Maharashtra News LIVE Updates: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा...

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये... 

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 28 Jan 2024 10:55 PM
Sangli News : सांगली : सांगलीत श्रीधर शिवराम खांडेकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ संगीत साधना कार्यक्रम संपन्न.

Sangli News : कै. श्रीधर शिवराम खांडेकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ  खांडेकर कुटूंबियांकडून सांगलीत संगीत साधना आयोजित करण्यात आली होती. अनुराधा सुपरस्पेशालिटी आय हॉस्पिटलमधील डॉ. जी. वेंकटस्वामी ऑडिटोरियम मध्ये हा संगीत साधना कार्यक्रम संपन्न झाला. या संगीत साधनामध्ये उज्जैनच्या  संस्कृती वहाने आणि प्रकृती वहाने यांची सतार व संतूरची अनोखी जुगलबंदी रंगली. संस्कृती आणि प्रकृती वहाने यांच्या सतार व संतूरची अनोखी जुगलबंदीने उपस्थित प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. या संगीत कार्यक्रमात मनमोहन कुंभारे यांनी उत्तम तबला साथ दिली. या संगीत कार्यक्रमातील जुगलबंदीला उपस्थित प्रेक्षकांनी टाळ्याच्या कडकडाटात दाद दिली.


 

 
आंदोलन मनोज जरांगेंचं, फायदा होणार 'या' नेत्यांचं; जातीय समीकरणाचे असेही गणित...

आंदोलन मनोज जरांगेंचं, फायदा होणार 'या' नेत्यांचं; जातीय समीकरणाचे असेही गणित...वाचा एका क्लिकवर...

Manoj Jarange : ...तोपर्यंत आंदोलन सुरुच ठेवणार, विरोधकांच्या टीकेनंतर मनोज जरांगेंची मोठी घोषणा

Manoj Jarange : जालना : जोपर्यंत या अध्यादेशाचा कायदा होऊन एकाला तरी त्या कायद्याअंतर्गत मराठा आरक्षणाचा फायदा होत नाही, तोपर्यंत हे आंदोलन असंच सुरु राहणार असल्याचं मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी म्हटलं. त्यामुळे या कायद्याअंतर्गत एकाही मराठ्याला आरक्षण (Maratha Reservation) मिळालं की आंदोलनाचं काय करायंच हे ठरवू. या आंदोलनाबाबत आपल्याला गाफील राहता येणार नाही. ज्यांच्या नोंदी नाहीत त्यांना या कायद्यचा लाभ झाला पाहिजे. नोंद मिळालेल्या सग्या सोयऱ्यांना सरकार काढलेल्या अधिसूचनेच्या आधारे एक तरी प्रमाणपत्र मिळे पर्यत हे आंदोलन सुरूच राहणार, असं मनोज जरांगे यांनी म्हटलं. 


वाचा सविस्तर 

Maharashtra News: मांढरदेवी काळूबाई यात्रेनिमित्त पुरंदर तालुक्यात खासदार केसरी बैलगाडा शर्यतीचे आयोजन; सुप्रीया सुळे, अमोल कोल्हेंची उपस्थिती

Maharashtra News: मांढरदेवी काळूबाई यात्रेनिमित्त पुरंदर तालुक्यात खासदार केसरी बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. या बैलगाडा शर्यतीला खासदार सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांची बैलगाडा शर्यतीसाठी उपस्थिती लावली. पुरंदर तालुक्यातील भिवरी येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आयोजन करण्यात आले होते. मांढरदेवी काळूबाई यात्रेनिमित्त भव्य खासदार केसरी बैलगाडा शर्यतीचे भरविण्यात आल्या. या शर्यतीत मोठ्या संख्येने बैलगाडी स्पर्धेक आले होते. बैलगाडा शर्यतिचे बक्षिस वितरण खासदार सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांच्या हस्ते पार पडले.

PM Modi Mann ki Baat: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 'मन की बात' नंतर बिहार भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक

PM Modi Mann ki Baat: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 'मन की बात' नंतर बिहार भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक होणार 


भाजप राजकीय परिस्थितीचा आढावा घेऊन भविष्यातील रणनीती ठरवणार


बिहार भाजप प्रभारी विनोद तावडे यांची माहिती

Pune Crime: आयटी हब हिंजवडीत एका आयटी अभियंता महिलेची गोळ्या झाडून हत्या

Pune Crime News: पुणे : आयटी हब हिंजवडीत एका आयटी अभियंता महिलेची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. मृतदेह एका लॉजमध्ये सापडल्याने खळबळ उडालेली आहे. हत्या करणाऱ्या प्रियकराला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. प्रेम संबंधांतून हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिलीये. प्रियकराला पोलीस स्टेशनला आणल्यानंतर पुढीलचा तपशील स्पष्ट होणार आहे. दोघे ही लखनौचे असून आयटी कंपनीत काम करायचे. दोन दिवसांपासून ते लॉजमध्ये राहायला होते, मात्र रात्रीत त्यांच्यात नेमके कशावरून वाद झाले? त्यातून हत्या कशी घडली? बंदूक कुठून आणली? याबाबतचा उलगडा आता पोलीस तपासात होणार आहे.

Maratha Reservation: डोंबिवलीत सकल मराठा समाजाकडून खासदार श्रीकांत शिंदेंचा गुलाल उधळून सत्कार
Maratha Reservation: मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या लढ्याला यश मिळाल्यानंतर मराठा समाजामध्ये एकच उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय. मुख्यमंत्र्यांनी आज निर्णय जाहीर केल्यानंतर मराठा समाजाकडून मुख्यमंत्र्यांचे आभार व्यक्त करण्यात येतायत. डोंबिवलीत आज मराठा सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा सत्कार केला. खासदार शिंदे यांच्यावर गुलाल उधळत त्यांचे देखील आभार मानले. खासदार श्रीकांत शिंदे आज डोंबिवलीत ग्लोबल कोकण महोत्सवाला भेट देण्यासाठी आले होते.

 
Maratha Reservation: मराठा आरक्षणासंदर्भात अध्यादेश काढल्यानंतर मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अभिनंदनांचे बॅनर

Maratha Reservation: मराठा आरक्षणासंदर्भात अध्यादेश काढल्यानंतर मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अभिनंदनांचे बॅनर


मराठा मोर्चाचे समन्वयक महेश डोंगरे यांनी हे बॅनर लावलेत


मंत्रालय परिसरात लागलेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अभिनंदनाचे बॅनर


'मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र असणाऱ्यांच्या सग्यासोयऱ्यांनाही कुणबी प्रमाणपत्र देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेणाऱ्या मराठा समाजाचे पाठीराखे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जाहीर आभार' अशा आशयाचे बॅनर मुंबईत लावण्यात आले आहेत

MLA Disqualification Case: जयंत पाटील विरुद्ध विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी 

जयंत पाटील (NCP) विरुद्ध विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी 


राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांच्या अपात्रतेवर लवकर निर्णय घ्यावा यासाठी शरद पवार गटाने याचिका दाखल केलेली आहे


सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी दिलेल्या निर्देशानुसार अध्यक्षांनी ३१ जानेवारी पर्यंत निर्णय घ्यायचा आहे


त्या पार्श्वभूमीवर उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

National News: विधीमंडळाच्या पीठासीन अधिकाऱ्यांच्या 84 व्या परिषदेचा आज दुसरा दिवस

National News: विधीमंडळाच्या पीठासीन अधिकाऱ्यांच्या 84 व्या परिषदेचा आज दुसरा दिवस आहे. परिषदेच्या दुसऱ्या दिवशी देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड उपस्थित राहणार असून ते पीठासीन अधिकाऱ्यांना संबोधित करतील. पीठासीन अधिकारी परिषदेचा समारोप राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संबोधनाने होईल. यावेळी लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला, राज्यसभेचे उपसभापती हरिवंश, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि इतर उपस्थित राहतील.

Iran-Pakistan Tensions : इराणमध्ये अज्ञात हल्लेखोरांकडून 9 पाकिस्तानींची हत्या

Gunmen kill Pak Nationals : इराण आणि पाकिस्तान यांच्यात वाढता तणाव पाहायला मिळत आहे. इराणमधील एका शहरात अज्ञात बंदूकधारी हल्लेखोरांनी 9 पाकिस्तानींची गोळ्या झाडून हत्या केली. एकीकडे इस्लामाबाद आणि तेहरान यांच्यातील तणाव कमी करण्याच्या प्रयत्न सुरु असताना दुसरीकडे इराणच्या अशांत दक्षिण-पूर्व सीमा भागात अज्ञात बंदूकधाऱ्यांनी नऊ पाकिस्तानी कामगारांची हत्या केली. शनिवारी 27 जानेवारीला ही घटना घडली आहे. वाचा सविस्तर...

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये... 


ISRO Metrological Satellite : चंद्र-सूर्यानंतर ISRO आता नवी भरारी घेण्याच्या तयारीत; फेब्रुवारीत प्रक्षेपणाची शक्यता


ISRO Metrological Satellite : बंगळुरू : चंद्र (Moon) आणि सूर्याकडे (Sun) झेपावल्यानंतर आता इस्रो (Indian Space Research Organisation) अवकाशात नवा उपग्रह पाठवण्याची तयारी करत आहे. इस्रोच्या (ISRO) वतीनं देण्यात आलेल्या माहितीनुसार, त्यांचा हवामानशास्त्रीय उपग्रह INSAT-3DS GSLV F14 वर प्रक्षेपणासाठी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटर (SDSC) SHAR येथे पाठवण्यात आला आहे. उपग्रहानं कॅप्चर केलेले यू.आर. राव सॅटेलाईट सेंटर, बंगळुरू येथे उपग्रह असेंब्ली, एकत्रीकरण आणि चाचणी उपक्रम यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आल्या आहेत. हा उपग्रह पृथ्वी विज्ञान मंत्रालय (MoES) सह वापरकर्ता-अनुदानित प्रकल्प आहे, जो ISRO च्या I-2K बस प्लॅटफॉर्मभोवती 2275 किलो 'लिफ्ट-ऑफ' वस्तुमानासह एकत्रित केला जातो. वाचा सविस्तर 


Praful Patel On Chhagan Bhujbal : मराठा आरक्षणाच्या नव्या अध्यादेशावर छगन भुजबळांचा आक्षेप; "ही भूमिका राष्ट्रवादीची नाही", प्रफुल्ल पटेलांनी हात झटकले


Praful Patel On Chhagan Bhujbal : मुंबई : राज्य सरकारनं (Maharashtra Government) मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) नव्या अध्यादेशात सगेसोयरेंबाबतची मनोज जरांगे (Manoj Jarange) यांची मागणी मान्य केली आहे. मात्र यावर मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) नाराज झाले आहेत. त्यांनी या अध्यादेशावर आक्षेप घेतला आहे. दरम्यान, यासंदर्भात अजित पवार गटाचे (Ajit Pawar Group) ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांना विचारले असता ती भूमिका राष्ट्रवादी पक्षाची (Nationalist Congress Party) नाही असं म्हणत प्रफुल्ल पटेलांनी भुजबळांच्या आक्षेपावर हात झटकले आहेत. वाचा सविस्तर


Congress Crowdfunding: राहुल गांधींची सही असलेला टी-शर्ट, भेटवस्तू 670 रुपयांना मिळणार; न्याय यात्रेसाठी काँग्रेसचं क्राउडफंडिंग


Congress Bharat Jodo Nyay Yatra Crowdfunding: नवी दिल्ली : काँग्रेस (Congress) पक्षानं 'भारत जोडो न्याय यात्रे'ला (Bharat Jodo Nyay Yatra) निधी देण्यासाठी आपली 'डोनेट फॉर जस्टिस' क्राउडफंडिंग मोहीम सुरू केली आहे. मोहिमेअंतर्गत लोकांना त्यांच्या देणगीच्या बदल्यात राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या स्वाक्षरीचा टी-शर्ट आणि पत्र मिळेल. नवी दिल्लीतील एआयसीसी मुख्यालयात काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश (Jairam Ramesh) यांच्यासह या मोहिमेचा शुभारंभ करताना काँग्रेसचे खजिनदार अजय माकन म्हणाले की, मोहिमेअंतर्गत 670 रुपये किंवा त्याहून अधिक देणगी देणाऱ्या व्यक्तीला राहुल गांधींची स्वाक्षरी असलेली भेटवस्तू मिळेल आणि तुम्हाला टी-शर्ट मिळेल. वाचा सविस्तर 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.