळावी यासाठी मनसेने पोलीस आणि मुंबई महानगरपालिकेकडे अर्ज केला आहे, 

Maharashtra News: जुन्या पेन्शनसाठी सरकारी कर्मचारी आक्रमक

Maharashtra News: जुन्या पेन्शनसाठी सरकारी कर्मचारी आक्रमक झाले आहेत.   मुख्य सचिवांनी  कर्मचारी, शिक्षक संघटनांची बैठक बोलावली आहे.  तोडगा न निघाल्यास 14 मार्चपासून संप करण्यावर कर्मचारी ठाम आहेत. 

HSC Exam :  दहावी, बारावीच्या पेपर तपासणीवर संकट

HSC Exam :  दहावी आणि  बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर पुन्हा संकट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे दहावी-बारावीचा निकाल लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी शिक्षक संघटनांनी बेमुदत संपाची हाक दिली आहे. त्यामुळे या संप काळात उत्तरपत्रिका न तपासण्याचा शिक्षक संघटनांनी पवित्रा घेतला आहे. 

Buldhana News:  बुलढाणा जिल्ह्यातील सर्व तहसीलदार नायब तहसीलदार नैमित्तिक रजेवर

Buldhana News:   नायब तहसीलदारांना ग्रेड पे वाढवून देण्यात यावा या मागणीसाठी राज्यभरात तहसीलदार, नायब तहसीलदार संघटना आंदोलन करणार आहे. तीन एप्रिल पासून सर्व तहसीलदार, नायब तहसीलदार बेमुदत कामबंद आंदोलन करणार आहे.. तत्पूर्वी आज बुलढाणा जिल्ह्यातील सर्व तहसीलदार, नायब तहसीलदार नैमित्तिक रजेवर जात आहेत. आपल्या मागण्या अमरावती येथे आयुक्तांकडे मांडण्याकरता आज तहसीलदार, नायब तहसीलदाराकडून अमरावती येथे आयुक्त कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलनही केले जाणार आहे. त्यासाठी आज बुलढाणा जिल्ह्यातील सर्वच तहसीलदार, नायब तहसीलदार हे नैमित्तिक रजेवर गेले आहेत.. त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील तहसील कार्यालयातील सर्वसामान्यांची कामे आज होणार नाहीत. गेल्या अनेक वर्षापासून नायब तहसीलदारांचा ग्रेड पे वाढवून देण्यात यावा ही मागणी तहसीलदार, नायब तहसीलदार संघटने कडून सरकार दरबारी करण्यात येत आहे.. मात्र या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्यामुळे हे आंदोलन पुकारण्यात आले असल्याचे तहसीलदार, नायब तहसीलदार संघटने कडून सांगण्यात आलं आहे.

Nashik News:  शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी लाल वादळ पुन्हा मुंबईत धडकणार

Nashik News:  शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी लाल वादळ पुन्हा मुंबईत धडकणार आहे.  किसान सभेसह समविचारी संघटनांनी नाशिकच्या दिंडोरीमधून लाँगमार्चला सुरुवात केली आहे. 

Hasan Mushrif:   गेल्या 50 तासांपासून हसन मुश्रीफ नॉट रिचेबल

Hasan Mushrif:   गेल्या 50 तासांपासून हसन मुश्रीफ नॉट रिचेबल आहेत.  त्यामुळे हसन मुश्रीफ आज ईडीच्या कार्यालयात उपस्थित राहणार का? असा सवाल उपस्थित होत आहे. हसन मुश्रीफ यांना ईडीने  समन्स बजावले आहे. शनिवारी ईडीच्या छाप्यानंतर मुश्रीफ नॉट रिचेबल आहेत, 

पार्श्वभूमी

13 March Headlines : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली आज दुपारी तीन वाजता गिरगाव चौपाटी ते राजभवन असा मोर्चा काढून राजभवनला घेराव घातला जाणार आहे.  राज्य विधिमंडळ अधिवेशनाचा तिसरा आठवडा आजपासून सुरू होत आहे.   


राज्य विधिमंडळ अधिवेशनाचा तिसरा आठवडा  


राज्य विधिमंडळ अधिवेशनाचा तिसरा आठवडा आजपासून सुरू होत आहे.  गेल्या आठवड्यात अर्थसंकल्प मांडल्यानंतर त्यावर चर्चा सुरू होणार आहे. आज विरोधक शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून आक्रमक होण्याची शक्यता आहे. आजपासून अर्थसंकल्पावर चर्चा सुरू होणार आहे. यावेळी विरोधक आक्रमक होतील.  अवकळी पावसाने शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालय. त्यांना मदत करावी, कांद्याला प्रती क्विंटल पाचशे रुपयांचे अनुदान द्यावा अशी मागणी विरोधी पक्षाने केली आहे.


 जुन्या पेन्शनसंदर्भात बैठक  


 जुन्या पेन्शन योजनेबाबत तोडगा न निघाल्यास 14 मार्चपासून सरकारी कर्मचाऱ्यांनी संपाचा इशारा दिलाय. आरोग्य कर्मचारीही संपात सहभागी होणार आहेत. यावर आज मुख्य सचिवांनी बैठक बोलावली आहे. यात कर्मचारी, शिक्षक संघटनांचा सहभाग असणार आहे.  या बैठकीत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सहभागी होणार आहेत.


काँग्रेसचा राजभवनाला घेराव मोर्चा


काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली आज दुपारी तीन वाजता गिरगाव चौपाटी ते राजभवन असा मोर्चा काढून राजभवनला घेराव घातला जाणार आहे. या मोर्चात विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, प्रदेश कार्याध्यक्ष माजी मंत्री नसीम खान, चंद्रकांत हंडोरे, बस्वराज पाटील, आमदार प्रणिती शिंदे, आमदार कुणाल पाटील यांच्यासह काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री, आमदार, खासदार, प्रमुख पदाधिकारी, सर्व सेल व फ्रंटलचे अध्यक्ष तसेच काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.


समलौंगिक विवाहाला कायदेशीर मान्यता देण्याच्या याचिकेवर सुनावणी


समलौंगिक विवाहाला कायदेशीर मान्यता देण्याच्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. याला केंद्र सरकारने विरोध केला आहे.  


हसन मुश्रीफांना समन्स


राष्ट्रवादी कॉग्रेसचे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ यांना ईडीने आज चौकशीसाठी बोलवलं आहे. या प्रकरणात ईडीने अनेक ठिकाणी छापे मारी केली आहे. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी 2021 साली आरोप केले होते.  
 


महसूल विभागातील सर्व नायब तहसीलदार आणि इतर राजपत्रित अधिकाऱ्यांची  सामूहिक रजा आंदोलन 


महसूल विभागातील नायब तहसीलदार या पदाला इतर विभागातील समकक्ष पदापेक्षा मिळणाऱ्या कमी वेतनासाठी आज महसूल विभागाचे सर्व नायब तहसीलदार आणि इतर राजपत्रित अधिकारी एक दिवसाचे सामूहिक रजा आंदोलन करणार आहेत. नागपूरच्या विभागीय आयुक्त कार्यालयात नागपूरसह नागपूर विभागातील सर्व जिल्ह्यातील अधिकारी एकत्रित येऊन आंदोलन करणार आहेत.


लॉस एंजिल्स पुरस्कार सोहळा


आज 95 वा ऑस्कर पुरस्कार सोहळा होणार आहे. हा सोहळा भारतासाठी खास आहे. आरआरआर चित्रपटातील नाटू नाटू गाण्यासह भारतीय डॉक्यूमेंट्री 'ऑल दॅट ब्रीथ्स' आणि 'द एलीफॅट व्हिस्परर्स' ऑस्कर पुरस्कासाठी शार्टलिस्ट करण्यात आलेत. भारतीय वेळेनुसार पहाटे 5.30 वाजता, हॉलीवूडच्या डॉल्बी थिएटर मध्ये सोहळा पार पडणार आहे.


अहमदनगरमध्ये बंद 


छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत अवमानकारक मॅसेज प्रसारित करणाऱ्या समाजकंटकांच्या निषेधार्ह आज पूर्णवेळ शेवगाव शहर बंद ठेवण्यात येणार आहे. शेवगाव शहरातील एका युवकाने छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह स्टेट्स ठेवले होते, या घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी सकाळी 10 वाजता शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात निषेध नोंदवला जाणार आहे. यावेळी शहरातून मोर्चा काढला जाणार आहे.  


 भारत आणि ऑस्ट्रेलियामधील चौथ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्याचा  शेवटचा दिवस  


 भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान सुरू असलेल्या चौथ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्याचा आज शेवटचा दिवस आहे. चौथ्या दिवसाअखेर भारताने 91 धावांची आघाडी मिळवली आहे. सामना सकाळी 9.30 वाजता खेळवला जाणार आहे.


हनुमान चालीसा पठण प्रकरणी मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी


माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या खासगी मातोश्री बाहेरील हनुमान चालीसा पठण प्रकरणी मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. यात खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा आरोपी आहेत. याप्रकरणी खार पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या प्रकरणातून दोषमुक्तीसाठी राणांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी होईल.  

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.