Maharashtra News Updates : विधान परिषद पदवीधर मतदारसंघ निवडणूक; महाविकास आघाडीकडून जागावाटप जाहीर

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 11 Jan 2023 09:24 PM
Beed News: राज ठाकरे 18 जानेवारीला परळी न्यायालयात हजर राहणार
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे बीड जिल्ह्यातील परळीन्यायालयात हजर होणार आहेत. चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी परळी न्यायालयानेराज ठाकरेंना अजामीनपात्र वॉरंट बजावले आहे. त्यामुळे ते येत्या 18 जानेवारीला न्यायालयात हजर राहणार आहेत.. यापूर्वी दोन वेळा त्यांच्या येण्याच्या कळल्या आहेत आता ते 12 तारखेची 18 तारखेला येणार आहेत

 
Belgaum News : कर्नाटक काँग्रेसने आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेऊन बेळगावातून प्रजा ध्वनी बस यात्रेला प्रारंभ

Belgaum News : बेळगावात 1924 साली काँग्रेसचे अधिवेशन झालेल्या वीरसौध येथून प्रजा ध्वनी यात्रेचा शुभारंभ केला. कर्नाटक प्रदेश काँग्रेस अध्यक्ष डी.के.शिवकुमार, विरोधी पक्ष नेते सिद्धरामय्या यांच्यासह काँग्रेस पक्षाचे नेते, लोक प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. भ्रष्ट आणि अकार्यक्षम भाजप सरकारचे रूप जनतेच्या समोर आणण्यासाठी आणि जनतेत जागृती निर्माण करण्यासाठी प्रजा ध्वनी बस यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यात प्रजा ध्वनी बस यात्रा फिरणार असून राज्यातील जनतेशी काँग्रेस नेते संवाद साधून जनजागृती करणार आहेत अशी माहिती कर्नाटक प्रदेश काँग्रेस अध्यक्ष डी.के.शिवकुमार यांनी माध्यमांशी बोलताना दिली. काँग्रेस सरकार कर्नाटकात सत्तेवर आल्यास प्रत्येक कुटुंबाला 200 युनिट वीज मोफत देण्याची घोषणाही काँग्रेसने यावेळी केली. बेळगावहून प्रजा ध्वनी यात्रा चिकोडीला रवाना झाली.

यवतमाळ: कोळसा खाणीतून चोरी होणारा 21 लाखांचा कोळसा जप्त, सापळा रचून पोलिसांची कारवाई

यवतमाळ जिल्ह्यातील मुकुटबनच्या एसीबी इस्पात कोळसा खाणीतून  कोळसा तस्करी करणारे आठ ट्रक जप्त  करण्यात आले. ही कारवाई सकाळच्या सुमारास करण्यात आली. या वाहनातून 260 टन  कोळसा जप्त करण्यात आला असून  20 लाख 80 हजार रुपये कोळशाची किंमत आहे. 

विधान परिषद पदवीधर मतदारसंघ निवडणूक; महाविकास आघाडीकडून जागावाटप जाहीर

विधान परिषद पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून जागावाटप जाहीर करण्यात आले आहे.  

आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात अनिल देशमुखांच्या जामीनाची प्रक्रिया पूर्ण

आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात अनिल देशमुखांच्या जामीनाची प्रक्रिया पूर्ण


विशेष सत्र न्यायाधीश राहुल रोकडे यांच्यासमोर देशमुख हमीदारासह हजर


हायकोर्टानं जामीन मंजूर करताना आखून दिलेल्या अटीशर्तींचं देशमुख उल्लंघन करणार नाहीत, अशी हमी त्यांच्यावतीनं वकील इंद्रपाल सिंह यांनीच दिली


ही हमी मान्य करत न्यायाधीश रोकडे यांनी औपचारिक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश दिले

आमदार बच्चू कडू यांना धडक देणाऱ्या अज्ञात दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल

Bacchu Kadu : आमदार बच्चू कडू यांना धडक देणाऱ्या अज्ञात दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज सकाळी 6.15 वाजता अमरावती शहरातील कटोरा रोडवरील आराधना चौकजवळ बच्चू कडू रस्ता ओलांडताना एका दुचाकी स्वरांनी त्यांना धडक दिली होती. याप्रकरणी गाडगेनगर पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात दुचाकी स्वराविरुद्ध 279, 337 भादवी 184, 134, 177 अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.


 

नागपूर जिल्हा न्यायालयात वकिल आणि वाहतूक पोलिसांत धक्काबुक्की

Nagpur : नागपूर जिल्हा सत्र न्यायालयात दुपारी दिडच्या सुमारास वकिल आणि पोलिसांत धक्काबुक्की झाली. प्राथमिक माहितीनुसार वकिल रॉंग साई़डने आपल्या गाडीने जात होता. त्याला पोलिसांने हटकले आणि अडविण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात गाडीवरील नियंत्रण सुटल्याने वकिलाची गाडी पडली. घटनेची माहिती मिळताच मोठ्या संख्येत वकिल परिसरात जमा झाले. अनेकांनी घटनेचे फोटो आणि व्हिडीओही काढले. तसेच वकिलांकडून पोलिसाने कॅलर पकडण्याचा आरोप लावण्यात आला. तसेच पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोपही वकिलांकडून करण्यात आला आहे.

हिंगोली कळमनुरी रोडवर एसटी महामंडळाची धावती बस उलटून सात विद्यार्थ्यांसह 24 जण जखमी

Hingoli News : हिंगोली कळमनुरी रोडवर मसोड फाटाजवळ एसटी महामंडळाची बस पलटी झाल्याने 24 जण जखमी झाले आहेत. यामध्ये सात विद्यार्थ्यांचा सुद्धा समावेश आहे तर एक जण गंभीर जखमी आहे. आज सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास ही बस कळमनुरीच्या दिशेने जात असताना स्टेरिंगची पिन तुटल्याने बस चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि त्यामध्ये बस उलटी झाल्याने हा अपघात झाला. दरम्यान अपघातामध्ये एकूण 24 जण जखमी झाल्याची माहिती आहे. जखमींवर कळमनुरी उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत.

आमदार बच्चू कडू पुढील उपचारासाठी नागपूरला रवाना

Bacchu Kadu : आमदार बच्चू कडू यांना पुढील उपचारासाठी नागपूरला हलवण्यात आलं आहे. आज सकाळी 6 ते साडे सहाच्या दरम्यान रस्ता ओलांडताना एका दुचाकीस्वाराने त्यांना धडक दिली आहे. यामध्ये बच्चू कडू रोडच्या डिव्हायडरवर आदळल्यानं डोक्याला मार लागला आहे.

जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीला हायकोर्टाचा मोठा दिलासा, बेबी पावडर वितरण आणि विक्रीस परवानगी

Johnson and Johnson :  जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीला हायकोर्टाचा मोठा दिलासा मिळाला आहे. बेबी पावडर वितरण आणि विक्रीस परवानगी देण्यात आली आहे. एफडीएनं बंदी घातलेले आदेश हायकोर्टाकडून रद्द करण्यात आले आहे

थोड्याच वेळात अमरावतीत भाजपच्या संवाद सभेला सुरुवात होणार

Amravati News : थोड्याच वेळात अमरावतीत भाजपच्या संवाद सभेला सुरुवात होणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित राहणार आहेत. आज अमरावती पदवीधर निवडणुकीचे भाजप आणि मित्रपक्षाचे उमेदवार डॉ. रणजित पाटील आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यापूर्वी अमरावती शहरातील दसरा मैदान येथे भव्य सभा आयोजित केली आहे. यावेळी अमरावती विभागातील पाच जिल्ह्यातील पदवीधर मतदार, भाजपचे खासदार, आमदार नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहतील. डॉ. रणजित पाटील यांच्या विरुद्ध कोण निवडणूक लढवणार हे अजून महाविकास आघाडीत निश्चित झालं नाही पण आज काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता आहे.

हसन मुश्रिफांचे व्यावसायिक पार्टनर असलेले चंद्रकांत गायकवाड यांच्या कार्यालयावरदेखील छापेमारी सुरु

हसन मुश्रिफांचे व्यावसायिक पार्टनर असलेले चंद्रकांत गायकवाड यांच्या कार्यालयावरदेखील छापेमारी सुरु आहे. विद्यापीठ रोडवरील वेस्टर्न कोर्ट या ठिकाणी छापेमारी सुरु आहे 

Gokhale Bridge in Andheri : अंधेरीचा गोखले पूल पाडण्यास सुरुवात, 13 जानेवारीपर्यंत रात्रीचा चार तासाचा ब्लॉक

Gokhale Bridge in Andheri : अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा गोखले पूल धोकादायक झाल्यामुळं तो पाडण्याचा निर्णय घेतला आहे. हा पूल तोडण्याच्या कामास प्रत्यक्षात रात्रीपासूनच सुरुवात झाली असून 13 तारखेपर्यंत रात्रीच्या वेळेस चार तासाच्या मेगाब्लॉक दरम्यान या पुलाचे तोड काम केले जाणार आहे. यामुळे पश्चिम रेल्वेने रेल्वे वाहतुकीच्या वेळापत्रकात बदल केला आहे. या तोडकामासाठी पश्चिम रेल्वे कडून मोठ्या प्रमाणात पोकलेन जेसीबी डंपर सोबतच मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ देखील उपलब्ध करून दिले आहे. 7 नोव्हेंबर 2022 पासून हा उड्डाणपूल बंद करण्यात आला होता. रेल्वे रुळावरील पुलाचा भाग हटवण्यासाठी आता पश्चिम रेल्वेने तब्बल 20 तासांचा मेगाब्लॉक घेण्याचा निर्णय घेत प्रत्यक्षात रात्रीपासून या तोडकामास सुरुवात केली आहे. या ब्लॉक दरम्यान डाउन धीम्या मार्गावर रात्री 12.15 ते पहाटे 4.45 वाजेपर्यंत तर हार्बरच्या अप आणि डाउन दोन्ही मागांवर रात्री 12.45 ते पहाटे 4.45 वाजेपर्यंत रेल्वे सेवा पूर्णपणे ठप्प राहणार आहे.

Ashish Deshmukh : काँग्रेसच्या मोठ्या नेत्यांनी पहिले आपापसातील मतभेद दूर करावेत : आशिष देशमुख
Ashish Deshmukh : काँग्रेसच्या कोणत्याही नेत्याला मध्य रात्री उठवून तुमचा सर्वात मोठा शत्रू कोण असे विचारले तर प्रत्येक मोठ्या नेत्याच्या डोळ्यासमोर काँग्रेसच्याच एखाद्या नेत्याचा चेहरा येईल. त्यांना भाजप किंवा इतर पक्ष शत्रू वाटणार नाही. त्यामुळे जनतेत "हात से हात जोडो" असा अभियान घेऊन जाणाऱ्या काँग्रेसच्या मोठ्या नेत्यांनी पहिले आपापसातील मतभेद दूर करण्यासाठी आपापसात हात से हात जोडो आणि दिल से दिल जोडो अभियान राबवण्याची गरज असल्याचे मत काँग्रेस नेते आशिष देशमुख (Ashish Deshmukh) यांनी व्यक्त केले आहे. नेहमी आविर्भावात वावरणाऱ्या काँग्रेसच्या मोठ्या नेत्यांनी, जनतेपासून दूर गेलेल्या काँग्रेस नेत्यांनी आधी आपल्यासाठी हात से हात जोडो अभियान राबवण्याची गरज असल्याचे देशमुख म्हणाले.
Pune Fire News : पुण्यातील मावळ तालुक्यातील यात्रेत गाव गुंडांचा हवेत गोळीबार

Pune Fire News : पुण्यातील मावळ तालुक्यातील यात्रेत गाव गुंडांनी गोळीबार केल्याची घटना घडली. सुदैवाने हा गोळीबार हवेत झाल्यानं यात कोणीही जखमी नाही. पण या धक्कादायक घटनेने चांदखेडच्या यात्रेत खळबळ उडाली. काल घडलेल्या या घटनेचा व्हिडीओ आता समोर आला आहे. शिरगाव पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या गुन्हेगाराने यात्रेत दहशत निर्माण करायची असल्यानं हा गोळीबार केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे.

मावळ तालुक्यातील यात्रेत गाव गुंडांनी केला गोळीबार

पुण्यातील मावळ तालुक्यातील यात्रेत गाव गुंडांनी थेट गोळीबार केला. सुदैवाने हा गोळीबार हवेत झाल्यानं यात कोणीही जखमी नाहीये. पण या धक्कादायक घटनेने चांदखेडच्या यात्रेत खळबळ उडाली. काल घडलेल्या या घटनेचा व्हिडीओ आता समोर आलाय. शिरगाव पोलिसांनी चौघांना अटक केलीये. गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या गुन्हेगाराने यात्रेत दहशत निर्माण करायची असल्यानं हा गोळीबार केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिलीये.

जत तालुका पाणी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांचे निमंत्रण

Sangli News : जत तालुका पाणी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याच्याकडून भेटीचे निमंत्रण. मुख्यमंत्री शिंदे यांनी समितीच्या पदाधिकाऱ्यांना उद्या सायंकाळी सहा वाजता वर्षा बंगल्यावर भेटीसाठी वेळ दिली आहे. काहीच दिवसापूर्वी म्हैसाळ विस्तारित सिंचन योजनेला  मुख्यमंत्र्यांनी मंजुरी देवून दोन हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्या संदर्भात समिती मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करणार आहे. 

स्वदेशी बनावटीच्या विमान निर्मितीस हिरवा कंदील

Aircraft : स्वदेशी बनावटीच्या विमान निर्मितीस हिरवा कंदील मिळाला आहे. कॅप्टन अमोल यादव यांच्या थ्रस्ट एअरक्राफ्ट कंपनीस 12 कोटी 91 लाख रुपयांचा निधी मिळाला आहे. विशेष बाब म्हणून राज्य सरकार देखील अर्थसहाय्य करणार आहे. 19 आसनी विमान बनवण्याच्या संशोधनासाठी हा निधी देण्यात आला आहे. 

मुंबईतील बीकेसी येथील धीरूभाई अंबानी शाळेला  बॉम्बने उडवण्याची धमकी

Mumbai News : मुंबईतील बीकेसी येथील धीरूभाई अंबानी शाळेला  बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली आहे. काल सायंकाळी साडेचार वाजता शाळेच्या लँडलाईनवर एका व्यक्तीने फोन करून मी तुमच्या शाळेत टाईम बॉम्ब ठेवल्याची माहिती दिली, असे सांगून कॉलरने कॉल कट केला. हे प्रकरण गंभीर असल्याने शाळेने यासंदर्भात पोलिसांना कळवले. शाळेच्या तक्रारीच्या आधारे, बीकेसी पोलिसांनी अज्ञात कॉलरविरुद्ध भादंवि कलम 505 (१) (बी) आणि 506 अंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

मुंबईतील बीकेसी येथील धीरूभाई अंबानी शाळेला  बॉम्बने उडवण्याची धमकी

Mumbai News : मुंबईतील बीकेसी येथील धीरूभाई अंबानी शाळेला  बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली आहे. काल सायंकाळी साडेचार वाजता शाळेच्या लँडलाईनवर एका व्यक्तीने फोन करून मी तुमच्या शाळेत टाईम बॉम्ब ठेवल्याची माहिती दिली, असे सांगून कॉलरने कॉल कट केला. हे प्रकरण गंभीर असल्याने शाळेने यासंदर्भात पोलिसांना कळवले. शाळेच्या तक्रारीच्या आधारे, बीकेसी पोलिसांनी अज्ञात कॉलरविरुद्ध भादंवि कलम 505 (१) (बी) आणि 506 अंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

आमदार बच्चू कडू यांना पुढील उपचारासाठी नागपूरला हलवले जाणार

Bacchu Kadu : आमदार बच्चू कडू यांना पुढील उपचारासाठी थोड्याच वेळात नागपूरला हलविले जाणार आहे. सिटी स्कॅन आणि पुढील उपचारसाठी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार बच्चू कडू यांना नागपुरात हलवण्यात येणार आहे. आज सकाळी 6.15 वाजता अमरावती शहरातील आराधना चौकाजवळ एका दुचाकीने बच्चू कडू यांना धडक दिली होती. या अपघातात कडू जखमी झाले होते.

Sushma Andhare :  सुषमा अंधारे यांची हिंगोलीत होणारी सभा रद्द, आचासंहितेच्या नियमासह जागेची  परवानगी नसल्यानं सभा रद्द 

Sushma Andhare :  शिवसेनेचा उपनेत्या सुषमा अंधारे यांची महाप्रबोधन यात्रा आज हिंगोली जिल्हा दौऱ्यावर येणार होती. त्यांची कळमनुरीमध्ये सभा आयोजित करण्यात आली होती. परंतू हिंगोली पोलिसांनी या सभेला परवानगी देताना आचारसंहितेचे नियम पाळण्याचे आवाहन केले आहे. तर नगरपालिकेने सभेच्या जागेला परवानगी न दिल्यानं आजची होणारी सभा रद्द करण्यात आली आहे. आज दुपारी एक वाजताच्या सुमारास ही सभा होणार होती. परंतू नगरपालिकेची परवानगी आणि पोलिसांनी घालून दिलेल्या आचारसंहितेच्या नियमामुळे ही सभा पुढे ढकलण्यात आली आहे. सभेची पुढील तारीख लवकरच कळवण्यात येईल असे ठाकरे गटाचे शिवसेना जिल्हाप्रमुख विनायक भिसे यांनी कळवले आहे

अजित पवार औरंगाबाद दौऱ्यावर, विमानतळावर उतरातच थेट सिग्मा रुग्णालयात जाऊन घेतली जखमी कार्यकर्त्याची भेट

Ajit Pawar : विरोधी पक्षनेते अजित पवार हे औरंगाबादच्या दौऱ्यावर आहेत. सकाळी विमानतळावर उतरल्यानंतर थेट सिग्मा हॉस्पिटलमध्ये जाऊन जखमी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याची भेट घेतली. ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादातून राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब तरमळे यांच्यावर 31 डिसेंबर रोजी जीवघेणा हल्ला झाला होता. तरमळे यांची प्रकृती चिंताजनक असल्याने सिग्मा हॉस्पिटलमध्ये सध्या उपचार सुरू आहेत. आज सकाळी अजित पवार हे औरंगाबाद विमानतळावर उतरल्यानंतर थेट सिग्मा हॉस्पिटलमध्ये जाऊन जखमी भाऊसाहेब तरमळे यांची भेट घेतली. औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यातल्या बोकुड जळगाव निवडणुकीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब तरमळे यांच्यावर निवडणुकीच्या वादातून हल्ला झाला होता. त्यांच्या डोक्याला आणि मानेला चाकुचा मार लागला आहे. 

Hasan Mushrif: हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीचे छापे

 Bacchu Kadu : आमदार बच्चू कडू यांचा रस्ता क्रॉस करताना अपघात, डोक्यासह पायला दुखापत

 Bacchu Kadu : आमदार बच्चू कडू यांचा रस्ता क्रॉस करताना अपघात झाल्याची घटना घडली आहे. त्यांना अमरावतीच्या एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. डोक्याला आणि उजव्या पायाला दुखावपत झाल्याची माहिती मिळाली आहे. बच्चू कडू यांच्या डोक्याला चार टाके पडले आहेत. सकाळी 6 ते साडे सहाच्या दरम्यान रस्ता ओलांडताना एका दुचाकीस्वाराने धडक दिली आहे. यामध्ये बच्चू कडू रोडच्या डिव्हायडरवर आदळल्यानं डोक्याला मार लागला आहे.

19 फेब्रुवारीला शरयू फाउंडेशनच्या वतीने बारामती हाफ मॅरेथॉनचे आयोजन

Baramati News : 19 फेब्रुवारीला शरयू फाउंडेशनच्या वतीने बारामती हाफ मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. 10 आणि 21 किलोमीटर ही मॅरेथॉन असणार आहे. 

घाटकोपरमधील ठाकरे गटासह काँग्रेसमधील कार्यकर्त्यांचा शिंदे गटात प्रवेश

Maharashtra Political News : उद्धव ठाकरे शिवसेना आणि राष्ट्रीय काँग्रेस पक्षामधील घाटकोपर पश्चिमेतील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मंगळवारी बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी नंदनवन बंगल्यावर त्यांचे स्वागत केले. मंगळवारी सुमारे 350 कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश केला. येत्या काही दिवसांत विक्रोळी आणि भांडुपमधीलही कार्यकर्ते शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे आमदार किशोर अप्पासाहेब पाटील यांनी सांगितले. पक्षात सामील झालेल्या कार्यकर्त्यांना विभाग प्रमुख आणि शाखा प्रमुख ही पदे देण्यात आली आहेत अशी माहिती पाटील यांनी दिली. 

 Jaiprakash Chhajed Passes Away : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी आमदार जयप्रकाश छाजेड यांचं निधन

 Jaiprakash Chhajed Passes Away : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी आमदार जयप्रकाश छाजेड ( Jaiprakash Chhajed) यांचे निधन झाले आहे. नाशिक येथील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान, मंगळवारी रात्री त्यांनी अखेरता श्वास घेतला. इंटकचे अध्यक्ष, विधान परिषद आमदार अशी जबाबदारी त्यांनी सांभाळली होती. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे निकटवर्तीय म्हणून त्यांची ओळख होती. ते काँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते होते. 

Satara Fire : साताऱ्यातील वाढेफाटा येथील दुकानांना आग

Satara Fire : साताऱ्यातील वाढेफाटा येथील दुकानांना आग लागली आहे.  आगीचे कारण अद्याप  अस्पष्ट आहे.  घटनास्थळी अग्निशामक दलाची गाडी दाखल झाली आहे.  

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये..


11th January Headlines: राज्यात विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीवरून आता राजकारण तापण्यास सुरुवात झाली आहे. शिंदे गट आणि भाजपकडून उमेदवार निश्चित केले जात असताना दुसरीकडे महाविकास आघाडीत समन्वय दिसून येत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे महाविकास आघाडी या निवडणुकीत एकत्रितपणे सामोरे जाणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष असणार आहे. त्याशिवाय अभिनेत्री तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरणी अटकेत असलेला अभिनेता शिझानच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. 


मुंबई:



  • मुंबईसह आसपासच्या परिसरातील उघडी मॅनहोल आणि रस्त्यावरचे खड्डे यांसदर्भात हायकोर्टात दाखल जनहित याचिकेवर आज सुनावणी पार पडणार आहे. वारंवार निर्देश देऊनही पालिका प्रशासनाकडून याबाबत होणाऱ्या हलगर्जीपणाबाबत हायकोर्टाने नाराजी व्यक्त केली आहे.  

  • जॉन्सन बेबी पावडरबाबत आज मुंबई उच्च न्यायालयात महत्त्वपूर्ण सुनावणी. एफडीएनं बेबी पावडरच्या वितरणावर लावलेल्या बंदीबाबत हायकोर्ट देणार निर्देश. नव्या नियमावलीनुसार राज्य सरकार पुन्हा नव्यानं करणार का चाचणी?

  •  30 जानेवारीला पार पडणाऱ्या विधान परिषद निवडणूकीसाठी अर्ज भरण्यासाठी अखेरची तारीख 12 जानेवारी आहे. यासाठी केवळ 2 दिवस बाकी असतानाच अजुनही महाविकास आघाडीचे नागपूर शिक्षक मतदार संघाचा आणि अमरावती पदवीधर निवडणुकीसाठी उमेदवार ठरलेला नाही. आज महाविकास आघाडीची याबाबत बैठक पार पडणार असून उमेदवाराची घोषणा होईल. मात्र, महाविकास आघाडीत समन्वय नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या बैठकीत काय होणार, याकडे लक्ष लागले आहे.

  • विधान परिषदेच्या पाच जागांसाठी 30 जानेवारीला निवडणूक होत आहे. विधान भवनात महाविकास आघाडी आणि भाजपा शिंदे गटाकडून उमेदवारी अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे. 


पुणे:



  •  65 व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा आज दुसरा दिवस  आहे.  महाराष्ट्र केसरीच्या मुख्य स्पर्धेसाठी वजनी गटातील लढती ठरणार आहेत.

  • येरवडा कारागृहातील कैद्यांकडून संक्रातीच्या निमित्ताने तयार केलेल्या वस्तू आणि पदार्थांचे विक्री केंद्र सुरु होणार  आहे. 

  • 33 व्या महाराष्ट्र राज्य पोलीस खेळांच्या उद्घाटनास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार  आहेत. सायंकाळी 4 वाजता हा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. 




 


- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.