Maharashtra News Updates: कोकणातील रिफायनरी विरोधकांची राजकारणात उडी, ग्रामपंचायतींसह स्थानिक स्वराज्य संस्थानच्या निवडणुका लढवणार
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
Belgaum News: कोगनोळी येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार जवळ असणाऱ्या माने मळ्यातील सहा एकर ऊस जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. ऊस शेतीतील आग दुकानाच्या बाजूने येत असताना शेतकरी व युवकांनी ताबडतोब येऊन ऊस तोडून ऊस शेतीचे दोन भाग केल्याने टोलनाक्याकडे येणारी आग विझली. यामुळे पुढील अनर्थ टाळला. अन्यथा या ठिकाणी व्यावसायिकांचेही लाखो रुपयाचे नुकसान झाले असते.
जलसंधारणाची विविध कामे कंत्राटदारांना देताना त्यांनी केलेल्या पूर्वीच्या कामांचा दर्जा तपासून मगच त्यांना नवीन कामे देण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या. दरम्यान, जलसंधारण महामंडळाकडील कंत्राटदार नोंदणीची जुनी पद्धत तात्काळ बदलून नवी पारदर्शक, खुली प्रक्रिया राबवून निकष पूर्ण करणाऱ्या कंत्राटदारांची नोंदणी करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.
वरळीत लिफ्ट कोसळुन दोन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती
अविघ्न हाऊस मायानगर येशील इमारतीत घडली घटना
इमारतींचं बांधकाम पुर्ण झालेलं असताना घडली घटना
१९ मजल्याची आहे इमारत पोलीस आणि फायर ब्रिगेडचे अधिकारी घटनास्थळी
कोकणातील रिफायनरी विरोधकांनी आता थेट निवडणुकीच्या मैदानात उडी घेण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई येथे झालेल्या बैठकीत आगामी ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद निवडणुका लढवण्याचा निर्णय रिफायनरी विरोधकांनी घेतलाय. काही दिवसांपूर्वी ग्रामपंचायत निवडणुका झाल्या. त्यामध्ये राजापूर तालुक्यातील धाऊलवल्ली या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये आमचा सरपंच निवडून आल्याचा दावा रिफायनरी विरोधकांनी केला आहे. त्यामुळे आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका देखील रिफायनरी विरोधक लढवणार आहेत. तसेच प्रस्ताविती भागांमधील कातळशिल्पाचं गोरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी देखील शासनाकडे पाठपुरावा केला जाणार आहे. त्यापूर्वी रिफायनरी विरोधकांनी रिफायनरीचं समर्थन करणाऱ्या कोणत्याही नेत्याला गावामध्ये प्रवेश दिला जाणार नाही अशी आक्रमक भूमिका घेतली होती. त्यामुळे शिवसेनेला त्या ठिकाणी शिव संपर्क अभियान देखील राबवता आलं नव्हतं.
औरंगाबादमधील कन्नड येथील सानेगुरुजी विद्यालयातील दोन विद्यार्थी काशीद समुद्रात बेपत्ता झाले आहेत. तीन जणांना वाचविण्यात यश आले असून त्यांच्यावर अलिबाग जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुरुड जंजिरा, काशीद पर्यटनासाठी 70 मुलेमुली आणि पाच शिक्षक आले होते.
मुंबईच्या कांदिवली पोलिसांनी व्यावसायिकाची 35 लाख रूपयांची चोरी करून फरार झालेल्या चोराच्या कल्याणमधून मुसक्या आवळल्या आहेत. आरोपी नोकराला कांदिवली पोलिसांनी कल्याणमधून अवघ्या 12 तासांत अटक केली आहे. पंकज सिंह असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. संशयित आरोपीकडून 27 लाख रुपये हस्तगत करण्यात आले आहेत.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बोरिवली येथे राहणाऱ्या हेमंत अरुण मेहता नावाच्या व्यावसायिकाने 6 जानेवारी रोजी आपल्या नोकराला गुजरातला पाठवण्यासाठी 35 लाख रूपयांची रोकड दिली होती. आरोपीसह व्यावसायिकाचा आणखी एक जुना नोकर देखील सोबत गेला. हे दोघेही पैसे घेऊन कांदिवली पश्चिम येथील लालजी पाडा येथील साई धाम कॉम्प्लेक्समध्ये पोहोचले असता सुरक्षा रक्षकाने त्यांना अडवून डायरीत नावे टाकण्यास सांगितले. व्यावसायिकाचा जुना नोकर डायरीमध्ये नाव टाकण्यासाठी दुचाकीवरून खाली उतरताच नवीन नोकराने 35 लाखांची रोकड भरलेली बॅग घेऊन पळ काढला होता.
Konkan News: कोकणातल्या रिफायनरी विरोधकांनी आता थेट निवडणुकीच्या मैदानात उडी घेण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई येथे झालेल्या बैठकीत आगामी ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद निवडणुका लढवण्याचा निर्णय घेण्यात आला. अगदी काही दिवसांपूर्वी ग्रामपंचायत निवडणुका झाल्या. त्यामध्ये राजापूर तालुक्यातील धाऊलवल्ली या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये आमचा सरपंच निवडून आल्याचा दावा रिफायनरी विरोधकांनी केला आहे. त्यामुळे आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका देखील रिफायनरी विरोधक लढवणार आहेत.
नितिन देशमुख यांना एसीबीची नोटीस, 17 जानेवारीपासून हजर राहण्याचे आदेश
चंदा आणि दीपक कोचर यांची रिलिज ऑर्डर कोर्टानं जारी केली आहे. मुंबई उच्च न्यायालयानं दोघांनाही प्रत्येकी 1 लाख रूपयांचा जामीन मंजूर केलाय. या रकमेचा भरणा कोर्टात झाला आहे.
मुक्तता आदेश घेऊन वकील कारागृहकडे रवाना झाले आहेत. चंदा कोचर सध्या भायखळा तर दीपक कोचर आर्थर रोड कारागृहात आहेत. दोघेही थोड्याच वेळात कारागृहाबाहेर येणार
नांदेड जिल्ह्यातील किनवट येथील युवकाचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू झालाय. मयत युवक हा किनवट तालुक्यातील सिरमेटी येथील रहिवासी असून धर्मराज मेश्राम असे तरुणाचे नाव आहे. आज सकाळी ही घटना घडली आहे. आदीलाबाद पूर्णा पॅसेंजरच्या धडकेत या तरुणाचा मृत्यू झाला असून हा अपघात होता की आत्महत्या याचा तपास पोलिस करत आहेत.
Nashik Accident : त्र्यंबकला भाविकांची मिनी बस उलटली असून 29 पैकी 13 प्रवासी जखमी झाल्याचे प्राथमिक माहिती आहे. त्र्यंबकेश्वर शहरातील ब्रम्हगिरीवरून जाऊन आलेल्या भाविकांनी बसमध्ये बसून प्रवास सुरु केला. ब्रह्मगिरी कडे जाणाऱ्या रस्त्यावरील उतारावरून खाली येत असताना संस्कृती हॉटेल पर्यटन केंद्र येथे वाहनावरील नियंत्रण सुटले. यावेळी बस थेट नाल्यात उलटून होऊन समोरच्या झाडाला अडली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. मात्र काही भाविक जखमी झाले असून यातील काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते आहे.
Anil Deshmukh: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची संध्याकाळी सहा वाजता माजी गृहमंत्री अनिल देशमुख भेट घेणार आहेत. जेलमधून बाहेर आल्यानंतर आज अनिल देशमुख आणि शरद पवार यांची भेट होणार आहे. संध्याकाळी सहा वाजता सिल्वर ओक निवासस्थानी अनिल देशमुख शरद पवारांची भेट घेणार आहेत.
Parshuram Ghat: मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गावरील परशुराम घाटातील डोंगरात सुरु असलेल्या खोदाईमुळे दोन दगड पायथ्याशी असलेल्या पेढे बौध्दवाडीत भर वस्तीत असलेल्या घराजवळ पडले. यात घरातील साहित्याचे किरकोळ नुकसान झाले असले तरी या प्रकारामुळे ग्रामस्थांमध्ये प्रचंड भीतीचे निर्माण झाली आहे. दगड कोसळल्यानंतर महामार्ग कंत्राटदार कंपनीची सुरक्षेबाबतची बेवफाई सुरुच असल्याचे दिसून येत आहे..
Maharashtra News: विधिमंडळात बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचं अनावण 23 जानेवारीला होणार आहे. या कार्यक्रमाचं निमंत्रण उद्धव ठाकरे यांना पाठवण्यात येणार आहे. मात्र, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत व्यासपीठावर जाण्याचं उद्धव ठाकरे टाळणार असल्याचं सूत्रांनी सांगितलंय.
Amol Kolhe: अमोल कोल्हे यांच्या शिवपुत्र संभाजी नाटकाचा प्रयोग नाशिकमध्ये होणार आहे. त्याचा प्रोमो प्रदर्शित करण्यात आलाय. अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादीने नेते छगन भुजबळ यांना नाटकाचं पहिलं तिकीट दिले आहे. या तिकिटाचे पाच हजार रुपये छगन भुजबळांनी अमोल कोल्हे यांना दिले आहेत.
chanda kochhar: चंदा आणि दिपक कोचरला दिलासा मिळाला आहे. 50 हजारांच्या जामीनावर सुटका करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.
Vishwas Mehendale : ज्येष्ठ माध्यमकर्मी डॉ. विश्वास मेहेंदळे यांचं निधन झाले आहे. वयाच्या 84 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. अनेक कार्यक्रमांचं सूत्रसंचालन केले आहे.
Gondiya News: मागील पाच दिवसांपासून गोंदिया जिल्ह्याच्या तापमानात सातत्याने घट होत असल्याने जिल्हा गारठल्याचे चित्र आहे. गोंदिया जिल्ह्यात 7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून सर्वत्र हुळहुळी भरणाऱ्या या थंडीमुळे नागरिक शेकोटीच्या आधार घेतल्याचे चित्र बघायला मिळत आहे. मागील 9 वर्षातील सर्वात गारठवणारी थंडी म्हणून नोंद झाली आहे. पारा 7 अंश सेल्सिअसवर आल्याने हुडहुडी कायम आहे.
Anil Deshmukh: माजी गृहमंत्री अनिल देशमुखांनी मुख्यमंत्री शिंदेंना पत्र लिहिले आहे. 'नागपूरमधील काटोल येथे वरिष्ठ दिवाणी न्यायालय हवं' अशी मागणी पत्रातून केली आहे. पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडे
काटोलमधील जनतेच्या व्यथा व्यक्त केल्या आहेत.
Mumbai Delhi AQI : मुंबई आणि दिल्लीची हवा गुणवत्ता एकाच श्रेणीत
दोन्ही शहरातील हवा गुणवत्ता निर्देशांक 300 पार जात ‘अतिशय खराब’ श्रेणीत
सलगच्या 4 दिवसांपासून मुंबईतील हवा गुणवत्ता निर्देशांक 300 पार
कमी वाऱ्यांचा वेग, कमी तापमान, ढगाळ वातावरण आणि अधिक आर्द्रतेत रस्त्यांवरील वाहनांच्या गर्दीमुळे मुंबईतली हवा अधिक प्रदूषित
मुंबईतील वातावरणात पीएम 2.5 ची मात्रा अधिक, जी अतिधोकादायक
मुंबईचा एक्यूआय- गुरुवारी - 306, शुक्रवारी - 314, शनिवारी - 319, रविवारी - 305 तर आज 305
CET Exam: उच्च व तंत्र शिक्षण विभागाबरोबरच कला, कृषी, वैद्यकीय शिक्षण, आयुष शिक्षण या विभागांच्या सीईटी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाले असून, 18 मार्च ते 23 जुलै या कालावधीत सीईटी परीक्षा होणार आहेत. त्याचसोबत अभियांत्रिकीसाठीची एमएचटी सीईटी परीक्षा 9 ते 20 मे दरम्यान होणार आहेत.
Mumbai News : मुंबईतील परळ पुलावर आज सकाळी ७ च्या सुमारास एका ट्रकला आग लागली. चालकाने प्रसंगावधान राखून ट्रकमधून उडी मारल्याने तो थोडक्यात बचावला. अग्निशमन दलाला याची माहिती मिळताच दाखल झाले. यावेळी वाहतूक पोलिसांनी दोन्ही बाजूची वाहतूक काही काळ थांबवली होती. याचवेळी अग्निशमन दलाचा एक जवान ड्युटीवर जात असताना पाण्याचा टँकर थांबवलं आणि ही आग विझवण्याचे प्रयत्न केले. त्यामुळे ट्रकचा बराचसा भाग आगीतून वाचवण्यात यश आलं. मात्र ट्रकच्या केबिनचं मोठं नुकसान झालं आहे. हा ट्रक भिवंडीहून ॲल्युमिनियमचे सामान घेऊन पायधुनीकडे जात असताना ही घटना घडली. या आगीमुळे काहीकाळ वाहतूक कोंडी बघायला मिळाली.
Nandurbar News: नंदुरबार जिल्हा निर्मितीनंतर नंदुरबार जिल्ह्यात चार बस आगार असून या आजारात 300 बस असून त्यापैकी दोनशे बसेस धोकेदायक स्थितीत असून या बसेस नादुरुस्त होण्याचे प्रमाणही मोठ्या संख्येने वाढले आहे. नादुरुस्त बसेस मुळे अपघाताची संख्याही वाढण्याची भीती आहे. नंदुरबार जिल्हा सातपुड्याच्या डोंगर रांगांमध्ये असून मोठ्या प्रमाणात घाट रस्ते आहेत. मात्र बसेसची अवस्था लक्षात घेतल्यास या बसेस या मार्गावर चालवणे म्हणजे प्रवाशांच्या जीवाशी खेळ खेळत असल्याचाआरोप प्रवासी संघटनेचे अध्यक्ष गजेंद्र शिंपी यांनी केला आहे. प्रवासी संघटनेने वारंवार पाठपुरावा केल्यानंतर जिल्ह्यात 30 नवीन बस महामंडळाने देण्याचे मंजूर केले असले तरी खराब बसच्या तुलनेत मंजूर बसेसची संख्या अत्यंत कमी असल्याने आदिवासी भागातील जनतेचा विचार करून मुख्यमंत्र्यांनी नंदुरबार जिल्ह्यासाठी अधिकच्या बसेस उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी प्रवासी संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे. जिल्हा निर्मितीला पंचवीस वर्षे झाल्यानंतरही जिल्ह्यात एसटी विभागीय कार्यालय आले नसून ते धुळे येथे आहे नंदुरबार आणि धुळे जिल्ह्याचा कारभार त्या ठिकाणी होत असून त्या कार्यालयावर ताण पडत असल्याने नंदुरबार जिल्ह्यासाठी स्वतंत्र विभागीय कार्यालय सुरू करावे अशी मागणी प्रवासी संघटनेने केली आहे.
Nandurbar News: नंदुरबार जिल्हा निर्मितीनंतर नंदुरबार जिल्ह्यात चार बस आगार असून या आजारात 300 बस असून त्यापैकी दोनशे बसेस धोकेदायक स्थितीत असून या बसेस नादुरुस्त होण्याचे प्रमाणही मोठ्या संख्येने वाढले आहे. नादुरुस्त बसेस मुळे अपघाताची संख्याही वाढण्याची भीती आहे. नंदुरबार जिल्हा सातपुड्याच्या डोंगर रांगांमध्ये असून मोठ्या प्रमाणात घाट रस्ते आहेत. मात्र बसेसची अवस्था लक्षात घेतल्यास या बसेस या मार्गावर चालवणे म्हणजे प्रवाशांच्या जीवाशी खेळ खेळत असल्याचाआरोप प्रवासी संघटनेचे अध्यक्ष गजेंद्र शिंपी यांनी केला आहे. प्रवासी संघटनेने वारंवार पाठपुरावा केल्यानंतर जिल्ह्यात 30 नवीन बस महामंडळाने देण्याचे मंजूर केले असले तरी खराब बसच्या तुलनेत मंजूर बसेसची संख्या अत्यंत कमी असल्याने आदिवासी भागातील जनतेचा विचार करून मुख्यमंत्र्यांनी नंदुरबार जिल्ह्यासाठी अधिकच्या बसेस उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी प्रवासी संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे. जिल्हा निर्मितीला पंचवीस वर्षे झाल्यानंतरही जिल्ह्यात एसटी विभागीय कार्यालय आले नसून ते धुळे येथे आहे नंदुरबार आणि धुळे जिल्ह्याचा कारभार त्या ठिकाणी होत असून त्या कार्यालयावर ताण पडत असल्याने नंदुरबार जिल्ह्यासाठी स्वतंत्र विभागीय कार्यालय सुरू करावे अशी मागणी प्रवासी संघटनेने केली आहे.
Bhandara News: मागील चार दिवसांपासून गारठा प्रचंड वाढला आहे दरम्यान, प्रचंड कडाक्याची थंडी वाढल्याने पालेभाज्या पिकांना याचा चांगलाच फटका बसला आहे. फुलकोबी पिवळी पडत आहेत, तर अन्य पालेभाज्यांवरही त्याचा काही अंशी परिणाम जाणवू लागल्याने शेतकऱ्यांनी पिकाला योग्य ग्राहक आणि दर मिळावा यासाठी मुदतपूर्वक काढणीला प्राधान्य दिलं आहे. रब्बीच्या हंगामात भंडारा जिल्ह्यात भात पिकाची लागवड करण्याच्या दृष्टीने पऱ्यांची पेरणी करण्यात आली आहे. मात्र, कडाक्याच्या थंडीमुळे पऱ्यांची वाढ खुंटण्याची भीती आहे. त्यामुळे दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांमध्ये व्यक्त होऊ लागली आहे.
Nandurbar Cold: हवामान खात्याने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार उत्तर महाराष्ट्रातात तापमानात घट होऊन कडाक्याची थंडी पडली आहे. नंदुरबार जिल्ह्यातील डोंगराळ भागात तापमान 8 अंश सेल्सिअस पर्यंत खाली आले असून गारठा वाढला आहे.दुपार पर्यंत वातावरणात गारठा राहत आसल्याने नागरिकांना शकोटयांचा आधार घ्यावा लागत आहे.तर सपाटी भागात तापमान 11 अंश सेल्सिअस आहे.पारा खाली आल्याने कडाक्याचा थंडीने जिल्हा गारठला असून थंडीचा परिणाम मानवी जनजीवनावर होत आहे.सातपुड्याच्या डोंगर रंगामध्ये कडाक्याच्या थंडी सोबत दाट धुके पाहण्यास मिळत आहे.पर्यटकांनी नेहमी गजबजलेला यशवंत तलाव परिसर थंडी मुळे सकाळी ओस पडल्याचे चित्र आहे.वाढत्या थंडीचा फळबागांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी फळबागांची काळजी घेण्याचे आहवान कृषी विभागाने व्यक्त केलं आहे.
पार्श्वभूमी
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये..
राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्या जामीन अर्जावर आज मुंबई हायकोर्टात सुनावणी होणार आहे. सर्वच न्यायालयांमध्ये आजपासून ई-फायलिंग द्वारे कामकाजाला सुरुवात होणार आहे. यामुळे संपूर्ण कामकाज पेपरलेस होईल. आज अमरावतीत किन्नरांची कलश यात्रा निघणार आहे. अमरावती शहरात तब्बल 50 वर्षानंतर राष्ट्रीय किन्नर संमेलन 3 ते 11 जानेवारी दरम्यान पार पडतय. याबरोबरच आज यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मागण्या आणि त्यांच्या विविध समस्या शासन दरबारी मांडण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाकडून धडक आक्रोश मोर्चा काढला जाणार आहे.
बनावट प्रमाणपत्र प्रकरणी चौकशी अधिकारी शिक्षण उपसंचालकांना अहवाल सादर करणार
12 लाख रुपयांच्या मोबदल्यात शाळांना सीबीएसईची मान्यता असल्याचे बनावट प्रमाणपत्र विकणारी टोळी कार्यरत असल्याचं समोर आलंय. त्यासाठी मंत्रालयातील शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बनावट सह्यांचा वापर करण्यात आलाय. त्यानंतर या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले असून पुण्यातील तीन शाळांची चौकशी सुरु झालीय. मात्र या घोटाळ्याची व्याप्ती मोठी असण्याची शक्यता शिक्षण विभागातील अधिकारी व्यक्त करतायत. आज या प्रकरणात चौकशी अधिकारी शिक्षण उपसंचालकांना त्याचा अहवाल सादर करणार आहेत.
नवाब मलिक यांच्या जामीन अर्जावर आज मुंबई हायकोर्टात सुनावणी होणार
राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्या जामीन अर्जावर आज मुंबई हायकोर्टात सुनावणी होणार आहे.
आयसीआसीआय बॅंक घोटळा प्रकणी हायकोर्टाचा निकाल
आयसीआयसीआय बँक घोटाळ्याप्रकरणी चंदा आणि दिपक कोचर यांच्या याचिकेवर हायकोर्ट सकाळी 10:30 वाजता निकाल जाहीर करणार आहे. सीबीआयची कारवाई बेदायदेशीर असल्याचा दावा करत जेलमधून तात्काळ सुटकेची कोचर दांपत्यानं हायकोर्टाकडे मागणी केली आहे.
अमरावतीत किन्नरांची कलश यात्रा
आज अमरावतीत किन्नरांची कलश यात्रा निघणार आहे. अमरावती शहरात तब्बल 50 वर्षानंतर राष्ट्रीय किन्नर संमेलन 3 ते 11 जानेवारी दरम्यान पार पडतय. आज किन्नरांसाठी महत्वाचा दिवस आहे. अमरावती शहरातून देशभरातून आलेले किन्नर सजून डजून या कलश यात्रेत सहभागी होतात. यावेळी अनेक किन्नर एक ते दिड किलो सोन्याचे दागिने परिधान करून या कलश यात्रेत सहभाग घेतात.
यवतमाळमध्ये शिवसेना ठाकरे गटाचा धडक आक्रोश मोर्चा
यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मागण्या आणि त्यांच्या विविध समस्या शासन दरबारी मांडण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाकडून धडक आक्रोश मोर्चा काढला जाणार आहे. या मोर्चाचे नेतृत्व खासदार अरविंद सावंत, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे करणार आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -