Maharashtra News Live Updates: भाभा रुग्णालयातील आरोग्य कर्मचाऱ्यांचे आंदोलन

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये... 

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 30 Jan 2024 01:09 PM
Mumbai: मुंबईच्या वांद्र्यातील भाभा रुग्णालयातील परिचारिका, वॉर्ड बॉय आणि इतर आरोग्य कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन

Mumbai: मुंबईच्या वांद्र्यातील भाभा रुग्णालयातील परिचारिका, वॉर्ड बॉय आणि इतर आरोग्य कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन पुकारलं आहे. रुग्णालयात दोन दिवसांपूर्वी रुग्णाच्या नातेवाईकांनी परिचारिकेला मारहाण केली होती. त्याच्या निषेधार्थ कामबंद आंदोलन करण्यात आलं. दरम्यान संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी आरोग्य कर्मचाऱ्यांनी केली आहे.

Bhiwandi : शिवसेना शिंदे गटातील पदाधिकारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये प्रवेश करणार

Bhiwandi : भिवंडी लोकसभा मतदारसंघातल्या शिवसेना शिंदे गटातील  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश होणार आहे.  पदाधिकाऱ्यांनी शिवसेना शिंदे गटाला जय महाराष्ट्र!!! करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये प्रवेश होणार आहे. 

Kishori Pednekar : किशोरी पेडणेकर ईडी कार्यालयात दाखल

Kishori Pednekar : किशोरी पेडणेकर ईडी कार्यालयात दाखल झाल्या आहेत. 

Kolhapur News: कोल्हापुरात पाईपलाईन गळतीमुळे शेतकरी त्रस्त

Kolhapur News: कोल्हापुरात पाईपलाईन गळतीमुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. संतप्त शेतकऱ्यांनी प्रकल्प अधिकाऱ्याला अंघोळ घातली आहे.  कोल्हापुरातल्या ठिकपूर्ली येथे ही घटना घडली आहे.  आधी नुकसानभरपाई द्या, मग दुरुस्तीचं करा, अशी मागणी संतप्त शेतकऱ्यांची आहे.  शेतकऱ्यांच्या शेतीचं मोठे नुकसान होत असल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. 

Sandeep Raut ED: संजय राऊतांचे धाकटे बंधू संदीप राऊत यांची आज ईडी चौकशी

Sandeep Raut ED: संजय राऊतांचे धाकटे बंधू संदीप राऊत यांची आज ईडी चौकशी आहे. कथित खिचडी घोटाळ्याप्रकरणी आज ईडी चौकशी होणार आहे. थोड्याच वेळात ईडी कार्यालयात हजर राहणार आहे. 

Kishori Pednekar: ठाकरे गटाच्या नेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकरांची आज कथित बॉडी बॅग घोटाळा प्रकरणी चौकशी

Kishori Pednekar: मुंबई महापालिकेच्या कथित  बॉडी बॅग घोटाळा प्रकरणात किशोरी पेडणेकर यांना ईडीकडून मागील आठवड्यात गुरुवारी समन्स बजावण्यात आला होता मात्र काही कारणास्तव पेडणेकर या उपस्थित राहू शकल्या नाही मात्र आज सकाळी 11 वाजता ईडी कार्यालयात किशोरी पेडणेकर चौकशीसाठी हजर राहणार आहेत

Rajya Sabha: राज्यसभेसाठी भाजपकडून चाचपणी सुरू, विनोद तावडे, पंकजा मुंडे आणि विजया रहाटकर यांच्या नावाची चर्चा

राज्यसभेच्या (Rajya Sabha) महाराष्ट्रातील सात जागांसाठीच्या निवडणुकीचं वेळापत्रक निवडणूक आयोगाने (Election Commission) सोमवारी जाहीर केलं. येत्या 27 फेब्रुवारी रोजी राज्यसभेसाठी निवडणूक पार पडणार आहे. यात महाराष्ट्रातील सहा जागांचा समावेश आहे. यातील पाच जागा महाविकास आघाडीच्या वाट्याला येण्याची शक्यता आहे. भाजपकडून राज्यसभेसाठी उमेदवाराची चाचपणी सुरू करण्यात आली आहे. राज्यातून विनोद तावडे, पंकजा मुंडे आणि विजया रहाटकर यांच्या नावाची चर्चा सुरु आहे. 

वरळीत भाजपकडून ठाकरे गटाला पुन्हा डिवचण्याचा प्रयत्न

वरळीत भाजपकडून ठाकरे गटाला पुन्हा डिवचण्याचा प्रयत्न केला आहे,. अफझलखानाचा कोथळा काढणारा पुतळा वरळीत
ठेवल्याने वादाची शक्यता आहे.  भाजपने वरळीच्या जांबोरी मैदानात पुतळा ठेवल्याने वादाची शक्यता आहे. 

Balbharti In America : अमेरिकेत मराठी शिक्षणाऱ्या मुलांना बालभारती पुरवणार पाठ्यपुस्तकं, शिक्षण विभागाचा निर्णय

Balbharti In America : अमेरिकेत मराठी भाषा शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना बालभारतीकडून पुस्तकं पुरवली जाणार आहेत. पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना पुस्तके पुरवली जातील. शालेय शिक्षण विभागाने याबाबतचा निर्णय घेतला आहे. स्थानिक गरजेनुसार आवश्यक असल्यास पाठ्यपुस्तकांमध्ये २० टक्क्यांपर्यंत बदल करण्याचे अधिकार बालभारतीला देण्यात आले आहेत.

Maratha Survey:  मुंबईतील सर्वेक्षणाचे काम जवळपास 74 टक्के पूर्ण

Mumbai Maratha Survey:  मराठा समाजाचे सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक मागासलेपण तपासण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगामार्फत युद्धपातळीवर सर्वेक्षण करण्याचे काम सुरू आहे. दरम्यान मुंबईतील सर्वेक्षणाचे काम जवळपास 74 टक्के पूर्ण झालंय....मुंबईतील 28 लाखांपेक्षा अधिक घरांचे सर्वेक्षण पूर्ण झालाय.. उद्यापर्यंत मुंबईत सर्वेक्षण केलं जाणार आहे...आणि हा सर्व डेटा राज्य मागासवर्गीय आयोगाला पाठवला जाणार आहे..

Solapur News:  खोड्या करतो म्हणून जन्मदात्या बापानेच मुलाला संपवलं, कोल्ड्रिंक्समधून विषारी पावडर पाजलं

Solapur News:  जन्मदात्या बापानेच आपल्या 14 वर्षीय मुलाचा जीव घेतल्याची धक्कादायक घटना सोलापुरात (Solapur Crime News)  उघडकीस आली आहे. विजय सिद्राम बट्टू असे मुलाची हत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. 13 जानेवारी रोजी विशाल विजय बट्टू हा सकाळपासून घरी आला नसल्याची तक्रार आई, वडील आणि नातेवाईकांनी जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात दिली होती. त्याच दिवशी रात्री 11 च्या सुमारास सोलापुरातल्या तुळजापूर नाका (Tuljapur Naka)  परिसरात एक मुलगा बेशुद्ध अवस्थेत असल्याचे पोलिसांना आढळून आले. वाचा सविस्तर

Maha Vikas Aghadi:  प्रकाश आंबेडकर मविआच्या बैठकीला हजर राहणार नाहीत

Maha Vikas Aghadi:  महाविकास आघाडीच्या बैठकीला प्रकाश आंबेडकर उपस्थित राहणार नाहीत. प्रकाश आंबेडकर यांचा छत्रपती संभाजीनगरचा दौरा सुरु असल्याने ते बैठकीला हजर राहणार नाहीत. त्यांच्याऐवजी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने प्रदेश उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकर हे बैठतकीला हजर राहतील. आज दुपारी दोन वाजता होणाऱ्या महाविकास आघाडीच्या बैठकीसाठी वंचित बहुजन आघाडीला निमंत्रण पाठवण्यात आलं होतं. 

Maha Vikas Aghadi: मराठवाडा पाठोपाठ महाविकास आघाडीचं पश्चिम महाराष्ट्रातील जागावाटप निश्चित

Maha Vikas Aghadi:  मराठवाडा पाठोपाठ महाविकास आघाडीचं पश्चिम महाराष्ट्रातील जागावाटपही जवळपास नक्की झाल्याची माहिती मिळतेय.. पुणे शहर, सोलापूर शहर आणि सांगली हे तीन मतदारसंघ काँग्रेसला मिळण्याची शक्यता आहे..तर  मावळ आणि कोल्हापूर शहर हे दोन मतदारसंघ शिवसेना म्हणजेच ठाकरे गटाला मिळण्याची शक्यता आहे..  बारामती, शिरूर, सातारा आणि माढा हे चार मतदारसंघ शरद पवार गटाला मिळणार, तर हातकणंगले मतदारसंघ मविआचा मित्रपक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटनेसाठी सोडण्याची शक्यता

Kishori Pednekar:  माजी महापौर किशोरी पेडणेकरांची आज ईडी चौकशी

Kishori Pednekar:  मुंबई महापालिकेच्या कथित  बॉडी बॅग घोटाळा प्रकरणात किशोरी पेडणेकर यांना ईडीकडून मागील आठवड्यात गुरुवारी समन्स बजावण्यात आला होता मात्र काही कारणास्तव पेडणेकर या उपस्थित राहू शकल्या नाही मात्र आज सकाळी 11 वाजता ईडी कार्यालयात किशोरी पेडणेकर चौकशीसाठी हजर राहणार आहेत

Raigad News:  रायगडमध्ये कोळी बांधवांचं सलग सातव्या दिवशी उपोषण

Raigad News:  रायगडमध्ये कोळी समाजाला अनुसूचित जमातीचे दाखले मिळावेत, जात पडताळणी समिती बरखास्‍त करावी यासह इतर मागण्‍यांसाठी कोळी बांधवांनी उपोषणाची हाक दिलीय. रायगड जिल्‍हाधिकारी कार्यालयासमोर हे उपोषण सुरु आहे. तसंच गेल्या एक आठवड्यापासून हे उपोषण सुरुये.  सुजीत आग्रावकर या उपोषणकर्त्याची प्रकृती खालावलीय. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. तर प्रशासनाकडून कोणतीही दखल आतापर्यंत घेण्यात आलेली नाहीये. तसंच जर मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा कोळी समाजानं दिलाय. 

Manoj Jarange: एकट्या भुजबळांमुळे ओबीसींचं वाटोळं होणार : मनोज जरांगे

Manoj Jarange:  एकट्या भुजबळांमुळे ओबीसींचं वाटोळं होणार आहे. जर त्यांनी आमच्या अन्नात माती कालवली तर आम्हालाही ओबीसी आरक्षणाला चॅलेंज करावं लागेल. आम्ही सुप्रीम कोर्टात गेल्यास ओबीसींचे पूर्णच्या पूर्ण 27% आरक्षण रद्द होऊ शकते असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिलाय..

Manoj Jarange:  मनोज जरांगे आज रायगडावरील शिवरायांच्या समाधीचं दर्शन घेणार

Manoj Jarange:   राज्य सरकारने मराठा आरक्षणाबाबत अध्यादेश काढल्यानंतर आज मनोज जरांगे रायगडावरील शिवरायांच्या समाधीचं दर्शन घेणार आहेत...आज पहाटे मनोज जरांगे रायगडमध्ये दाखल झालेत...दरम्यान उद्या मनोज जरांगे त्यांच्या जालन्यातील आंतरवाली सराटीतल्या घरी जाणार आहेत... मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगेनी आंतरवाली सराटीत 29 ऑगस्टपासून आंदोलन सुरु केले होते.

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये... 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.